मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच मंडळींना आपलं कुलदैवत कुठलं? कुलदेवी कोणती? हे माहिती नसतं. अनेकांना माहिती देखील असतं मात्र त्याची सेवा कशी करावी? आणि हे कुलदैवत आपणावर नाराज कसे होणार नाही यासाठी आपण कसे राहिले पाहिजे हे देखील अनेकांना माहित नसतं. मित्रांनो अशा काही चार गोष्टी आहेत की ज्या केल्याने आपले जे काही कुलदेवत असेल ते नेहमी आपल्यावर प्रसन्न राहील आपल्याला आशीर्वाद देईल.
हो मित्रांनो आजच्या या विशेष लेखांमध्ये आपण कुलदैवत या संदर्भातील विशेष माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो याआधी हे लक्षात घ्या की कुलदेवता म्हणजे काय कुल म्हणजे काय तर म्हणजे कुटुंब आणि देवता म्हणजेच कुलदेवता. म्हणजेच आपल्या कुळाची देवता म्हणजेच कुलदेवता होय.
मग ज्या कुळाचे दैवत हे पुरुष रुपी असते त्यांना कुलदेवता असे म्हणतात तर ज्या कुळाचे दैवत हे महिलारूपी असते त्यांना कुलदेवी असे म्हणतात. या कुलदेवतांची आपण विशिष्ट सेवा केल्यास आपल्याला नक्कीच विशेष प्रकारचे लाभ मिळत असतात.
हे जर उदाहरणाद्वारे पैसे झाले तर आपल्या घरामध्ये ज्या काही सुखकारक किंवा दुःखकारक घटना घडतात मग त्या लग्न असेल आरोग्य असेल लहान मुलांचे जन्म, त्याचे शिक्षण व्यवसायात प्रगती, नोकरी अशा गोष्टी असतील आणि या सर्वातून आपण सुखरूप बाहेर पडतो वाईट शक्तींपासून आपले रक्षण होते वाईट गोष्टी आपल्या किंवा आपल्या कुटुंबाच्या बाबतीत घडण्यापासून दूर राहतात यासाठी जे आपले रक्षण करतात ते आपले कुलदैवतच असते. म्हणूनच कुलदेवाची सेवा करणे खूप महत्त्वाचे असते.
तर कुलदेवतेसाठी ज्या चार गोष्टी आपण करायलाच हव्यात त्या आपण आता पाहू. यामध्ये सुरुवातीला म्हणजेच पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवाचे मूर्ती किंवा टाक असायला पाहिजे नसल्यास किंवा फोटो तरी असायला हवा. आणि हे केवळ आपल्या घरात किंवा देवघरात असून उपयोग नाही तर त्याची रोज नित्यनेमाने पूजा मनोभावे आणि श्रद्धेने केली पाहिजे.
मित्रांनो यातील दुसरी गोष्ट म्हणजे आपण दररोज आपल्या कुलदेवाचे एक माळ तरी नामस्मरण केले पाहिजे तर ते कसे केले पाहिजे…समजा जर तुमची कुलदेवी महालक्ष्मी आहे तर तुम्ही श्री महालक्ष्मी देवी नमः श्री महालक्ष्मी देवी नमः असा मंत्र जप करत तुम्हाला एक माळ जप करावी लागेल. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचे नाव माहीत नसेल तर तुम्ही ओम कुलदेवताय नमः, ओम देवताय नमः असा मंत्र म्हणावा.
मित्रांनो यातील तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या देवाच्या वारी म्हणजे जो कोणता वार असेल त्या दिवशी आपण उपवास केला पाहिजे. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास केल्यास संपूर्ण कुटुंबाला ते लाभदायक ठरते. आणि जर आपणाला आपल्या कुलदेवीचा वार माहीत नसेल तर आपण मंगळवारी उपवास करावा कारण मंगळवार हा दिवस देवीचा म्हणून म्हटलं जातं.
आणि मित्रांनो यातील शेवटची आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या किंवा कुलदेवाच्या मूळ ठिकाणी जाऊन तेथे दर्शन घेऊन आले पाहिजे. आणि ज्यावेळी आपण दर्शनाला जातो तेव्हा त्या घरातील महिलांनी देवीची ओटी हमखास भरली पाहिजे.
मित्रांनो आपण आपले हे लक्षात ठेवा की भगवंत आपणाला ज्या देवाची सेवा आपल्या हातून व्हावी असे वाटते किंवा होईल असे वाटते अशाच कुळात आपणाला जन्माला घातलेला असतो त्यामुळे आपण आपल्या कुलदेवाची मनोभावे व भक्तीने पूजा केली पाहिजे. नाम जप श्रद्धेने केले पाहिजेत.
मित्रांनो या चार गोष्टी तुम्ही कराल तर नक्कीच तुमचे कुलदैवत तुमच्यावर प्रसन्न राहील आणि येणारी कोणतीही वाईट वादा किंवा घडणाऱ्या काही वाईट गोष्टी असतील तर त्यापासून आपण तुमचे कुलदैवत तुम्हाला रक्षण करील आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची नेहमी प्रगतीच होत राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे त्याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.