मित्रांनो, आता थंडीचा काळ सुरु झाला आहे. या काळात लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमजोर पडते आणि त्यांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून थंडीच्या दिवसांत लहान बाळांची जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. खासकरून एकदम लहान बाळ किंवा त्यासोबत पाच ते सहा महिने वयाचे बाळ यांची अधिकाधिक काळजी घ्यावी. जर थंडीच्या दिवसांत लहान बाळाला सर्दी, खोकला वा ताप येऊ लागला तर अशावेळी घरगुती उपाय कामी येतात. लहान बाळांना आपण औषधे, गोळ्या जास्त देऊ शकत नाहीत. त्यामुळे घरगुती व आयुर्वेदिक उपाय त्यांच्यासाठी सुरक्षित ठरतात.
तर मित्रांनो आज आपण या आजारांवर लहान बाळांवर तुम्ही काय काय उपचार करू शकता ते जाणून घेऊया. अनेक पालक अशावेळी सतत मुलाला डॉक्टरकडे घेऊन जातात. पण मित्रांनो डॉक्टरांनी लिहून दिलेली महागडे औषधे आणि गोळ्या यांचा अनेकदा परिणाम होत नाही.
तर मित्रांनो अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय नक्की करून पाहू शकतो.मित्रांनो आज आपण अशा पद्धतीने एक छोटासा उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये केला त्यामुळे आपल्या घरामध्ये जे लहान बाळ आहे त्याच्या छातीमध्ये झालेला कफ दूर होईलच आणि त्याचबरोबर त्याच्या सर्दी, खोकला, ताप यांचा काही समस्या दूर होतील.
तर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना तर वारंवार सर्दी, खोकला होत असेल, छातीमध्ये कफ तयार होत असेल तर अशावेळी कोणते उपाय प्रभावी ठरतात याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो सर्वात पहिला उपाय तो म्हणजे तुळशीची पाने.
मित्रांनो जर लहान मुलाला वारंवार सर्दी, खोकला होत असेल तर अशावेळी जी बाळंतीण आहे म्हणजे त्या मुलाची जी आई आहे तिने दररोज तीन ते चार तुळशीची पाने स्वच्छ धुऊन खावीत. मित्रांनो चावून चावून दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आपण ही पाने खाल्ल्यामुळे त्या मुलाला होणारा सर्दी, खोकला आणि छातीतील कफचा त्रास कमी होऊ शकतो.
मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये असणारे लहान बाळ एक सहा महिन्यापेक्षा मोठे असेल म्हणजेच त्याला बाहेरचे अन्न सुरू असेल तर अशावेळी मित्रांनो त्या बाळाला तुम्ही थोडसं कोमट पाणी पिण्यासाठी द्यायचा आहे.
मित्रांनो जोपर्यंत त्या लहान मुलाची सर्दी, खोकला किंवा छातीतील कफ कमी होत नाही. तोपर्यंत तुम्ही या मुलाला कोमट पाणी दररोज पिण्यासाठी द्यायच आहे. मित्रांनो फक्त कोमट पाणी आपल्याला द्यायच आहे. जास्त गरम पाणी आपल्याला त्या मुलाला प्यायला द्यायचं नाही.
मित्रांनो कोमट पाण्यामुळे ही सर्दी, खोकला आणि छातीतील कफ कमी होण्यास खूप मदत होते. त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक उपाय आपण करू शकतो तो म्हणजे आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं आहे.
हे तेल आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायच आहे आणि त्यामध्ये थोडासा ओवा आणि लसूण आपल्याला चेचून टाकायचा आहे. त्यानंतर हे तेल आपल्याला थोडं कोमट झाल्यानंतर याने बाळाच्या पाठीवर आणि छातीवर हलक्या हाताने मसाज करायचे आहे. यामुळे त्याच्या छातीमध्ये तयार झालेला कफ कमी होईल आणि सर्दी, खोकलांचा त्रास कमी होईल.
त्याचबरोबर मित्रांनो तव्यावर थोडासा ओवा आपल्याला टाकायचा आहे आणि लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या आपल्याला तव्यावर टाकायचे आहेत. हे व्यवस्थितपणे गरम करून घ्यायच आहे आणि त्यानंतर ते गरम झाल्यानंतर एका कापडामध्ये हे दोन्ही पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत. यांनी आपल्या मुलाच्या छातीवर, पाठीवर शेख द्यायचा आहे. यामुळेही सर्दी, खोकला आणि छातीतील कफ कमी होईल.
त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांचा सर्दी, खोकला कमी व्हावा यासाठी जायफळाची गुटी ही तयार करून त्यांना देऊ शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही लहान मुलांना अजून गुटी चालू केले नसेल तर अशावेळी तुम्ही फक्त जायफळाची पेस्ट त्या मुलांच्या छातीवर जर लावली तर यामुळे त्यांच्या छातीमध्ये असणारा कफ, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर होतील.
त्याचबरोबर मित्रांनो मेडिकलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉप सुद्धा आजकाल आपल्याला मिळून जातात. हे ड्रॉप जरी आपण लहान मुलांच्या नाकामध्ये टाकले तर यामुळे छातीमधील कफ आणि सर्दी कमी होण्यास खूप मदत होते. त्याचबरोबर मित्रांनो इतके करूनही जर काही फरक होत नसेल तर अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.