मित्रांनो, आपण बराच लोकांच्या हाताच्या बोटामध्ये कासवाची अंगठी घातलेली पाहिलेली असेल. असे म्हटले जाते की, ही अंगठी घातल्यामुळे धनाची बरकत होते. म्हणजेच आपल्या हातामध्ये पैसा टिकून राहतो. कासव हे विष्णूचे रूप मानले जाते. ज्यावेळी समुद्रमंथन होत होता त्यावेळी विष्णू ने कासवाचे अवतार घेऊन या मंथनास सहाय्य केले होते आणि त्यातूनच लक्ष्मी देखील प्रकट झाली होती.
म्हणूनच असे म्हटले जाते की, या कासवाची अंगठी घातल्यामुळे आपल्या हातामध्ये पैसा टिकून राहतो. परंतु सर्वांच्या बाबतीत खरे होते का? त्याचबरोबर कासवाची अंगठी का घालावी? ती कोणी घालावी व या अंगठी चा धातू कोणता असावा? कासवाच्या अंगठी कोणत्या बोटात घालावी व कोणत्या राशीच्या व्यक्तींनी ही अंगठी घालू नये? त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
आपण जाणून घेऊया की, ही अंगठी कोणी घालावी? तर, जा व्यक्तींचा स्वभाव हा आक्रमक आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना लगेच राग येत असतो. त्यांचा स्वभाव खूप रागीट आहे. अशा व्यक्तींनी या कासवाच्या आकाराचे अंगठी घालावी. कारण ज्योतिष शास्त्र मध्ये असे सांगितलेले आहे की, कासव हा पाण्यात राहणारा प्राणी आहे व पाणी हे शितल त्याचे प्रतीक आहे.
त्यामुळे या अशा व्यक्तींनी जर ही अंगठी घातली तर रागीटपणा कमी होण्यास मदत होईल व त्याचे शुभ परिणाम त्यांच्यावर झालेले दिसून येतो. ही अंगठी आपण हातामध्ये घालत असताना याचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार जर आपण हि अंगठी घातली तर नक्कीच त्याचे आपल्यावर शुभ परिणाम होतात व आपल्या हातामध्ये ऐश्वर्या राहते.
जर आपण ही कासवाच्या अंगठी घालणार आहोत तर, ती अंगठी आणल्यानंतर प्रथम आपल्याला ती गायीच्या कच्चा दुधामध्ये बुडवून ठेवायचे आहे. त्यानंतर ती गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. जर आपल्याकडे गंगेचे पाणी उपलब्ध नसेल तर आपण घरातील ताज्या पाण्याने ही अंगठी धूऊ. शकतो. धुतल्यानंतर ती स्वच्छ कापडाने पुसून श्री लक्ष्मीच्या फोटो जवळ किंवा मूर्तीजवळ ठेवावी व लक्ष्मीचे स्त्रोत म्हणावे आणि त्यानंतरच ही अंगठी आपल्या हातामध्ये घालावी.
त्याचबरोबर ज्यावेळी ही आपणास अंगठी हातामध्ये घालत असतो त्या वेळेला त्या कासवाचे तोंड हे आपल्या कडे असले पाहिजे. जर आपण असे केले तर आपल्याकडे पैसे येण्याचे मार्ग हे जास्त होतात. या उलट जर आपण कासवाचे तोंड विरुद्ध बाजूला केले तर आपल्याकडून पैसे निघून जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अंगठी आपण कोणत्या बोटांमध्ये घालावे?
तर ही आमटी आपण दोन बोटांमध्ये घालू शकतो. पहिल्या पहिले बोट म्हणजे आपली मध्यमा जे आपले मधले बोट असते ते आणि दुसरे बोट म्हणजे अंगठ्यानंतरचे जे लागून बोट असते ते. त्या बोटांमध्ये ते सुद्धा आपल्या उजव्या हातामध्येही अंगठी आपण घालावी. ही अंगठी जेव्हा आपण हातामध्ये घालत असतो तो दिवस शुक्रवारचा असावा. त्याचबरोबर या अंगठीचा धातू हा चांदीचा असावा. तर त्या अंगठीच्या पाठीवर म्हणजेच कासवाच्या पाठीवर श्री हे अक्षर कोरलेले असावे.
ज्योतिष शास्त्रानुसार कर्क, वृश्चिक व मीन राशीच्या व्यक्तींनी ही कासवाची अंगठी आपल्या हातामध्ये अजिबात घालू नये. अशाप्रकारे ही अंगठी घालण्याचे काही नियम आहेत. त्याप्रमाणे तुम्ही देखील जर अंगठी घालणार असाल तर नक्कीच घाला. कारण या अंगठीचे फायदे देखील खूप आहेत. ही अंगठी आपल्या हातामध्ये घातल्यामुळे आपला हातात लक्ष्मी टिकून राहते. आपल्या हातामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो व आपल्या धनाची बरकत होते. पैसा टिकून राहतो.
अशाप्रकारे कासवाची अंगठी का घालावी व कशी घालावी व त्याचा धातू कोणता असावा या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेतलेली आहे.