मित्रांनो अपचन, करपट ढेकर येणे, छाती मध्ये जळजळ होणे गॅस होणं बेचैन झाल्यासारखं मळमळ होणे आळस आणि थकवा त्यामुळे सारखी झोप लागणं किंवा कोठा साफ न होणे पोट व्यवस्थित साफ न होणे अयोग्य आहारामुळे सध्या अपचनाच्या आणि विशेषतः पोट साफ न होणे, या समस्या यात जास्तीत जास्त लोकांना जाणवू लागले आहेत आपण जे खातो त्याचे पचन होऊन खूप महत्त्वाचं असतं आणि त्यापेक्षाही अन्नपचन न झालेले किंवा अर्धवट पचलेले जे अन्न आहे ते पोटामध्ये सडू न देणे आणि त्याला बाहेर फेकन हे खूप महत्वाचं असतं.
आणि 90 टक्के लोकांना हा त्रास होतो आहे खाल्लेलं अन्न किंवा न पचलेल्या अन्नाचे आहे ते पोटा मधून बाहेर फेकले जात नाही आणि त्याच ठिकाणी राहून ते सोडत आणि पोटामध्ये सडल्यामुळे मग गॅसेस होणे जळजळ होणे ऍसिडिटी होणे सडलेल्या अन्नाचं विष शरीरामध्ये पसरल्यामुळे मोतीबिंदू संधिवात आतड्याचा कर्करोग चेहऱ्यावर मुरूम येणे तोंडामध्ये गरे पडणे किंवा तोंड येणे अशा प्रकारचे अनेक त्रासही होत आहेत म्हणून कोठा साफ असण खूप महत्त्वाच आहे म्हणजेच पोटामध्ये जे अन्न आहे ते सडू न देणे किंवा न पचलेल्या अर्धवट पचलेले अन्न सडू न देता बाहेर फेकणे खूप महत्त्वाच आहे.
मित्रांनो आम्ही झोपाय सांगणार आहे तो त्याच पद्धतीने काम करतो तुमच्या पोटामध्ये अन्न अजिबात सडू देत नाही आणि न पचलेलं अन्न किंवा अर्धवट पचलेले अन्न आहे त्याला बाहेर फेकण्याच काम करतो आणि यासाठी आपल्या घरामध्ये फक्त दोन घटक आपल्या लागतात अतिशय सोपा उपाय आहे परंतु पोटाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
मित्रांनो यासाठी पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो आहे धने. इथे तुम्ही धने वापरू शकता किंवा धण्याची पूड सुद्धा वापरू शकता धने आपल्याला कुटून घ्यायचे आहेत त्याचे पुड बनवायची आहे. धने हे शितल असतात वायू हारक असतात. पोटामधील वायू नष्ट करतात दाह नाशक असतात आणि सर्वात महत्वाच म्हणजे पोटामध्ये सडलेला अन्न त्या ठिकाणी जे कृमी झालेले आहेत त्यांना नष्ट करतात.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेदा मधला हे एंटीऍसिड आहे तुमच्या शरीरांमधलं पोटामधले ॲसिड हे कमी करतात म्हणून एक चमचाभर धणे चूर्ण आपल्याला घ्यायचा आहे. एक चमचाभर धणे चूर्ण आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये उकळत ठेवायचे आहे. हे दोन ते तीन मिनिटे चांगल्या रीतीने उकळून घ्यायचे आहे. उकळून घेतल्यानंतर हा काढा गाळून घ्यायचा आहे. त्याला थोडस कोमट होऊ द्यायचं पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही.
कोमट होवू द्यायचं आणि कोमट झाल्यानंतर त्यामध्ये दुसरा घटक आपल्या मिक्स करायचा आहे ते आहे अर्ध लिंबूचा रस. लिंबू या समस्येवर सर्वात महत्त्वाचं फळ आहे. लिंबू अमाशयामधील जे घातक जीवाणू असतात त्यावर हल्ला करतो आणि त्यांना नष्ट करतो जास्त झालेलं आणलं किंवा न पचलेले अन्न बाहेर काढण्याचं काम म्हणजेच पोट साफ करण्याचे काम करतो
मित्रांनो हा काढा आपण दिवसातून दोन वेळा घेऊ शकतो एक तर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर एक तासाने हा काढा पिऊ शकता दोन्ही पैकी कुठल्याही एका वेळेला घेऊ शकता दहा ते बारा दिवस हा उपाय सलग करा यामुळे तुमच्या पोटात न पचलेले अन्न बाहेर काढण्याचे काम हा काढा करतो.
त्यामुळे पोट साफ होते अपचन करपट ढेकर जळजळ होते झाल्यासारखे वाटणे या समस्या दूर होतील वर्षातून एकदा दहा ते बारा दिवस हा उपाय करा. यामुळे तुम्हाला वर्षभर कोणत्याही प्रकारचा अपचनाचा त्रास करपट ढेकर मळमळ पित्त होणे या समस्या होणार नाही. हा उपाय आयुर्वेदिक आहे याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. शरीरासाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे त्यामुळे उष्णता देखील नष्ट होते हा उपाय केल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पित्ताच्या गोळ्या किंवा काढे वगैरे घ्यायची आवश्यकता भासणार नाही.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.