मित्रांनो, आताच्या काळामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि त्याचबरोबर रोजच्या काही चुकीच्या सवयी मुळे केसांची समस्या आजकाल खूप गंभीर बनत चालली आहे. हल्लीच्या तणावाच्या जीवनात शरीरावर परिणाम होत आहेत तसेच केसांवरही होतात आणि मित्रांनो दाट, मुलायम केस असावेत, असे प्रत्येकाला वाटते. मात्र वेळेपूर्वी केस पांढरे झाले तर चिंता वाढते. आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर आपण निरनिराळे उपाय करु लागतो. खरंतर मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. त्याचबरोबर धूळ, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे केसांचे पोषकतत्त्व कमी होऊ लागते. याव्यतिरिक्तही तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे केस पांढरे होऊ लागतात.
मित्रांनो यावर काही नैसर्गिक उपायही आहेत. त्यामुळे केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल आणि मित्रांनो केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कल पडणे, केस खराब होणे अशा अनेक समस्या आहेत ज्यामुळे खूप लोक अस्वस्थ आहेत आणि मित्रांनो काही आयुर्वेदिक, पौराणिक असे नैसर्गिक उपाय असतात त्यामुळे तुम्ही तुमचे केस त्यांचं आरोग्य सांभाळू शकता. केसांचं आरोग्य राखण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता आणि मित्रांनो सौंदर्य हे केसामुळेच खुलत त्यामुळे केसांचं सौंदर्य सुद्धा फार महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही केसांसाठी हे नक्की करू शकता. आणि मित्रांनो हा उपाय केल्याने तुमचे केस कायमचे काळे होतील व तुमचं सौंदर्य कायम राहील.
आणि मित्रांनो काळेभोर, लांबसडक, सिल्की केस महिलांचं सौंदर्य अधिकच खुलवतात तर दाट व काळे केस पुरुषांचं सौंदर्य वाढवतात त्यामुळे तुम्ही हा उपाय दोघांसाठी जरूर करू शकता. स्त्री असो वा पुरुष केस वाढवण्यासाठी, केस काळे ठेवण्यासाठी हा उपाय एक चमत्कार ठरेल आणि हा उपाय अगदी साधा, सरळ व सोपा आहे. घरी उपलब्ध असणाऱ्या सामग्रीतून तुम्ही करू शकता. या उपायाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. यामुळे तुमचे केस मजबूत होतील, काळे होतील तसेच काळे राहतील व वाढतील सुद्धा. आयुर्वेदिक परिणाम हे खूप काळापर्यंत राहत असतात त्यामुळे हा आयुर्वेदीक उपाय तुमच्या फायद्याचा आहे.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी एक लोखंडी कढई तुम्हाला लागणार आहे. या कढईमध्ये साधारण एक ग्लासभर स्वच्छ थंड पाणी घ्या, जर तुमचे केस जास्त असतील, मोठे असतील तर पाण्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि त्यानंतर पाण्यात दोन चमचे चहाची पावडर टाकायची आहे ज्यामध्ये केस चमकदार, सिल्की करण्याचे गुण असतात. आणि त्यानंतर आवळा पावडर तुम्हाला लागणार आहे, केसांना मजबूत करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात ते गुणकारी घटक हे आवळ्यामध्ये असतात त्यामुळे त्याची पेस्ट आपण दोन चमचे घेणार आहोत. त्यानंतर लागणार आहे गवती चहा. गवती चहाची थोडी पाने लागणार आहेत, ओला असेल तर उत्तमच किंवा सुकलेली पाने असतील तरी चालतील.
साधारण एक दोन चमचे पावडर होईल इतका गवती चहा घ्यायचा आहे, हे मिश्रण एकत्र ढवळून गॅस वरती उकळून घ्यायचे, छान एकजीव होऊन उकळून घ्यायचे व ज्याचा वास महाभृंगराज तेलासारखा असेल. तसेच हे मिश्रण आटेपर्यंत उकळून न घेता खळखळ उकळून घ्यायचे आहे. त्याचा साधारण रंग बदलतो व यानंतर गॅस बंद करून ठेवायचा आहे.हे मिश्रण रात्री करून झाकून ठेवायचे आहे व सकाळी ते मिश्रण वापरायचे आहे. हे मिश्रण गाळून घेऊन किंवा गाळून न घेता तुम्ही डोक्याला लावू शकता. हे मिश्रण कमीत कमी अंघोळीपूर्वी दोन तास तुम्हाला केसांना लावायचे आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.