मित्रांनो आज आपण घरगुती पद्धतीने कसे आईस्क्रीम करायचे आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत यासाठी तुम्हाला कोणत्या मशीन ची गरज लागणार नाही किंवा कोणत्या बॅटरची देखील या ठिकाणी तुम्हाला मदत लागणार नाही अगदी जशे मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी आईस्क्रीम बनवणार आहोत या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बिस्कीट घ्यायचे आहेत तुम्हाला जे बिस्किट आवडतं ते तुम्ही घेतला तरी देखील चालू शकतो.
त्याच्यानंतरन या ठिकाणी अर्धा लिटर दूध घ्यायच आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी जेवढे दूध घट्ट असेल तेवढेच ते आईस्क्रीम देखील चांगलं बनणार आहे दुधाला मंद आचेवर आपल्याला पाच मिनिटे उकळून घ्यायच आहे त्याच्यानंतर जी आपण घेतलेली बिस्किट आहेत त्याला एकदम बारीक असं बारीक करून घ्यायच आहे. आपण जे बिस्किट चे तुकडे करून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत व आपल्याला ते एकदम बारीक करून घ्यायचा आहे.
दूध चांगल्या प्रकारे उकळून आपल्याला घ्यायच आहे गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे. आपण जे मिक्सरमध्ये बिस्कीटची पावडर तयार करून घेतलेली आहे ती एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आपण जर डायरेक्ट दुधामध्ये पावडर टाकली तर त्याच्या गाठी बनू शकतात व त्या आपल्यालाच त्याचा त्रास होणार आहे त्याच्यामुळे आपण ती पावडर एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे व जितकं आपल्याला त्याच्यामध्ये दूध लागणार आहे तेवढे दूध आपण त्या वाटीमध्ये घालत राहायचं आहे.
जेवढे तुम्ही पावडर तयार केलेली आहे त्या हिशोबाने तुम्हाला त्या ठिकाणी दूध वापरायच आहे त्यामूळे त्याच्या मध्ये गाठी होणार नाहीत याची या ठिकाणी काळजी घेणे फारच गरजेचे आहे आणि याच्यानंतरनं आपण जी पेस्ट तयार केलेली आहे त्याला उकळत्या दुधामध्ये आता घालायचा आहे या ठिकाणी आपल्याला आता चार ते पाच मिनिट हे आपल्याला उकळून घ्यायच आहे त्याच्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे.
जेवढे तुम्हाला गोड पाहिजे आहे त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी साखर वापरायचे आहे आपल्याला ती सतत हलवतच राहायचं आहे जर आपण हलवन बंद केलं तर ते कडाईला चिटकू शकतो त्याच्या नंतर आपल्याला ते जे मिश्रण आहे ते गॅसवरून खाली उतरून घ्यायच आहे थोड्या वेळ गार होण्यासाठी आपल्याला ते तसेच सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक वाटी इतकी मलई घ्यायची आहे.
मलई या ठिकाणी अत्यंत उपयोगाचे आहे मला जर जास्त असेल तरच आईस्क्रीम चांगलं होणार आहे कढईमध्ये जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते एका मोठ्या वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्हाला काढून घ्यायच आहे आईस्क्रीम चा जो आपण बेस तयार केलेला आहे तो आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे कमीत कमी सहा ते सात तास आपल्याला तसेच ते फ्रीजमध्ये ठेवायच आहे. याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मलई घालणार आहोत.
सहा तासानंतर आपल्याला जसा आईस्क्रीम चा बेस लागणार आहे त्या प्रकारे तयार झालेला असतो त्याच्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचा आहे आईस्क्रीमच्या बेसला फेटण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी चाकूच्या साह्याने ते कट करून घ्यायच आहे लहान लहान आपल्याला त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट आपल्याला चांगल्या प्रकारे हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे जेवढा आपण आईस्क्रीम ला फेटणार आहोत.
तितकेच ते सॉफ्ट क्रीमी आणि डबल क्रिमी आईस्क्रीम तयार होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एका मोठ्या चमच्याने जो गोलाकार असतो त्या चमच्याने आपल्याला त्यातलं मिश्रण काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते सर्व मिश्रण पुन्हा एकदा बारीक करून घ्यायच आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मलई घालायची आहे मलई घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हवं ते इसेन्स घालून तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता.
त्याच्यानंतर तुम्हाला किती प्रकारची आईस्क्रीम करायचे आहे तितकी तुम्ही इसेन्स घेऊ शकता व तितक्या तुम्ही वेगवेगळ्या वाटीमध्ये ते मिश्रण घालू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक करून पिस्ता टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर बारीक चिरून बदाम देखील टाकायच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्रश देखील वापरायचा आहे क्रश मुळे आईस्क्रीमला आणखी ज्यादा चव येते.
तुमच्याकडे जर चांगले टोपणाचे डबे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये काढू शकता जर नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये घेऊन त्याला एकदम बंद असे करायचे आहे जेणेकरून त्याच्या आत मध्ये हवा नाही गेली पाहिजे अशा रीतीने तुम्हाला ते बंद करून घ्यायच आहे व त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सात तासांसाठी ते फ्रीजमध्ये ठेवायच आहे त्याच्यानंतर ना आपल्याला फ्रीजमधून बाहेर काढून बघायचा आहे तर आपल्याला जसं मार्केटमध्ये मिळतं त्या प्रकारे आईस्क्रीम तयार झालेल आहे तर मित्रांनो घरगुती असे हे आईस्क्रीम तुम्ही आवश्य करून पहा.