मित्रांनो, तुमच्या प्रेमामुळे आज आपले लेख हे साता समुद्रांच्या सीमा देखील ओलांडून जगभरात पोचले आहेत. तुम्ही दिलेले प्रेम आणि स्वामींची भक्ति ही अद्वितीय अशीच आहे. तर मित्रांनो यापुढील लेख हा स्वामींच्या सेवेकर्याच्या शब्दात.
मित्रांनो मी नंदा, रावेरची. गेली अनेक महीने मी महाराजांची सेवा करत आहेत आणि केंद्रामध्ये जात असताना अनेक सेवेकरी मला पावलो पावली भेटले ज्यांना महाराजांचे अनुभव आले होते. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ याची प्रचिती मला मात्र अजूनही आली नवती पण काही महिन्यांपूर्वी मला महाराजांची प्रचिती आली.
स्वामींच्या दरबारामधील मी एक सामान्य सेवेकरी आहे. मी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या मध्ये स्वामी चरित्र सारमृताचे पारायण आणि इतरा अनेक सेवा पूर्ण केल्या. त्या दिवशी माझ्या सगळ्या सेवा या सकाळी साडे अकरा वाजायच्या सुमारास पूर्ण झाल्या. मला खूप प्रसन्न वाटत होते, आणि एक ऊर्जा माझ्यामध्ये संचारली होती. गुरुवार होता आणि मग आपण अजून दुसरी विशेष सेवा करावी अशी मला आतूनच हाक आली.
निदान संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण तरी करावे. मी केंद्रामधील संक्षिप्त गुरुचरित्राचे पुस्तक घेतले आणि वाचायला सुरवात केली. मी भारावल्या सारखे 7 अध्यायांचे वाचन केले
त्याच दिवशी रात्री जेवण उरकून मी स्वयंपाक घरामध्ये आवराआवर करत होते आणि माझे पती हे मुलीचा अभ्यास घेत तिच्याशी खेळत होते आणि मग आपल्या नेहमीच्या सवयीनुसार शतपावली करायला म्हणून गच्चीवर गेले. ते वर गेलेल्याला फार काही वेळ देखील झाला नवता पण अचानक काहीतरी गेट वर पडल्याचा आवाज आला.
आम्ही सगळे बाहेर धावत आलो तर माझे मिस्टर वरुण गेटवर आणि मग जमिनीवर पडले होते. त्यांची काहीही हालचाल होत नवती, माझे पाय थरथरत होते. पतींच्या बाजूला त्यांच्या मोबाइलवर ते रोज ऐकत असलेली हनुमान चालीसा चालूच होती.
शेजारी देखील धावून आले आणि आम्ही त्यांना दवाखान्यामध्ये नेले. साधारण 11 वाजायच्या सुमारास त्यांची सीटी स्कॅन करायला आत घेतले. दवाखान्यामध्ये जाऊ पर्यन्त सासूबाई आणि मी त्यांच्या नाडीवर स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करत होतो. जेव्हा पाठींचे रिपोर्ट आले तेव्हा सगळ्यांना धक्का बसला कारण इतक्या वरुन पडणार्या माणसाचे हे रिपोर्ट असे कसे असू शकतात ? असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता.
दुसर्या दिवशीच्या पहाटे आम्ही रावेरला परत आलो आणि त्यांना तिथे सकाळी 11 वाजता अॅडमिट केले, जळगावला आम्हाला संगितले गेले होते की, रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि काही दिवस घरीच काळजी घेतली तरी चालेल पण तरीही आम्ही त्यांना दवाखान्यामध्ये ठेवायचा निर्णय घेतला.
त्या दिवशी रात्री मला एक स्वप्न पडले, एक उंचेपुरे, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले गृहस्थ माझ्याशी बोलत होते ‘काय गं ! आली का माझी प्रचिती‘ पतींनी आवाज दिल्यामुळे माझे स्वप्न संपले आणि मी खटकण जागी झाले.
पुढच्या काही दिवसांमध्येच माझ्या पतींची खूप फास्ट रीकवरी झाली आणि आठवडाभरातच ते कामाला देखील जायला लागले. स्वामींनी खरच माझ्या पतींना दुसरे जीवन दिले. श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.