मित्रांनो, आपल्याला प्रत्येकालाच माहित आहे की स्वामींची केलेली सेवा कधीही चुकीची ठरत नाही. कारण जी काही आपण स्वामींची सेवा करत असतो, भक्ती करत असतो त्याचे फळ हे आपल्याला स्वामी देतच असतात. फक्त ते फळ देण्यासाठी योग्य वेळ यावे लागते. स्वामी समर्थ सेवेमध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण देखील करतो आणि हे पारायण सर्वात श्रेष्ठ पारायण म्हटले जाते. कारण यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. आपल्या ज्या काही मनोभावना आहेत त्या पूर्ण होत असतात.
म्हणून लोक अत्यंत भक्तीने व निष्ठेने या चरित्राचे पारायण करत असतात. हे पारायण करत असताना एका भक्ताला खूप मोठा चमत्कारी अनुभव आलेला आहे. तोच अनुभव आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कशाप्रकारे हे चरित्राचे पारायण चालू असताना त्यांना स्वामी अनुभव कसा आला? कशाप्रकारे त्यांना स्वामींचे केलेल्या सेवेचे फळ मिळाले? याचे सत्य अनुभव आपण जाणून घेणार आहोत.
असे म्हटले जाते, ‘गुरु बघ सांगे गुरुचे रक्षण, गुरु चरित्राचे कर पारायण’ गुरुचरित्राचे पारायण केला मुळे आपल्याला दत्त महाराजांचे साक्षात वास्तव आपल्या घरामध्ये राहते. असे म्हटले जाते त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. याच गुरुचरित्राचे पारायण करत असताना एका महिलेला त्याचा खूप मोठा अनुभव साक्षात्कार आलेला आहे. ही महिला एका कंपनीमध्ये कामाला होती. या महिलेचा पती देखील त्याच कंपनीमध्ये कामाला होता.
या महिलेची जनरल शिफ्ट होती. तर तिच्या पतीची फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट अशा दोन शिफ्ट मध्ये त्यांचे प्रत्येक काम करत होते. तर त्यात ताईचे जनरल शिफ्ट ही नऊ ते सहा या वेळेची होती. गुरुचरित्राचे पारायण महिला करत होती. तो गुरुचरित्र पारायण करण्याचा सप्ताह चालू होता आणि या काळा मध्येच तिचे गुरुचरित्र देखील पारायण करणे चालूच होत. गुरुचरित्र पारायण चा सहावा दिवस होता आणि त्या दिवशी या महिलेने त्यांचे गुरुचरित्रावर पारायण मधील असलेले सहाव्या दिवसाचे जे काही अध्याय आहेत ते व
संपूर्ण वाचन केले.
वाचन झाल्या नंतर तिने घरातून सर्व काम आटपले. तिच्या पतीची फर्स्ट शिफ्ट असल्याने त्या दोघांनी देखील नाष्टा करून बाहेर निघायचे ठरवले. महिला सर्व घरातील कामे नीटनेटकेपणाने अटपले व नाश्ता तिच्या पतीला नेऊन दिला व आपण देखील केली आणि ज्या कढईमध्ये तिने नाश्ता तयार केला होता त्या कढईचा गॅस ती बंद करण्याऐवजी बारीक केला आणि नाश्ता करून ती महिला जॉब वर जाण्यास निघाली.
आपल्यामध्ये बरेच लोक असे असतात की घरातून निघण्याआधी आपण सर्व काही बंद आहे की नाही हे पाहत असतो. परंतु महिलांच्या बाबतीत हे कधी ना कधी चुकतेच. त्याप्रमाणेच या महिलेच्या बाबतीत देखील झाले. ती घाई गडबडी मध्ये आपले काम अटकून कामाला जाण्यासाठी निघाली आणि या गडबडीमध्ये ती गॅस बंद करायचा विसरून गेली. सकाळी नऊ वाजता ही महिला घरातून बाहेर पडली होती. ते संध्याकाळी साडेसहा वाजता घरामध्ये पोहोचली.
घरामध्ये पोचल्यानंतर तिला लक्षात आले की घरामध्ये खूप गॅस चा वास पसरलेला आहे. यावेळी घराची लाईट देखील गेली होती. त्यामुळे तिने लाईट न चालू करता अंधारामध्ये गॅस कडे गेली व प्रथम बंद केला. बंद केल्यानंतर तिच्या लक्षात आले की आपण पारायण करत असताना अखंड दिवा लावलेला आहे. त्या अखंड दिवा पाहण्यासाठी ती देव्हाऱ्याजवळ गेली. त्यावेळी तिला असे जाणवले की तो दिवा बंद झालेला आहे.
तेवढा लाईट आली व तिला असे दिसले की ज्या ठिकाणी तिने गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवला होता त्याच्या बाजूला दिवा लावला होता व त्याचाच साईडला एक कलश होता त्या कलश मधील फुल त्या दिवावर पडलेल्या आहेत. अशा प्रकारे तो आघात झाला नाही. तिला असे लक्षात आले की जर दिवा चालूच राहिला असता तर खूप मोठा अपघात झाला असता आणि त्या अपघाताचा परिणाम आजूबाजूला राहणार लोकांवरती देखील झाला असता.
तिला लक्षात आले की ती ने केलेला गुरुचरित्र पारायण फळ तिला मिळालेले आहे आणि एवढा मोठा अपघात होण्यापासून स्वामी महाराजांनी तिला वाचवले आहेत. अशा प्रकारे आपण केलेला कोणत्याही स्वामी सेवेचे फळ हे आपल्याला ज्या त्या वेळेनुसार हे देतच असतात व कधीही आपल्या भक्तांना कोणताही संकटामध्ये एकट्याला सोडत नाही. ते सतत त्यांच्य त्यांच्या पाठीशी उभे असतात. त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. ते सतत म्हणत असतात, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’.
अशाप्रकारे या माहिलेला गुरुचरित्र पारायण करत असताना अत्यंत चमत्कारिक अनुभव घडून आलेला आहे.