जिथे मोठे मोठे डॉक्टर इलाज करून थकून जातात तिथे ही चमत्कारिक वनस्पती जडी ब्युटीचे काम करते ही वनस्पती अनेक रोगावरती फायदेशीर …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या आसपास अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर ठरतात. म्हणजे आपल्या आसपास जेव्हा निसर्ग हा हिरवागार असेल तेवढा आपणाला झाडांपासून ऑक्सिजनचा पुरवठा देखील होतो. तसेच वातावरण शुद्ध ठेवण्याचे काम हे आपल्या आसपास असणारी झाडे करत असतात. म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी वनस्पती म्हणजेच झाडे हे खूपच फायदेशीर असतात. त्यामुळे आपण जास्तीत जास्त करून आपल्या आजूबाजूला जास्ती झाडे लावणे गरजेचे आहे. मित्रांनो आज काल बरेचसे आजार डोके वर काढताना आपल्याला पाहायला मिळतातच.

दररोज काही ना काही नवीन रोग हे उद्भवतच राहतात. अशा वेळेस मग आपण घाबरून डॉक्टरांचा सल्ला घेतो. डॉक्टरांनी दिलेली औषधे, गोळ्या सेवन करण्यामध्ये आपण खूप सारा खर्च देखील करीत राहतो. परंतु मित्रांनो तुम्ही जर काही घरगुती उपाय केले तर आपल्या आजारांवरती आपण मात देखील करू शकतो. परंतु कोणत्या वनस्पतींचा वापर कोणत्या रोगावरती करायचा याची आपल्याला पुरेपूर माहिती नसते. त्यामुळे आपण घरगुती उपाय करणे याकडे जरा दुर्लक्ष करतो.

परंतु जर तुम्ही घरगुती उपाय जर केला तर तुमचा जो काही औषधांवरती खर्च होणार आहे हा खर्च देखील होणार नाही. तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशी एक आयुर्वेदिक गुणकारी अशी वनस्पती सांगणार आहे या वनस्पतीचे आपल्याला खूप सारे फायदे आपल्या आरोग्यासाठी होऊ शकतात. या वनस्पतीला शक्यतो करून सगळीजणच दुर्लक्ष करीत राहतात. ही वनस्पती जी आहे ही वनस्पती विहिरीच्या काठाशी तसेच नदी तलाव या काठाशी उगवलेली असते. परंतु आपल्याला याचा काही फायदाच न माहीत असल्याकारणाने आपण त्याचा काहीच वापर करत नाही. तर ही वनस्पती आहे ती म्हणजे घाणेरी.

घाणेरी वनस्पती आहे याची जी काही पाने आहेत फुले आहेत किंवा जे काही त्याची फळे आहेत हे आपल्या आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच फायदेशीर ठरतात. याची फळे असतात ते पहिल्यांदा हिरवी असतात आणि पिकल्यानंतर ती काळ्या कलरची होतात. तसेच गावाकडील जे लोक असतात हे लोक घाणेरी वनस्पतीची जी काही पाने आहेत ती पाने सुकवतात आणि नंतर ती पाने जाळल्यानंतर त्याचा काही धूर होतो या धुरामुळे जे काही आपल्या घरामध्ये मच्छर असतील डास असतील हे नक्कीच निघून जातात.

म्हणजेच डासांपासून मुक्तता हवी असेल तर घाणेरी वनस्पतीची पाने आपल्याला फायदेशीर ठरतात आणि गावाकडे लोक याचा वापर देखील करीत असतात. तुम्हाला एखादी जर जखम झाली असेल तर तुम्ही या घनेरी वनस्पतीची जी काही पाने आहेत याची पेस्ट करून जर तुम्ही त्या जखमेवरती लावली तर तुमची जी जखम आहे ती नक्कीच भरून येईल.

तसेच जर तुम्हाला काही ताणतणाव येत असेल म्हणजे डोकेदुखीची समस्या असेल तर तुम्ही याची पेस्ट करून आपल्या जर माथ्याला लावली तर यामुळे तुमची जी डोकेदुखी आहे ती कमी होण्यास नक्कीच मदत होईल. अनेक लोकांचे दात हे दुखत असतात म्हणजेच दात दुखीचा जो काही तुम्हाला त्रास सहन करावा लागतो हा जर कमी व्हावा असे वाटत असेल तर तुम्ही या घनेरी वनस्पतीची पाने आहेत ही पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत आणि त्या पाण्याने जर तुम्ही गुळण्या केल्या तरी यामुळे तुमची दात दुखीची समस्या देखील नक्कीच दूर होईल.

तसेच मित्रांनो जर तुम्हाला काही त्वचे संबंधित आजार असतील म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावरती वगैरे काहीतरी फोड मुरमाचे डाग असतील तर तुम्ही या घनेरी वनस्पतींची जी पाने आहेत त्याची पेस्ट करायची आहे आणि ते आपल्या त्वचेवर लावायचे आहे. यामुळे तुमचे चेहऱ्यावरती किंवा हाता पायावरती काहीतरी फोड वगैरे आले असतील तर ते नक्कीच गायब होतील.

त्याचप्रमाणे आपल्याला सर्दी, खोकल्याचा त्रास देखील खूपच असह्य होतो. म्हणजेच बऱ्याच वेळा आपल्याला नाक हे खूपच गच्च झालेले असते. तर त्यावेळेस तुम्ही या घनेरी वनस्पतीची जी पाने आहे ती पाने थोडीशी चुरगळायची आहेत आणि त्याचा जो वास आहे तो वास आपण घ्यायचा आहे. यामुळे तुमचे बंद झालेले नाक नक्कीच रिकामे होईल. तुमचे जे काही सर्दी आणि खोकल्याचा त्रास असेल यातून तुमची नक्कीच सुटका होईल.

तसेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना चेहऱ्यावरती तसेच इतरत्र त्वचेवरती पांढरे डाग देखील असतात. या पांढऱ्या डागामुळे आपल्या सौंदर्यामध्ये कमीपणा येतो. त्यामुळे आपल्याला कुठेही जाण्यास आपण तयार होत नसतो. कारण पांढऱ्या डागामुळे आपणाला खूपच लाजिरवाने वाटत असते. तर या पांढऱ्या डागावरती देखील ही वनस्पती खूपच फायदेशीर आहे. म्हणजेच या घनेरी वनस्पतीची पाने आहेत ही पाने वाटून म्हणजेच याची पेस्ट करून खोबरेल तेलामध्ये मिक्स करून ही जर पेस्ट आपण लावली तरी यामुळे आपले पांढरे डाग नक्कीच गायब होतील.

तसेच या घनेरी वनस्पतीचे जे काही बीया आहेत म्हणजे जे काही फळ आहेत या बिया ज्या वेळेस हिरव्या असतात त्यावेळेस त्या बिया घेऊन त्याची पेस्ट बनवून ती देखील खोबरेल तेलामध्ये मिक्स करून जरी लावलीत तरी देखील आपला त्वचारोग म्हणजे ज्या ठिकाणी आपणाला पांढरे डाग आलेले आहेत त्या ठिकाणी लावले तरी यामुळे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल की आपले पांढरे डाग हे गायब झालेले आहेत.

हा उपाय जर तुम्ही सलग पंधरा दिवस केला तर तुमचे पांढरे डाग नक्कीच जातील. तर अशी ही आयुर्वेदातील चमत्कारिक अशी वनस्पती आहे. जी अनेक आजारांवरती आपणाला खूपच फायदेशीर ठरते. तर तुमच्याही आसपास ही जर वनस्पती असेल तर तुम्ही वरीलपैकी कोणताही त्रास तुम्हाला असेल त्यावरती अवश्य याचा उपाय करून पहा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.