मित्रांनो तुम्हाला सर्दी खोकला कफ असेल यासोबतच वारंवार सर्दी होत असेल नाकाला शेंबूड असेल अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. वारंवार सर्दी होणे हे लक्षण प्रतिकार शक्ती कमी असल्याचे लक्षण आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी होणे अशा व्यक्तींना सर्दी हा आजार साधारणतः तीन दिवसांपर्यंत असतो. परंतु या वेळेमध्ये तर काही घरगुती उपाय किंवा काही औषध नाही घेतले तर सर्दी वाढते. तसेच घशाचे इन्फेक्शन यासोबत डोकेदुखी तसेच अंगदुखी ताप येतो. पुढे खोकला छातीमध्ये कफ होतो. असा खूप त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी आपण एक सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत. या उपायांमुळे कसल्याही प्रकारेची सर्दी पडसे खोकला कमी होतो.
मित्रांनो सर्दी खोकला कफ कफ छातीत भरल्यामुळे छातीत घरघर आवाज येणे, नाक बंद होण, त्याचप्रमाणे ताप येणे आणि सर्दीमुळे नीट बोलता येत नाही असे त्रास होतात. आपण औषध म्हणून सिरप-गोळ्या घेतल्या किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेतल्या तरी सर्दी लगेच कमी होत नाही. इनहेलर वापरले तरीही सर्दी साधारणतः थोड्या वेळाने सर्दी पुन्हा परत येते. गोळी घेतली तरी तीन तासानंतर सर्दी खोकला परत येतो. अशा सर्व समस्यांवर अत्यंत सोपा उपाय जाणून घेणार आहोत.
मित्रांनो हा उपाय छोट्या पासून मोठ्यापर्यंत सर्वांना उपयोगी आहे. म्हणजेच वय वर्ष तीन पासून म्हातारपणापर्यंत कुठलाही व्यक्ती सहजरित्या हा उपाय करू शकतो.
मित्रांनो यासाठी आपल्याला आपल्या देवघर यामध्ये सहज उपलब्ध होणारी वस्तू म्हणजेच कापूर. कापूर पूजेसाठी वापरतात कारण कापूर जाळल्यानंतर वातावरणात ऑक्सिजनचे निर्मिती होते. इतर घटक जाळल्यानंतर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडची किंवा इतर विषारी घटकांची निर्मिती होते. पण कापूर जाळला तर वातावरणात ऑक्सिजनचे निर्मिती होते. कापरामध्ये अनेक असे घटक आहेत की जे आपल्याला उपयोगाला पडतात.
मित्रांनो या उपायासाठी भीमसेनी कापूर वापरा. भीमसेन कापूर मिळाला नाही तर तुम्ही साधा कापूर वापरला तरी चालेल. कापूराची बारीक पावडर करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक स्वच्छ एक रुमाल घ्या. या रुमालामध्ये कापराची पावडर घालून रुमलाला गाठ मारा म्हणजे छोटीशीच पुरचुंडी तयार होईल. हा रुमाल ज्या व्यक्तीला सर्दी, खोकला झाला असेल त्याच्या नाकाजवळ ठेवून हळुवारपणे त्या कापराचा वास घ्यायचा आहे.
मित्रांनो छोट्या मुलांना तीन मिनिट म्हणजे वय वर्ष तीन ते पंधरा पर्यंत तीन ते पाच मिनिट द्या आणि वय वर्ष १५ पासून ते म्हातारपणापर्यंत तुम्ही गच्च नाक मोकळे होईपर्यंत वापरू शकता. तर आज पाच ते दहा मिनिटे जर तुम्ही हा वास घेतला तर त्यानंतर एखादा तास आराम करा. पुन्हा पाच ते दहा मिनिटे हा वास घेतला तर तुमची सर्दी कफ खोकला सर्व काही दूर होईल. यासोबत मित्रांनो तळलेले पदार्थ, कोल्ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम हे पदार्थ खाण्याचा मोह टाळा.
मित्रांनो हा खूप लोकांचा अनुभव आहे आणि या अनुभवाचा वापर करून बऱ्याच लोकांना फायदा झाला आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. कापराचा वास घेऊन तुम्ही तुमची सर्दी सहजपणे दूर करू शकता.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.