फक्त 5 सोमवार करा हे व्रत : कोणत्याही इच्छा असुद्या 24 तासात ताबडतोब पूर्ण होईल ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. आपल्याला जे हवे आहे ते मिळाले. आपले सर्व दुःख जाऊन आपल्याला सुख यावे. घरात सर्व ऐश्वर्या संपत्ती असावा. याबाबत ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. असे जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हे व्रत पाच सोमवार करा. नक्कीच सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. हे व्रत कोणते? या व्रताचे कोणकोणते नियम आहेत व ते कसं करावे? याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

हे व्रत म्हणजे पशुपती व्रत. पशुपती व्रत हे भगवान शिवाच्या आवडत्या व्रतांपैकी एक आहे. या व्रताचे नाव कदाचित फार कमी लोकांनी ऐकले असेल पण ते खूप फायदेशीर आहे. शास्त्रानुसार पशुपती व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते. जर एखाद्या व्यक्तीवर खूप ओझे असेल किंवा त्याचे वैवाहिक जीवन चांगले नसेल तर तो हे व्रत करू शकतो. हा उपवास खूप सोपा आहे. ते ठेवण्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची किंवा कोणत्याही विशेष दिवसाची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया पशुपती व्रत कसे करावे. त्याचे नियम काय आहेत.

 

हे व्रत कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षात किंवा शुक्ल पक्षात करता येते. फक्त लक्षात ठेवा, हे व्रत करण्यासाठी सोमवार असावा. जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार फळ मिळवायचे असेल तर हे व्रत योग्य रीतीने करावे. शास्त्रानुसार हे व्रत पूर्ण ५ सोमवार करा. तरच या व्रताचे फळ मिळते. प्रत्येक व्रत करण्याचे काही नियम असतात. त्यानुसारच याचे देखील काही नियम आहेत. त्यानुसार जर आपण हे व्रत केले तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

 

आपल्याला सकाळी लवकर उठून पहिला आंघोळ करावी. आंघोळ झाला नंतर प्रथम आपल्याला सूर्य देवाला अर्ग्य द्यावे. सूर्य देवाला आर्ग्या देऊन नंतर बेलपत्र व पंचामृत घेऊन शंकराच्या मंदिरामध्ये जावे. त्या मंदिरामध्ये जाऊन शंकराचे विधिवत पूजा करावी. त्याला बेलपत्रे व्हावे. शंकराची पूजा झाल्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व शंकरांना सांगाव्यात. त्यांची मनोभावे प्रार्थना करावी. हे करून झाल्यानंतर परत घरी यावे.

 

त्या दिवशी आपला उपवास असावा. सायंकाळी आपल्याला परत शंकराच्या मंदिरांमध्ये जायचे आहे. परंतु त्यावेळी आपल्याला शंकराच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोडाचे पदार्थ बनवायचे आहे. या बनवलेल्या पदार्थाचे समान तीन भाग करायचे आहेत. त्याचबरोबर सहा तुपाचे दिवे आपला सोबत घेऊन जायचे आहे. हे सर्व सामग्री आपल्याला शंकराच्या मंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर प्रथम जे आपण सहा दिवे घेऊन गेलो आहोत त्यातील पाच दिवे शंकराच्या पिंडी समोर ठेवायचे आहे व ती प्रज्वलित करायचे आहेत.

 

आणि जो आपण प्रसाद बनवलेला आहे त्यातील दोन भाग हे शंकराला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. त्यानंतर आपण घरी यावे व जो आपण एक दिवा परत घरी आणलेला आहे तो घराच्या उंबरठा वर प्रज्वलित करावा. मगच आपण घरात प्रवेश करावा. त्यानंतर जो एक भाग प्रसाद आपण आणलेला आहे तो आधी ग्रहण करावा व मगच इतर पदार्थ करावे.

 

अशा प्रकारे या व्रत करण्याचे नियम आहेत. अशाप्रमाणे जर तुम्ही हे व्रत केले तेही 5 सोमवार तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होणार आहेत. या मध्ये जर तुम्हाला कोणत्या अडचण आली तेव्हा एखादा सोमवार चुकला तर तुम्ही तो सोडून दुसऱ्या सोमवारी हे व्रत करू शकता.

 

अशाप्रकारे हा पशुपती व्रत तुम्ही देखील नक्कीच करून बघा. तुमच्या देखील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील.

Leave a Reply

Your email address will not be published.