मालेगाव काढा ; सर्दी, खोकला, कफ, एका दिवसात १००% बरा करा, फुफुसाचा संसर्ग अजिबात होणारच नाही लाखो लोकांना फायदा झाला ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो सर्दी, खोकला, कफ, अंगदुखी डोकेदुखी ताप यासारख्या आजारावर अत्यंत गुणकारी असा मालेगाव काढा याबद्दलची विशेष माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो कोरोनाचे काळापासून खास करून काढा या औषधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यानंतर विविध प्रकारचे काढे बाजारात उपलब्ध झाले.

 

मित्रांनो सर्दी खोकला कफ अंगदुखी डोकेदुखी ताप त्याचबरोबर आपल्या शरीरातील खालावलेली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी आणि आपणाला तंदुरुस्त करण्यासाठी मालेगाव काढा हा अत्यंत उपयोगी ठरतो. हे आपण कोरोनाच्या काळापासून ते आतापर्यंत अनेकांकडून ऐकवत आहोत. तर बऱ्याच ठिकाणी वाचण्यात देखील आली आहे.

 

मित्रांनो खरंच हा काढा इतका गुणकारी आहे की यामुळे आपले आजार तात्काळ निघून तर जातातच याशिवाय आपला वैद्यकीय खर्च देखील टाळता येतो. या काढ्यामुळे साहजिकच आपली प्रकृती तंदुरुस्त व निरोगी राहते. कारण यामध्ये असे घटक वापरले जातात की जे आपल्या घरात सहजरीत्या उपलब्ध होतात आणि त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे आयुर्वेदिक गुणधर्म अत्यंत गुणकारी आहेत.

 

तर मित्रांनो असा हा मालेगाव काढा कसा वापरायचा कसा तयार करायचा याबद्दल आपण आता जाणून घेऊ.. मित्रांनो हा काढा करताना सुरुवातीला एक लिटर पाणी घ्यावे. मित्रांनो लक्षात घ्या की हा काढा करताना ज्या काही वस्तू वापरायचे आहेत त्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे अन्यथा उष्णता वाढी सारखे दुष्परिणाम देखील आपणाला सोसावे लागतील.

 

मित्रांनो साधारणपणे एका कुटुंबाला एक लिटर काढा हे प्रमाण योग्य असल्याचे समजून आपण हा काढा कसा बनवायचा ते पाहू. तर मित्रांनो एक लिटर पाणी घेऊन यामध्ये आपणाला एक चमचा दालचिनी, दोन लवंग, पाच काळी मिरी, दोन वेलदोडे, आठ ते दहा तुळशीची पाने, आल्याचा एक छोटासा तुकडा इत्यादी साहित्य जे आपल्या घरात सहजरीत्या उपलब्ध होते ते घेऊन मिक्सरमध्ये बारीक करावे अथवा एकत्र चेचावे.

 

यानंतर जे आपण एक लिटर पाणी घेतलं होतं यामध्ये ही तयार झालेले मिश्रण घालावे आणि एक लिटर पाण्यात घातलेली हे मिश्रण उकळण्यासाठी गॅसवर ठेवावे. साधारणपणे उकळणे सुरुवात झाल्यास त्यामध्ये हळद एक चमचा आणि गुळाचा एक छोटासा तुकडा हे दोन पदार्थ घालावेत आणि यानंतर उकळण्याची क्रिया साधारण दहा मिनिटे करावी.

 

दहा मिनिटे उकळल्यामुळे याची आपण औषधी गुणधर्म असलेले पदार्थ यामध्ये टाकले आहेत ते सर्व त्या पाण्यामध्ये येतील. आणि त्याचाच उपयोग आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगला होतो. हा काढा आपण जेव्हा लागणार आहे तेव्हा करावा. शिल्लक ठेवू नये.

 

जर आपण शिल्लक ठेवून एक दोन दिवस असे वापर करणारा हात तर यावेळी आपण हा काढा तयार करताना ज्या ठिकाणी आपण तुळशीची हिरवी पाने वापरली त्या ठिकाणी वाळलेली पाने वापरावीत. तर ज्या ठिकाणी आल्याचा तुकडा वापरला त्या ठिकाणी सुंठ वापरावी. यामुळे आपला काढा जास्त काळ टिकेल आणि खराब होणार नाही.

 

मित्रांनो ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे त्या मंडळींनी हा काढा बनवताना उष्णतेचे त्यातील जी पदार्थ आहेत ते थोडे कमी प्रमाणात वापरावेत. यातील मुख्य गोष्ट म्हणजे ज्या मंडळींना सर्दी ताप खोकला अंगदुखी थंड ताप असा काही आजार झाला आहे अशाच मंडळींनी हा काढा घ्यावा. तब्येत बरी असताना हा काढा घेऊ नये यामुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो. तर मित्रांनो अशा या बहु गुणकारी मालेगाव काड्याचा वापर करून आपण आपली तब्येत उत्तमरीत्या सांभाळा.

 

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.