मृत्यूच्या वेळी आपल्या शरीरासोबत काय घडत असते? कसा असतो यमलोक प्रवास : जाणून घेऊ गरुड पुराण भाग १ …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो मानवाला त्याच्या पाप आणि पुण्यानुसार शिक्षा दिली जाते म्हणजेच कर्माच्या भोगामुळे आत्मा आपले वर्तमान शरीर सोडतो त्यावेळी मनुष्याचे काय होते? याबद्दलची विशेष माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो संसारात जन्म घेऊन मनुष्य पूर्व जन्मात केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे चांगले वाईट फळ भोगतो. मृत्यू जवळ आला की कुटुंबातच रडत रडत तो जीव सोडून देऊन त्याग करतो. जेव्हा चेतन शरीर पदार्थ सारखे बनते जेव्हा व्यक्तीचा आत्मा घशात अडकतो त्यावेळी त्या व्यक्तीला दिव्यदृष्टी प्राप्त होते.

 

ज्या दृष्टीने तो हे संपूर्ण जग एका दृष्टिक्षेपात पाहू लागतो. मात्र काही बोलू शकत नाही. या कारणास्तव जवळ आलेल्या भीतीमुळे प्राणादी वायू आपल्या ठिकाणाहून निघतो त्यावेळी मृत व्यक्तीचा एक क्षणही अनेक युगासारखा जातो. आपल्याला शंभर विंचू चावल्या नंतर जी वेदना होईल. इतक्या भयंकर वेदना त्यावेळी होत असतात.

 

यमदूताच्या भीतीने त्या प्राण्यांच्या तोंडातून लाल पाणी पडू लागते. पापी माणसाचा जीव हा गुदद्वाराच्या द्वारे बाहेर पडतो. आणि पुण्यवानांचा जीव हा मुखातून बाहेर पडतो मृत्यू समयी जीव यमदूतना भेटतात. ते यमदूत क्रोधाने डोळे लाल झालेले, भयंकर चेहऱ्याचे, कावळ्या सारखे केस वर करून, दात दिसणारे काळे वाकडे चेहरे, प्रचंड पंजा सारखी क्षेत्र शस्त्रे घेऊन थांबलेले असतात.

 

त्यांना पाहून भीतीने तो प्राणी त्यांचा मूलमूत्र विसर्जित करतो. रडत रडत तो आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि अंगठ्याच्या आकाराचं शरीर धारण करतो आणि तो आपल्या घराकडे मोहित होऊन पाहतो. त्यावेळी त्या अंगठ्याप्रमाणे शरीराच्या गळ्यात दोरी बांधली जाते आणि अशाप्रकारे ओढून नेले जाते की राजाची सैनिक एखाद्या गुन्हेगाराला घेऊन जात असतील अशा पद्धतीने ओढून नेले जाते.

 

यमदूत जेव्हा घेऊन जात असतात तेव्हा आपणाला वारंवार म्हणत असतात की तू नीच आहेस लवकर चाल, तुला यमराजाच्या घरी जायचं आहे लवकरच आम्ही तुला कुंभिक पाप नावाच्या नरकात नेणार आहोत. जे पुण्यवान असतात त्यांना सुरुवातीपासून आनंदाने आपल्या लोकांकडे घेऊन जातात.

 

त्या यमदूतांच्य धमक्यांमुळे त्याचे हृदय तुटते भीतीने थरथर कापत आणि त्याला पापांची आठवण होते. त्या आत्म्याला वाटेत कुत्रे चावतात. जेव्हा त्याला भूक आणि तहान लागते तेव्हा त्याला सूर्याच्या उष्णतेने आणि वाऱ्याच्या वेगाने तापलेल्या वाळूत चालायला लावले जाते. जेव्हा सावली आणि विश्रांती शिवाय वाटेवर चालता येत नाही तेव्हा यमदूत त्याला चाबकाने फटके मारून यमलोकात ओढून नेतात.

 

अशा खडतर वाटेवर चालताना तो खाली पडतो. आणि मग पुन्हा उठतो अशा प्रकारे त्या आत्म्याला अंधाऱ्या यमलोकात नेले जाते ते यमदूत त्याला नरक यातना दाखवतात यमलोकात गेल्यावर तो प्राणी यमराजाला पाहतो आणि भयंकर नरकाच्या यातना पाहून यमराज्याच्या आज्ञेने पुन्हा मानव जगात येतो. यानंतर त्या आत्म्याचे काय होते हे आपण पुढील भागात पाहू..

 

मित्रांनो अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.