मित्रांनो, चार चौघांमध्ये आपण उठून दिसावे असे वाटतच असते. हसरा चेहरा कोणाला आवडत नाही. पण हसताना दात पिवळे दिसले तर ती खूपच अपमानाची गोष्ट वाटत असते. दुधासारखे पांढरे दात तुमचे व्यक्तिमत्व वाढवतात. पण बदललेल्या जीवनशैलीमुळे आपण दातांकडे लक्ष देत नाही. पिवळे दात कोणालाही आवडत नाहीत. दातांचा दातांचा पिवळेपणा काढण्यासाठी आपण डेंटीस्टकडे जातो किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल्स आणि पेस्टचा आधार घेतो.
काही जण दिवसातून खूप वेळा चहा, कॉफी प्यायल्याने किंवा पान किंवा धुम्रपान केल्यामुळे दात पिवळे पडू लागतात. दात पिवळे होणे ही एक सामान्य समस्या आहे. तुम्ही देखील या समस्येला तोंड देत असाल तर हा घरगुती उपाय नक्की करुन पहा. या उपायांमुळे तुम्हाला मोत्याहून सफेद दात मिळू शकतील. तर हा घरगुती उपाय नेमका कसा करायचा आणि या उपायासाठी आपल्याला कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे चला तर जाणून घेऊया.
तर या उपायासाठी आपणाला अद्रक लागणार आहे. अद्रक हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर ठरते. तसेच आपले दात जर पिवळे झाले असतील तर ते पांढरे शुभ्र करण्यासाठी आपणाला आद्रक फायदेशीर ठरते. तर अद्रक चा एक तुकडा आपणाला घ्यायचा आहे. त्यावरची साल काढून आपणाला तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तो तुकडा आपल्याला किसून घ्यायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला जर तुमचे दात किडू नये तसेच दातांमध्ये जर तुम्हाला वेदना होत असतील तरी देखील अद्रक खूपच फायदेशीर ठरते. तर आपणाला असे हे अद्रक चा तुकडा किसून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला लिंबूचा रस घ्यायचा आहे.
लिंबू हे आपल्या चेहऱ्यासाठी तसेच अनेक उपायांमध्ये फायदेशीर ठरते. तर आपणाला एक चमचा लिंबूचा रस घ्यायचा आहे. लिंबूचा रस घेत असताना त्यातील बिया बाजूला काढायचे आहेत आणि एक चमचा लिंबूचा रस घ्यायचा आहे. आपल्या तोंडामध्ये येणारी जी दुर्गंधी आहे तसेच दात चमकवण्यासाठी देखील लिंबूरस फायदेशीर ठरते.
आपणाला एका बाऊलमध्ये एक चमचा लिंबूरस घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो आहे मीठ. आपण जे रेग्युलर घरामध्ये वापरतो ते अर्धा चमचा मीठ आपल्याला त्या लिंबूरसामध्ये घालायचे आहे. आणि नंतर त्या मीठ आणि लिंबू मध्ये आपणाला जे किसून घेतलेलं अद्रक आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित आपणाला ते मिक्स करून घ्यायचे आहे.
यानंतर आपणाला व्हाईट टूथपेस्ट घ्यायची आहे. जी तुम्ही रेगुलर वापरता ती टूथपेस्ट आपणाला आपण जेवढी वापरतो तेवढीच घ्यायची आहे. आपणाला जेल वाली पेस्ट अजिबात घ्यायची नाही. तर रेग्युलर व्हाईट टूथपेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपणाला या पेस्टनेच आपले दात घासायचे आहेत.
तुम्ही ब्रशच्या सहाय्याने किंवा तुमच्या बोटाच्या साह्याने आपले दात घासू शकता. आठवड्यातून तीन वेळा या पेस्टने आपणाला ब्रश करायचा आहे.
तर मित्रांनो तुम्हाला या पेस्टने एक ते दोन मिनिटे ब्रश करायचा आहे. यामुळे मित्रांनो तुमचे जे काही दातावरील पिवळे डाग असतील ते नक्कीच दूर होतील. तुमचे दात चमकू लागतील. असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.
तसेच तुमची जी काही तोंडातून दुर्गंधी येत असेल ती देखील गायब होईल. तुमच्या दातांना एक मजबूतपणा देखील येईल. तुम्ही ब्रश करून झाल्यानंतर पाण्याने चूळ भरायची आहे. तर मित्रांनो असा हा उपाय तुम्ही देखील नक्कीच करून पहा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.