मित्रांनो, आजकाल विविध प्रकारचे आजाराना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना गुडघेदुखी, कंबरदुखी, पोटदुखी असे अनेक आजार सहन करावे लागत आहेत. गुडघेदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही एक गावरान उपाय सांगणार आहोत. हा गुडघेदुखीवरचा अतिशय गुणकारी घरगुती उपाय चाळिशी ओलांडलेला जवळजवळ प्रत्येक जण या गुडघे दुखीने हैराण आहे. पूर्वीची हेल्दी ऍक्टिव्ह लाईफ स्टाईलची जागा फास्ट फूड जंक फूड आणि धावपळीच्या जीवनात घेतल्याने आपल्या स्वास्थ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.
मित्रांनो शिवाय आपल्या शरीराचे वेगवेगळे संकेत न ओळखल्याने फार कमी वयातच गुडघेदुखी मणके दुखी यासारखे अनेक व्याधी माणसाला जखडून टाकतात. गुडघेदुखी आणि सांधेदुखीची समस्या इतकी गंभीर होऊन जाते की, अनेक वेळा डॉक्टर ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. मात्र मित्रांनो ऑपरेशन नंतर देखील तुमची समस्या पूर्णपणे समाप्त होते असे नाही. आयुर्वेदात असे अनेक उपचार आहेत की ज्यामुळे तुमचे गुडघेदुखीची सांधेदुखीची समस्या कायमची बरी होते. फक्त विश्वास ठेवून वेगवेगळे उपाय करावे लागतात.
मित्रांनो कारण प्रत्येक तुमच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकृतीच्या असल्याने इतरांनी केलेला उपाय तुम्हालाही लागू होईलच असे नाही. म्हणून आजचा हा उपायदेखील अनेकांनी करून पाहिलेला आहे त्यांना गुणकारी ठरलेला आहे. तुम्ही देखील तो अगदी सहजपणे अगदी फुकटात करू शकता.
मित्रांनो, सांधेदुखीचे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियमची कमतरता ही कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी गव्हाच्या आकाराचा एवढा चुना अर्धा ग्लास उसाच्या रसात किंवा ताकामध्ये मिसळून आठवड्यातून दोन ते तीन वेळा पिल्याने शरीराची आवश्यक प्रमाणात असलेले कॅल्शिअमची पूर्तता होते.
मित्रांनो यानंतर आपण या गुडघेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी बाहेरून करायचा उपाय कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत. या उपायासाठी आपल्याला जायफळ सुंठ आणि तिळाचे तेल लागणार आहे.
मित्रांनो, एका वाटीत अर्धा चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घेऊन ठेवा. यानंतर एका वाटीत चार चमचे तिळाचे तेल गरम करून घ्या. हे गरम झालेलं तेल सुंठ आणि जायफळ च्या मिश्रणात घाला चमच्याने व्यवस्थित एकजीव करा आणि यामध्ये एक स्वच्छ कापड ची पट्टी बुडवा. ही पट्टी गरम असतानाच गुडघ्यावरती ठेवा आणि यावर प्लास्टिकची पिशवी किंवा प्लास्टिकचा पेपर बांधून ठेवा. हा कापडाची पट्टी गुडघ्यावर रात्रभर तशीच राहू द्या आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना गरम पाण्याने गुडघ्याला गरम पाण्याने धुवा हा उपाय सलग सात दिवस करा.
हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. रात्रभर हे असेच बांधून राहू द्यावे. सलग तीन दिवस हा उपाय केल्याने चौथ्या दिवशीच तुम्हाला फरक अनुभवायला मिळेल. आणखी काही दिवस हा उपाय केला तर तुमची गुडघेदुखी पूर्णपणे थांबेल.
मित्रांनो हा गावरान उपाय खूपच फायदेशीर आहे. या उपायाने तुमच्या गुडघ्यातील वंगण संपली असेल, गुडघ्याची वाटी झिजली असेल, गुडघे खूप दुखत असतील, गुडघ्याचे ऑपरेशन करायला सांगितले असेल खूप औषध खाल्ले असतील तर मित्रांनो हा उपाय करून पहा. या उपायाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.