मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना अनेक वेळा अंघोळ करताना किंवा स्विमिंग केल्यानंतर कानामध्ये पाणी गेल्यास, घशाचे इन्फेक्शनमुळे, सर्दी-पडसे यांच्या इन्फेक्शनमुळे किंवा कानात साचलेला मळ घट्ट झाल्यामुळे यासारख्या अन्य कोणत्याही समस्येमुळे जर तुमचा कान दुखत असेल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अनेकांना कानात बोटे घालण्याची, कानामध्ये चावी घालण्याची तसेच कानामध्ये टोकदार वस्तू घालण्याची सवय असते व अनेकदा आपण कोणत्याही काडीने किंवा गाडीच्या चावीने आपल्या कानातील मळ काढत असतो. अशा वेळी आपल्या कानाला कळत नकळत इजा होऊन कान दुखू लागतो.
अशा वेळी कोणत्याही कारणामुळे सुरू झालेली वेदना आजच्या या उपायांमुळे लवकर नष्ट होते. तर मित्रांनो अगदी सोपा हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो. हा उपाय करत असताना आपण फक्त कानामध्ये टाका हे फक्त दोन थेंब. कानातून पु येणे किंवा पु होणे, कान फुटणे, कानात आवाज होणे, ऐकायला कमी येणे, कानाचे पडदे खराब होणे अशा प्रकारचे अनेक कानासंबंधी आजार बरे होतात.
आपले कान साफ करण्यासाठी, कानातील मळ काढण्यासाठी कानातील कोणतीही समस्या नसणाऱ्या व्यक्तीने वर्षातून दोन वेळा जर हा उपाय केला तर काना संबंधित कोणतेही आजार त्याला होणारच नाही व कानातील घाण मळ निघून जाईल.
चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो महत्त्वाचा घटक लागणार आहे तो म्हणजे पांढरा कांदा. मित्रांनो आपल्याला हा उपाय करत असताना फक्त पांढरा रंगाचा कांदा वापरायचा आहे. मित्रांनो आपण जो दररोजच्या वापरामध्ये असणारा लाल कांदा या उपायासाठी वापरायचं नाही.
मित्रांनो पांढरा कांद्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे आपल्या कानामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर होतातच आणि त्याचबरोबर यामुळे आपल्या सर्दी, खोकला, छातीतील कफ यासारख्या समस्या ही दूर होतात. म्हणूनच मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला पांढऱ्या रंगाच्या कांद्याचा वापर करायचा आहे.
तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा कांदा घ्यायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला हा कांदा गॅसवर भाजून घ्यायचा आहे. मित्रांनो कमीत कमी पाच ते दहा मिनिटे तुम्हाला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. मित्रांनो हा कांदा वरून थोडा थोडा काळा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅस बंद करून हा कांदा सोलून घ्यायचा आहे म्हणजेच मित्रांनो या कांद्यावर असणारा जो पहिला भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे.
त्यानंतर आपल्याला खलबत्त्याच्या सहाय्याने हा कांदा बारीक करून घ्यायचा आहे. मित्रांनो तुम्ही मिक्सरच्या सहाय्याने हा कांदा बारीक करून घेऊ शकता. अशा रीतीने हा कांदा बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला कापडाच्या सहाय्याने या कांद्याचा रस काढून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने याचा रस काढून घेतल्यानंतर आपल्याला फक्त रात्रीच्या वेळी झोपत असताना या पांढऱ्या कांद्याचा रस आपण काढून घेतलेला आहे हा थोडासा गार झाल्यानंतर आपल्या उजव्या कानामध्ये दोन थेंब टाकायचा आहे आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर डाव्या कानामध्ये दोन थेंब टाकायचा आहे. मित्रांनो जर तुम्हाला कानदुखी आणि त्याचबरोबर कानातील मळ किंवा अचानकपणे सर्दी, खोकला, कफ यांसारख्या समस्या उद्भवल्या असतील तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता.
मित्रांनो अशा पद्धतीने दोन्ही कानांमध्ये दोन दोन थेंब आपल्याला या रसाचे टाकायचे आहेत. मित्रांनो थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला याचा चांगला परिणाम झालेला दिसून येईल. तुमच्या कानासंबंधित असणाऱ्या सर्व समस्या या उपायाने दूर होतीलच आणि त्याचबरोबर सर्दी, खोकला, छातीतील कफ याही समस्या या उपायामुळे दूर होतील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.