मित्रांनो आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये खूप सारे झाडे वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात आणि ही झाडे हवा शुद्ध राखण्याचे काम करतातच. त्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी देखील खूपच महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक असे घरगुती उपाय आहेत हे उपाय जर आपण केले तर आपल्या अनेक आरोग्याच्या समस्या दूर होतात. म्हणजेच अनेक आजारांपासून आपली सुटका देखील होऊ शकते. परंतु कोणत्या वनस्पतीचा वापर हा कोणत्या आजारावरती करायचा हेच माहिती नसल्या कारणाने आपण घरगुती उपाय करणे टाळतो.
परंतु असे काही छोट्या छोट्या आजारांवरती या वनस्पती खूपच फायदेशीर आहेत. ज्यामुळे आपल्याला पैसा देखील खर्च होणार नाही. तर अशाच एका वनस्पती बद्दल आज आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो आपल्या आजूबाजूला जास्वंदीचे झाड हे प्रत्येकाने पाहिले असेलच.
आता सर्रास आपणाला आपल्या घराभोवताली जास्वंदीचे झाड हे प्रत्येकजण लावलेले आपल्याला पाहायला मिळते. तर हे जास्वंदीचे जे झाड आहे त्याची पाने, फुले हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात. आपण फक्त त्याची फुले देवपूजेसाठी वापरतो. परंतु हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर कसे ठरतात हे जाणून घेऊयात.
तुम्हाला जर केस गळतीची समस्या असेल म्हणजेच तुमचे केस पांढरे झाले असतील तसेच केस गळत असतील, केसांची वाढ नसेल तसेच आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल किंवा अनेकांना पोटा संबंधित आजार असतील म्हणजेच पोटामध्ये दुखत असेल तसेच शरीरावरती सूज आलेली असेल, गुडघेदुखी असेल तर या सर्वांवरती हे जास्वंदीचे झाड खूपच फायदेशीर ठरते.
तर तुम्हाला जर पोटामध्ये त्रास असेल म्हणजेच पोट दुखीचा त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही पाच ते दहा मिली जास्वंदीच्या पानाचा रस काढून तो जर सेवन केला तर यामुळे तुमची जे काही पेट दर्द असेल तो नक्कीच दूर होणार आहे.
तसेच मित्रांनो जर तुम्हाला तुमचे केस घनदाट हवे असतील तसेच काळेभोर हवे असतील तर तुम्ही या जास्वंदीच्या पानांची पेस्ट बनवायची आहे म्हणजेच ही पाने तोडून स्वच्छ धुऊन त्याची पेस्ट बनवून घेऊन ही पेस्ट जर तुम्ही आपल्या केसांना लावलीत तर यामुळे देखील तुमचे पांढरे केस काळे होतील आणि तुमची केस गळण्याची समस्या देखील दूर होईल. तर ही जी पेस्ट आहे ही पेस्ट तुम्ही लावल्यानंतर केसांवरती ती दोन तास तशीच ठेवायची आहे आणि नंतर आपले केस धुवायचे आहेत.
जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा रस काढायचा आहे आणि त्यामध्ये तिळाचं तेल देखील घालायचे आहे. म्हणजेच फुलांचा रस आणि तिळाचे तेल हे समप्रमाणात तुम्हाला घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला उकळवायचे आहे आणि नंतर उकळल्यानंतर हे तेल तुम्ही आपल्या केसांना लावायचे आहे. आठवड्यातून तुम्ही दोन वेळा हा जर उपाय केला तर केसांमधील कोंडा नक्कीच दूर होतो.
तसेच तुमच्या शरीरावरती सूज आली असेल तसेच तुम्हाला जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही यासाठी जास्वंदीच्या पानांचा तसेच फुलांचा रस काढायचा आहे म्हणजेच काय करायचे जास्वंदीची पाने आणि फुले ही प्रथमतः घ्यायची आहे. ती स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ही वाटून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला सुजन म्हणजे सूज आलेली आहे तसेच गुडघेदुखीचा त्रास आहे त्या ठिकाणी हा फुलांचा आणि पानांचा जो आपण लेप केलेला आहे एकत्र तो लेप लावायचा आहे.
यामुळे तुमच्या शरीरावर असलेली सूज तसेच गुडघेदुखी नक्कीच कमी होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा आणि पानांचा आपल्या जीवनामध्ये वापर केला तर अनेक आजारांपासून आपली नक्कीच सुटका होणार आहे. यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होणार आहेत.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.