मित्रांनो, आजकालचे जीवन हे खूपच धकाधकीचे तसेच व्यस्त जीवन आपल्याला पाहायला मिळते. बरेच जण हे आपल्या कामानिमित्त खूपच व्यस्त राहतात. त्यामुळे त्यांचे आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहत नाही. म्हणजेच अनेक काही ना काही आजार हे उद्भवत राहतात आणि या आजारांवर आपले खूप सारे पैसे देखील खर्च होत राहतात. त्यामुळे मग आपल्याला आर्थिक टंचाई देखील जाणवू लागते. तर मित्रांनो दिवसेंदिवस नवनवीन रोग हे डोके वर काढताना आपल्याला दिसतात. तर आपण दवाखान्याऐवजी काही घरगुती उपाय जर काही रोगांवर्ती केले तर नक्कीच आपली त्या आजारांपासून सुटका होऊ शकते.
तर बऱ्याच जणांना मुतखड्याचा त्रास खूपच असह्य होतो. मुतखड्यामुळे अनेक वेदना आपल्याला होत असतात आणि या वेदनामुळे आपल्याला खूपच त्रास देखील होऊ लागतो. मग आपण लेझर ट्रीटमेंट चा वापर तसेच ऑपरेशन इत्यादींचा वापर करत असतो. तरी देखील आपला जो मुतखडा आहे हा मुतखड्याचा त्रास कमी होत नाही. मुतखडा पडत नाही. मुतखड्यामुळे जे काही खडे तयार झालेले असतात हे खडे विरघळत देखील नाहीत.
तर आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे नक्की तुमचा मुतखड्याचा त्रास कमी होणार आहे. म्हणजेच तुमचा मुतखडा हा विरघळणार आहे तो बाहेर पडणार आहे. तर हा जो उपाय आहे हा उपाय घरगुती आहे. यासाठी जास्त खर्च देखील तुम्हाला करावा लागणार नाही. परंतु हा उपाय करत असताना काही पथ्य देखील आपणाला पाळायचे आहेत. तर हा उपाय कसा करायचा? यासाठी पथ्ये कोणती पाळायची आणि कशा पद्धतीने हा करायचा आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. तर हा उपाय करण्यासाठी आपणाला लागणार आहे कारले.
गोलाकार आकारांमधील छोटेसे कारले घ्यायचे आहे. मोठे कारले घ्यायचे नाही. जे गोलाकार आकारांमध्ये कारले बाजारामध्ये असतात ते छोटेसे कारले आपण घ्यायचे आहे ते स्वच्छ धुऊन घ्यायचं आणि त्याच्या चकत्या करायचे आहे. त्यातील बिया अजिबात काढायच्या नाहीत आणि एक कारल्याच्या आपल्याला चकत्या करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि सुती कापडाच्या सहाय्याने जो काही रस आहे हा रस आपणाला काढायचा आहे.
साधारणतः आपल्याला कारल्याचा रस एक चमचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून उपाशीपोटी आपल्याला हा कारल्याचा रस घ्यायचा आहे. तर हा कारल्याचा रस तुम्ही घेतल्यानंतर एक ग्लास पाणी किंवा तुम्हाला शक्य होईल तेवढे पाणी प्यायचे आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला चहा बंद करायचा आहे.
तसेच दही, टोमॅटो, आंबट पदार्थ याचे देखील सेवन अजिबात करायचे नाही. ज्यांना जुन्यातला जुना मुतखड्याचा त्रास असेल त्यांनी सलग जर आठ ते नऊ दिवस हा उपाय केला तर नक्कीच तुमचा मुतखडा गायब होईल. तसेच हा उपाय करत असताना तुम्हाला पालक ची भाजी देखील खायची नाही.
तर हा जो उपाय म्हणजे हा रस घेतल्यानंतर तुम्हाला एक तास तरी काहीही खायचे नाही. म्हणजेच एक तास तुम्हाला जेवढे शक्य तेवढे पाणी प्यायचे आहे. तर हा उपाय केल्यानंतर तुमचा जो पाच एम एम चा मुतखडा असेल तो खडा विरघळून नक्कीच पडेल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही आवश्यक करून पहा.
जर तुमचा मुतखड्याचा खडा हा जुन्यातला जुना असेल तर मात्र तुम्हाला जास्त दिवस हा उपाय करावा लागेल. परंतु हा उपाय करत असताना दर वेळेस नवीन कारल्याचा रस काढायचा आहे. म्हणजे एक चमचा हा रस ताजा रस काढून घ्यायचा आहे आणि तो वापरायचा आहे.
तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही घरच्या घरी मुतखड्याचा जो काही त्रास आहे हा त्रास कमी करू शकता. तर हा उपाय एकवेळ तुम्ही अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.