मित्रांनो आपल्या आसपास असे काही लोक असतात की त्यांना एखाद्या व्यक्तीचं चांगलं झालेलं बघवत नसतं वारंवारता काही ना काही अडचणी या निर्माण करतच असतात पण त्या अडचणींना सामोरे कसे जायचे हे आपल्या हातामध्ये असतात जवळची व्यक्ती जर आपल्याला एखाद्या वेळेस त्रास द्यायला चालू केली तर आपण ती व्यक्ती त्रास देते म्हणून आपण त्या व्यक्तीला काहीच बोलत नाही त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बोलायला शिकलं पाहिजे किंवा आपल्यावर जर अन्याय होत असेल तर तिथे आपण गप्प बसून चालणार नाहीत तर मित्रांनो जेव्हा जवळची व्यक्ती किंवा जवळची लोक आपल्याला त्रास देतात तेव्हा नेमकं काय करायचे कोणत्या पद्धतीने त्यांना उत्तर द्यायची हे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
मित्रांनो एक जुनी गोष्ट आहे त्या गोष्टींमध्ये एक मुलगी खूप बिनधास्तपणे फिरत असायची राहत असायची ती खूप मॉडेल घराण्यातली होती ती जर कॉलेजमध्ये असताना एका मुलासोबत प्रेम प्रकरण चालू होतं त्या प्रेम प्रकरणाला तिच्या म्हणजेच की मुलींच्या घरच्यांचा विरोध होता तरी देखील त्या मुलीने त्या मुलाशी कोर्ट मॅरेज लग्न केलं व तो मुलगा हा खेडेगावात राहत असायचा खेडेगावात राहत असल्यामुळे खेडेगावाचं राहणीमान हे थोडं फार वेगळंच असतं म्हणजेच की त्या ठिकाणी नऊवारी साड्या अशा या प्रकारे काहीतरी त्यांचा पोशाख असतो तर मित्रांनो तिची सासू तिला रोज नऊवारी साडी नेसायला लावायची.
तेल लावून वेणी घालत असायची घरात अजूनही डोक्यावर पदर घेण्याची परंपरा ही चालूच आहे आणि ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवून ती लग्न करून आले तो देखील व्यसनी निघाला फक्त घरामध्ये ती एकटीच कमवत असायची मित्रांनो साडी नेसणे किंवा कोणाच्याही राहणीमानाबद्दल बोलणे काही बोलण्याचा हेतू नाही व कोणाच्याही भावना या ठिकाणी दुखावण्याची इच्छा नाही स्वतः डबल ग्रॅज्युएट होती एका मल्टिनॅशनल कंपनीत ऑफिसर होती.
रोज मन मारून ती जगत होती तर हे सगळं का व ती कशासाठी करत होती सासू आणि नवऱ्याला खुश ठेवण्यासाठी ते सर्व हे करत असायचे त्यांना वाईट वाटू नये म्हणून त्यांचे नियम मोडू नयेत म्हणून आई-वडिलांकडे माघारी यायची हिंमत नाही म्हणून कारण त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलेलं होतं सगळीकडून तिची कोंडमारा होत होती.
मित्रांनो त्याच्यानंतर ना मी आणि माझ्या बायकोने तिला काही गोष्टी समजावून सांगितल्या व त्या गोष्टी सांगितल्यानंतरच थोड्या दिवसांमध्ये तिच्यामध्ये फरक जाणवायला सुरुवात झाली आणि ती त्या परिस्थितीमधून पूर्णपणे बाहेर पडून गेली आणि आता ते पूर्वीसारखीच राहायला देखील लागले आहे तर त्या कोणत्या चार महत्त्वाच्या टिप्स आहेत आज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो सर्वात प्रथम आहे ती म्हणजे कुठल्याही प्रकार चालण्यास सहन करायचा नाही आपल्यावर एखादी व्यक्ती जर सतत अन्याय करत असेल किंवा तिचं मत आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण त्या ठिकाणी गप्प बसायचे नाही किंवा कोणताही अन्याय आपण त्या ठिकाणी सहन करायचा नाही तर सत्यशील व्हायला शिका मित्रांनो आपण सर्वांना एक विचित्र अशी सवय लागलेली आहे सहनशीलतेची जो जितका जास्त विचार करेल किंवा एखादा गोष्टीचा जितका विचार करून सहन करेल.
तितका तो त्रासलेला होऊन जातो आपल्यावर एक अगोदर पासूनच लाभलेली सवय आहे ती म्हणजे थोडं सहन करायला शिक प्रत्येक गोष्ट सहन करणे हे देखील आपल्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकते वेळ बदलेली ही आपण आजपर्यंत खूप ठिकाणी ऐकलेलं देखील आहे कधीतरी त्यांना देखील कळेल तेव्हा तुझा त्रास कमी होईल प्रत्येक गोष्ट तुम्ही बोलायला शिका तुम्ही फक्त सहन करून घेऊ नका तुम्ही स्पष्टपणे प्रत्येक गोष्ट समोरच्याला सांगायला शिका .
समोरच्याला कळेल किंवा समोरचा आपल्याला समजून घेईल याची अपेक्षा करू नका तुम्हाला कोणाच्या काही गोष्टी पटत नसतील तर त्या लगेचच त्यांना सांगून टाका त्या व्यक्तीला ह्या गोष्टी प्रेमाने सांगून बघा कारण जोपर्यंत तुम्ही काय बोलणार नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला देखील तुम्हाला जो त्रास होत आहे तो देखील समजणार नाही थोडे दिवस तुम्हाला त्रास होईल पण नंतर ना तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहायचं आहे आणि त्याच्यानंतर ना तुमचे सर्वजण ऐकायला देखील सुरू करतील.
दुसरा आहे ते म्हणजे स्वतःला माफ करायला शिका अनेक वेळेस आपण कोणती ना कोणती चूक ही करतच असतो आणि त्या चुकीची शिक्षा आपण स्वतःला वारंवार देत असतो मित्रांनो प्रत्येकाकडून कोणती ना कोणतीही चूक होतच असते माणूस हा चुकीतून शिकत असतो . माफ करणे हे देखील खूप मोठं आहे आणि महत्त्वाचा आहे प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटत असते की आपण कोणती तरी चूक करतो किंवा आपल्याकडून कोणती तरी चूक झालेली आहे तर आपल्याला कोणी माफ करणार नाही ही एक भीती आपल्या मनामध्ये वारंवार राहत असते तर मित्रांनो तसे काही नसते.