मित्रांनो हो नियमित जेवण अवेळी जेवण अवेळी झोप अपुरी झोप अशा विविध करणारे तसेच तेलकट-तुपकट तळलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे या कारणामुळे अपचन गॅस एसिडिटी भूक न लागणे पोट सारखं गच्च वाटणे अशा समस्या होऊ लागतात या समस्येसाठी आपण आज एक घरगुती उपाय पाहणार आहोत. ही समस्या सुरु झाली की आपली भुक हळूहळू कमी होऊ लागते पोट गच्च होणे पोट जड होणे खायची इच्छा न होणे तोंडाला चव नसणे थोडे जरी खाल्ले तरी पोट गच्च होणे गॅसेस अपचन पित्त अशा विविध समस्या सुरू होतात.
मित्रांनो भूक न लागणे काहीही खाण्याची इच्छा न होणे थोडे जरी खाल्ले तरी पोट गच्च होणे जड होणे या समस्येतून मुक्त होण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत जो अतिशय सोपा आहे आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत चला तर पाहूया काय आहेत उपाय.
मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी खूपच साधा व सरळ उपाय घेऊन आलो आहे. हा तयार करण्याची पद्धत खूप सोपी आहे. पोटातील गॅसवर हा रामबाण उपाय आहे. तुमच्या पोटात कितीही गॅस तयार झालेला असुदे किंवा अॅसिडिटी असेल तर लवकर नाहीशी होते. माझी ही माहिती तुम्ही पुर्णपणे वाचा.
जर तुम्ही वारंवार गॅस झाल्यावर एलोपेथी औषधे सेवन करीत असाल तर आपल्या लिव्हरला ती नुकसान करतात. त्याचबरोबर अन्य आजारांना आमंत्रण देतात. चला सुरू करूया हा उपाय कसा तयार करायचा आहे. हा साधा उपाय करण्यासाठी तुम्हाला इथे घ्यायचे आहे आले. आल्यामध्ये मित्रांनो पाचक एंझाइन असते. जे पोटात होणार्या गॅस अपचन या समस्येपासून सुटका करते. पोटात गॅस बनला आहे अॅसिडिटी आहे तर आले खूपच सहजपणे गॅसची समस्या दूर करते. मी दाखवतो आहे तेवढा तुकडा आले घ्या साधारण १ इंच. त्याची साले चाकूच्या मदतीने काढून घ्या.
नंतर त्या आल्याच्या छोट्या छोट्या चकत्या कापा मी केल्या आहेत त्याप्रमाणे. आता तुम्हाला इथे घ्यायचे आहे सैंधव मीठ. सैंधव मीठ आपली पचनशक्ती वाढवते. त्याचबरोबर त्याचे पोटासाठी अनेक फायदे आहेत. अशा प्रकारे सैंधव मीठ आपल्या बोटावर घ्या. ते आल्याच्या तुकड्याला लावा.
सैंधव मीठाला रॉक मीठ असे देखील म्हणतात. हे मीठ नैसर्गिकरित्या पूर्णपणे शुद्ध मानले जाते. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. याव्यतिरिक्त सैंधव मीठामध्ये कमी खारटपणा आणि आयोडीनचे प्रमाण कमी असते, यामुळे उच्च रक्तदाब आणि डोळ्यांच्या सूजची समस्या नियंत्रित होते.
दोन्ही बाजूला सैंधव मीठ लावून घ्या. नंतर हे आले तोंडात ठेवून त्याचा रस तोंडात येईल अशा रीतीने चावून चावून चोखा. म्हणजे त्यातील रस तुमच्या पोटात सैंधव मिठासोबत जाईल. १ तुकडा संपला की तुम्ही दूसरा तुकडा त्यावर पण मीठ लावून चोखा. २ ते ३ चकत्या चोखून व चावून झाल्यावर तुम्हाला अनुभव येईल की पोटातील गॅस निघून जाईल. एकदा हा प्रयोग जरूर करा. तुम्हाला जर हे करताना तहान लागली तर थंड पाणी न पिता कोमट पाणी प्या.
सैंधव मीठ उपवासाला खाल्ले जाते
खरं तर, सैंधव मीठामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करण्यात येत नाही. म्हणूनच उपवासाच्या दिवशी हेच मीठ खाल्ले जाते. याशिवाय, या मीठामध्ये भरपूर पोषक घटक असतात. सैंधव मीठामध्ये लोह, झिंक, मॅग्नेशियम यासह अनेक पौष्टिक पदार्थ असतात. म्हणून हे मीठ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
फायदे
1. सैंधव मीठ हलके आणि पचणासाठी अत्यंत चांगले आहे, यामुळे पचन प्रणाली सुधारते. याव्यतिरिक्त, रोगप्रतिकारक प्रणाली देखील चांगली होते.
2. सैंधव मीठाचे सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळते. कारण शरीराला आवश्यक पोषक आणि खनिज पदार्थ सैंधव मीठामध्ये आढळतात.
3. सैंधव मीठाचा आहारात समावेश केल्याने रक्त परिसंचरण सुधारते. याव्यतिरिक्त, हे शरीरातील पीएच पातळी राखण्यासाठी देखील प्रभावी आहे.
4. सैंधव मीठ शरीरातील चरबी कमी करण्यास देखील फायदेशीर आहे. जर आपले वजन वाढले असेल तर आपण आहारात सैंधव मीठाचा समावेश केला पाहिजे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.