लग्नाला किव्हा पार्टीमध्ये जाण्याआधी फक्त एक वेळा चेहऱ्याला लावा; चेहरा एवढा सुंदर आणि मुलायम होईल की सर्वजण बघतच राहतील …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे, आपला चेहरा गोरा असावा तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये गेल्यावर आपण चार चौघात उठून दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी मग आपण चेहरा सुंदर दिसण्यासाठी अनेक ब्युटी क्रीमचा वापर करतो. ब्युटी पार्लरला जाऊन अनेक ट्रीटमेंट देखील घेत असतो. परंतु मित्रांनो आपण काही क्रीम चा वापर केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या चेहऱ्यावर झालेला पाहायला मिळतो. म्हणजेच आपला चेहरा हा गोरा होण्याऐवजी काळा दिसायला लागतो किंवा अनेक प्रकारचे समस्या आपल्या चेहऱ्याबाबतीत उद्भवला लागतात.

तर मित्रांनो तुम्हाला देखील जर चार चौघांमध्ये आपला चेहरा उठून दिसावा असा वाटत असेल तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही जर केला तर यामुळे तुमचा चेहरा नक्कीच चमकेल.

तर मित्रांनो आपण कोणत्याही पार्ट्यांमध्ये जाऊ किंवा लग्न समारंभामध्ये जाऊ त्या ठिकाणी जर तुम्हाला आपला चेहरा उठून दिसावा असे वाटत असेल तर हा घरगुती उपाय अवश्य करून पहा. तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तर या उपायासाठी आपणाला फेयर लवलीचे पाकीट लागणार आहे. म्हणजेच मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये पाच किंवा दहा रुपयाला फेयर लवलीचे पाकीट नक्कीच भेटेल किंवा तुम्ही फेअर लवलीची जी ट्यूब असते तिचा देखील वापर करू शकता. आपणाला जे पाच ते दहा रुपयांचे फेयर लवली चे पाकीट मिळते ते एक पाकीट घ्यायच आहे आणि त्यातील जी फेअर लवली आहे क्रीम ती पूर्ण एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे.

मित्रांनो बरेचजण आपल्यापैकी फेयर लवलीचा वापर करीत असतात. परंतु आज मी तुम्हाला याचा उपाय सांगणार आहे की तुम्ही जर पार्ट्यांमध्ये जाणार असाल किंवा लग्नामध्ये जाणार असाल तर त्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये किंवा लग्न समारंभामध्ये जायच्या अगोदर हा जर उपाय केला तर यामुळे तुमचा चेहरा नक्कीच चमकदार दिसेल.

तर फेयर लवली तुम्ही एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेऊ शकता आणि नंतर ती व्यवस्थित आपणाला फेटून घ्यायची आहे. म्हणजे ती थोडीशी चमच्याने आपल्याला ती हळूहळू हलवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये एक पदार्थ ॲड करायचा आहे तो म्हणजे लिंबूचा रस.

मित्रांनो येथे आपल्याला एक चमचा लिंबूचा रस ऍड करायचा आहे. तुम्ही यामध्ये ग्लिसरीन देखील ऍड करू शकता. जर तुमच्याकडे लिंबूचा रस नसेल तर ग्लिसरीन वापरत असताना मात्र अर्धा चमचा घ्यायचा आहे किंवा तुम्ही एक चमचा मध देखील घालू शकता. तर मित्रांनो लिंबूरस, ग्लिसरीन किंवा मध यापैकी कोणताही एकच घटक आपणाला त्या फेयर लवली मध्ये घालायचा आहे.

तर लिंबूचा रस तुम्ही एक चमचा त्या फेयर लवलीमध्ये घालून आपणाला ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे. हे मिक्स करीत असताना तुम्हाला दिसू लागेल की ज्याप्रमाणे दूध आपले नासते त्याप्रमाणे ती फेयर लवली देखील आपली फिस्कटत आहे हे जाणवेल.

ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावण्याच्या आधी आपल्याला चेहऱ्यावर मॉइश्चराईज लावायचे आहे. चेहऱ्याला मॉइश्चराईज लावल्यानंतर आपल्याला जे आपण पेस्ट म्हणजे ब्लिच आपण पेस्ट तयार केलेली आहे ही पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्याला हळुवारपणे मसाज करत लावायचा आहे.

ही पेस्ट आपण ज्यावेळेला चेहऱ्यावर लावतो त्यावेळेस आपण हलका मसाज करायचा आहे आणि दहा मिनिटे तरी क्रीम आपल्याला तशीच आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचे आहे. दहा मिनिटे झाल्यानंतर एखादे मऊ कापड घेऊन ते कापड आपण कोरडेच घ्यायचे आहे आणि त्या कापडाने आपल्याला चेहऱ्यावरती पूर्ण जी लावलेली पेस्ट आहे ती काढायची आहे.

म्हणजेच तुम्ही थंड पाण्याने आपला चेहरा धुवायचा नाही. तर कापडाने ती क्रीम काढून घ्यायची आहे. तर असा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचा नक्कीच चेहरा गोरा होईल. तसेच चमक देखील तुमच्या चेहऱ्याला येईल. म्हणजेच तुम्ही एखाद्या पार्टीला जाणार असाल किंवा लग्न समारंभाला जाणार असाल तर तुम्ही हा उपाय जाण्याच्या अगोदर अवश्य करून पहा.

महिन्यातून तुम्ही एक वेळ जरी हा उपाय केला तर तुमच्या चेहऱ्याला एक प्रकारची चमक देखील येईल. तर असा हा घरगुती उपाय अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.