मित्रांनो आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे पूजा करीत असतो. अनेक प्रकारचे व्रत उपवास देखील करत असतो. मित्रांनो प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो आणि त्या दिवशी मग विशेष पूजा त्यांची केली जाते. आपल्या घरामधील काही अडचणी असतील, संकटे असतील किंवा कुठल्याही कामांमध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर आपण अनेक प्रकारचे व्रत देखील करत असतो. प्रत्येक जण हा आपल्या कुलदेवतेचा उपवास करीत असतात. तसेच कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊन तीर्थक्षेत्री जाऊन त्यांचे दर्शन देखील घेत असतात. जेणेकरून त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहील.
तसेच आपल्या कुटुंबीयांवर कृपाआशिर्वाद कायम राहावा. आपण भरपूर सेवा करून काही अनुभव देखील काही भक्तांना आलेले आहेत. तर मित्रांनो असाच एका ताईंचा अनुभव आज आपण पाहणार आहोत. साक्षात खंडोबांनी या ताईंची ओटी भरलेली असा हा अनुभवताईंचा त्यांच्या शब्दातच आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या ताईचा अनुभव त्यांच्याच शब्दात.
नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला माझा आलेला एक अनुभव तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. आपण तर सर्वजण पूजा व्रत उपवास करत असतो. प्रत्येकाला काही ना काही अनुभव येत असतात. परंतु माझा जो अनुभव आहे हा अनुभव मी कधीही न विसरणारा असा अनुभव आहे. आमच्या घरामध्ये आमच्या मोठ्या आई आहेत. आई तसेच आमच्या काकू देवांची आंघोळ किंवा देवांचे जो काही विधी असतो त्या करत असत.
परंतु माझी देखील अशी इच्छा होती की, आपण देखील देवांच्या म्हणजे कुलदेवतांच्या ठिकाणी जाऊन किंवा जे काही पूजा असते ती करावे. तर आमचं कुलदैवत म्हणजे खंडोबा आणि या खंडोबाला आपण अंघोळ घालावी तसेच पूजा करावी असं माझ्या मनात भरपूर दिवस येत होतं. मग एकदा काय झालं की माझ्या मोठ्या आईना आणि काकूला कोणत्यातरी कामानिमित्त गावी जावं लागलं आणि त्या दिवशी हा घटस्थापनेचा दिवस होता.
म्हणजेच त्यावेळेस दसऱ्याचे दिवस होते व त्यावेळेस मला मोठ्या आईने सांगितलं की तू देवाला जाऊन त्यांची आंघोळ तसेच जी काही पूजा आहे ती पूजा करून ये. मग त्यावेळेस मात्र मी खूप खुश झाली तर माझी मनातली जी इच्छा होती ती पूर्ण होणार होती. म्हणून मी आमच्या कुलदेवतेला गेले आणि त्या दिवशी रविवार होता.
खंडोबाचा वार देखील रविवार असतो. तर त्या दिवशी मी जाऊन देवांना आंघोळ वगैरे घातली. तसेच पूजा देखील केली आणि त्यावेळेस मी देवाला म्हटले की, मला देखील तुमच्या जेजुरी गडावर यायची इच्छा आहे. कारण लग्नाच्या अगोदर मला खूप वाटत होते की आपण जेजुरीला जाऊ. परंतु लग्नानंतर ते काही जमलंच नाही.
लग्नानंतर माझं बाळ छोट असल्यामुळे आम्हाला परत जेजुरीला जाणं झालं नाही. परंतु माझ्या मनात खूपच इच्छा होती की आपण जेजुरीला जाऊ. आम्ही आमच्या गावातील महिलांचा बचत गट सुरू केलेला होता. बचत गटांमध्ये ट्रीप कोणत्या ना कोणत्या ठिकाणी जातच होती व त्यावेळेस सगळ्या महिला म्हणत होत्या की कोल्हापूरला किंवा पंढरपूरला जाऊया. मग शेवटला जेजुरीला जाण्याचं आमचं ठरलं.
मग त्यावेळेस मी खूपच खुश होते. कारण जी माझी मनात इच्छा होती जेजुरी जाण्याची ते पूर्ण होणार होती व त्यामुळेच मला खूपच आनंद झाला होता. मग नंतरच दोन दिवसावर जेजुरीला जाण्याचे ठरलं. मग सगळ्याच आम्ही पॅकिंग करायला सुरुवात केली. परंतु त्यातच मी एकदमच अचानक आजारी पडले. म्हणजेच माझ्या हाता पायात देखील जीव नव्हता. त्यामुळे घरातील सर्वच जण म्हणत होते की तब्येत ठीक नाही तर जाऊ नको.
परंतु माझ्या मनात आलं की माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे आणि मी मेले तरी चालेल परंतु मी जेजुरीला जाणार. देव आपली परीक्षा घेत असेल असे म्हणून मी जाण्याचं ठरवलं आणि जेजुरीला जाण्याचे मी मनामध्ये पक्क केलं.
नंतर माझी बॅग पॅक करून मी जेजुरीला सर्व मैत्रिणी सोबत म्हणजे बचत गटाच्या महिलांसोबत गेले. माझ्याबरोबर माझ्या मोठ्या जाऊ बाई देखील होत्या. नंतर आम्ही जेजुरीला गेल्यानंतर तिथे आम्ही अंघोळ वगैरे करून नंतर आम्ही जेजुरीच्या गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी जायला निघालो. वाटतच अनेक महिला बांगड्या भरण्यासाठी होत्या. मी अगदी हिरव्या बांगड्या म्हणजेच हिरवा चुडा मी भरून घेतला.
मला हिरव्या बांगड्या खूपच आवडतात. त्यामुळे छान पैकी अशा हिरव्या बांगड्या, चुडा आम्ही भरून घेतला. नंतर मग आम्ही गडाच्या ज्या काही पायऱ्या होत्या ते चढत चढत आम्ही गडावर पोहोचलो. नंतर पोहोचल्यानंतर आम्ही जेमतेम सव्वा तास तरी रांगेत उभे होतो. मला गजरा घालण्याची खूपच हाऊस होती.
म्हणजेच मी गजरा घालून, हिरव्या बांगड्या घालून म्हणजेच हिरवा चुडा घालून खंडेरायांच्या दर्शनाला जायचं अशी इच्छा होती. म्हणून मी गजरा शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहिले. तर मला तिथे कोणीच गजरावाला दिसला नाही. मी आजूबाजूच्या लोकांना विचारलं त्यावेळेस ते लोक म्हणाले की दररोज तरी यावेळेस दहा ते पंधरा लोक गजरा विकण्यासाठी येतात. परंतु आज काय झाले काय माहित नाही.
मी जमतेम पंधरा-वीस मिनिटे गजरीवाल्यांना शोधतच होते. परंतु मला तिथे कुठेच गजरेवाली दिसले नाहीत. माझ्या मैत्रिणी अगदी पुढे गेल्या होत्या आणि मी खूपच पाठीमागे राहिले होते व नंतर मी गजऱ्याचा विचार सोडून नंतर खंडेरायाच्या दर्शनासाठी निघाले. खंडेरायाच्या मंदिरापाशीच खंडेरायांच्या पादुका आपल्याला पाहायला मिळतात.
मग या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतरच आपण आत खंडेरायांच्या दर्शनासाठी जायचं असतं. मी माझ डोके त्या खंडोबारायांच्या ज्या काही पादुका होत्या त्यावरती ठेवलं. तर तिथे मला दोन गजरे भेटले. तिथे जे कोणी भडजी बसलेले होते त्यांनी मला तो गजरा केसात लावायला दिला. मी एकदमच आश्चर्याने थक्क झाले. कारण मी जेमतेम अर्धा तास गजरा हुडकत होते. पण तुम्हाला भेटला नाही.
शेवटी देवांच्या चरणापाशी असलेला गजरा मला घालण्यास मिळाला. त्यामुळे मी खूपच खुश झाले आणि तो गजरा माझ्या केसात घालून मी परत दर्शनासाठी आले होते. परंतु खंडोबाच्या चरणी असलेले गजरे मला केसांमध्ये लावण्यासाठी मिळाले व त्यामुळे मी खूपच खुश झाले. मग नंतर मी आत गाभाऱ्यांमध्ये खंडोबाच्या दर्शनासाठी गेले. तुम्हाला तर माहीतच आहे की दर्शनासाठी गेल्यावर खूपच गर्दी असते. म्हणजे जिथे लोक आहे ते खेचूनच आपल्याला बाहेर काढत असतात. म्हणजेच गर्दी असल्यामुळे होतच असतो.
गर्दी भरपूरच त्या गाभाऱ्यामध्ये होती. खंडोबाच्या मूर्तीपाशी तीन भडजी बसलेले होते. दोन्ही साईडचे भडजी हे आपापल्या साईडचे लोक बाजूला करत होते. म्हणजेच आपण डोके ठेवतो न ठेवतो तर लगेच ते बाजूला करत होते. जेव्हा मी खंडेरायांच्या समोर गेले त्यावेळेस मी दहा मिनिटे तरी खंडेरायांचे दर्शन घेत होते. म्हणजे मी दहा मिनिटे तिथेच उभे होते. परंतु मला कोणीही बाहेर केलं नाही किंवा खेचले नाही. कुणाचे लक्ष होतं की नाही हे काही मला समजलं नाही व ज्यावेळी दहा मिनिटे झाली आणि एकदम मी दर्शन घेऊन ज्यावेळेस बाहेर जायला लागले.
त्यावेळेस एका भडजींनी मला हाक मारली आणि ताई तुम्ही इकडे या. मी जात असतानाच मी परत गाभाऱ्यांमध्ये आले त्यावेळेस बाजूचे दोन भडजी होते ते देखील म्हणाले की तुम्ही दर्शन घेऊन जात आहात आणि तुम्ही परत का आला आहात. तर त्यावेळेस मी त्यांना म्हणले की ते दुसरे भडजी मला बोलवत आहेत. त्यासाठी मी आले. तर त्या भडजीनी त्या भडजीला विचारलं की तुम्ही या ताईंना आत बोलावलं आहात का?
तर त्यावेळेस ते भडजी म्हणाले होते की हो मी त्यांना बोलवलं आहे. मी ज्यावेळेस त्या भडजींपाशी गेले त्यावेळेस त्यांनी मला पदर पसरण्यास सांगितले. मग मी पदर पसरला. तर त्या भडजीनी मला एक नारळ, फुले अशी खणा नारळाची ओटी माझी भरली. तीही खंडेरायांच्या समोर. त्यावेळेस मला इतके रडू आले की एवढ्या जणी आम्ही महिला होतो भरपूर गर्दी होती या सर्वांच्या मध्ये बोलवून मला खंडेरायांच्या समोर माझी ओटी भरली.
त्यावेळेस मला खूपच आनंद झाला आणि माझ्या अंगावर शहारे देखील येत होते आणि मला खूपच रडायला येत होतं. इतकी चांगली प्रचिती मला खंडोबा रायांची आली की साक्षात खंडोबारायांनी माझी खणा नारळाची ओटी भरली होती. ते भडजी माझी ओटी भरून म्हणाले की, हा जो नारळ आहे हा घरी गेल्यानंतर याचे काहीतरी गोड करून तुम्ही खा.
त्यावेळेस मला खूपच मन भरून आलं आणि मला एक खंडेरायांचा अनुभव आला की, स्वतः खंडेरायांनी माझी ओटी भरलेली आहे. मग नंतर आम्ही परत जायला निघालो. हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगावं असं माझ्या मनाला वाटलं. त्यामुळे हा मी अनुभव तुमच्याजवळ सांगितला.
तर मित्रांनो असा हा ताईंचा अनुभव आपल्या देखील अंगावर शहारे आणण्यासारखा होता. खंडेरायांनी या ताईंची खणा नारळाची ओटी भरण्याची ही प्रचिती, हा अनुभव खूपच मन हेलावून टाकणारा होता.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.