मित्रांनो, मांसाहारी खवय्यांसाठी मासे हे अगदी प्रिय असतात. त्यांना चिकन, मटण सोबतच माशांचा आस्वाद घेणं देखील तितकेच आवडते. पण, मासे हे केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही उपयुक्त ठरतात. म्हणूनच तुम्ही पहिल्यांदा मासे खाणार असाल तर थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण करली सारखा काटेरी मासा खाताना तो काळजीपूर्वक खाणे फार गरजेचे असते. कारण माशाचा काटा घशाला लागण्याची भिती असते. पण, जर एखाद्यावेळेस घशाला माशाचा काटा लागल्यास काय करावे ?असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण, काळजी करु ना आज आम्ही तुम्हाला घशाला काटा लागल्यास काय करावे हे सांगणार आहोत.
तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि मासे खाताना माश्याचा एखादा काटा आपल्या घश्यात अडकला तर आपण ताबड्तोब काय करायला हवे. हा काटा काढण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो. मित्रांनो मासे हे अत्यंत आपल्या शरीरासाठी उपयुत्क असतात आणि त्याचे महत्वव तर आपण जाणतोच आणि मित्रांनो आजच्या लेखात आपण असेच मासे खात असताना त्यातील एखादा काटा आपल्या घश्यात अडकला तर आपण काय तात्कळ करायचे आहे ते जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो सर्वात सोपा उपाय जो अगदी खूप पारंपरिक आहे जुने लोक वापरत असत तो म्हणजे आपण एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि असे एक ते दोन घास जर आपण खाल्ले तर जो हा अडकलेला काटा आहे तो त्या भाकरीच्या घासाबरोबर तो पोटात निघून जातो.
मग आता तुम्ही विचाराल आत गेलेल्या काट्याचे काय करायचे?तर मित्रांनो जो आत गेलेला काटा असतो तो आपल्या शरीरातील अंतरींद्रिये आहेत लहान आतडे मोठे आतडे त्यांना तो कोणत्याही प्रकराची हानी पोहचवू शकत नाही. कारण आपल्या जठरातील पाचक द्रव्ये असतात. ते श्रवायला सुरु होतात.असा पाचकरस काट्याच्या तुकड्यांचे छोट्या छोट्या तुकड्यात करून टाकतो.
त्या काट्याच्या तुकड्याना तो मऊ बनवू शकतो म्हणजे तो आपल्या आतील आतड्याना काहीही इजा पोहचून देत नाही. हा उपाय खूप वर्षांपासून चालत आलेला आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना तो माहिती नसेल लोक खूप घाबरून जातात.
तर घाबरून न जाता आपण तो भाकरीचा तुकडा चावून त्यात लाळ मिक्स होऊन द्यात त्यानंतर आपण तो गिळायचा आहे असे 2 ते 3 घास आपण खा तो तुकडा आपल्या शरीरातून निघून जाईल.
आपण जर समुद्रकिनारी राहत असाल किंवा आपल्याकडे भाकरी नसेल तर आपण त्याऐवजी आपण भात देखील खाऊ शकता. भात देखील चावून आपण त्याचा गोळा होऊन द्या व नंतर गिळा काटा निघून जाईल.
तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे केळी. आपण ह्याचे 2 ते 3 घास घ्या थोडासा मोठे घास घ्या. असे घास खाल्याने काटा निघून जातो. पोटात व आपली वेदनांपासून मुकत्तता होते.
चौथा उपाय आहे तो म्हणजे लिंबू. आपण एक लिंबू घ्या तो कापून त्याचा रस चोखून प्या. त्याचा रस आतमध्ये जाऊदे. ह्या रसामुळे देखील हा अडकलेला काटा आहे तो आतमध्ये जाऊ शकतो. तर अश्या प्रकारे हे चार उपाय आपण सांगितले आहेत. त्यापैकी आपण कोणतेही उपाय करा अगदी एकावेळी 2 ते 3 उपाय एकत्र केले तरी चालतील काही देखील हानी होणार नाही.
बरेच लोक काटा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यात तुम्हाला घश्याला वेदना होण्याची शक्यता असते. म्हणून आपण शक्यतो आपण वरील दिलेलं उपाय वापरून पहा आपला काटा निघून जाईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.