मित्रांनो, प्राचीन काळापासून शकुन आणि अपशकुन घटना आपल्या धर्मात मानल्या जात आहेत. असे मानले जाते कि या शकुन अपशकुन घटनांच्या आधारे भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज आपण घेऊ शकतो. ज्योतिषशास्त्र देखील या घटनांच्या पक्षात आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या घटना एखाद्या व्यक्तीचे फायदे, तोटे, यश आणि अपयशाबद्दल सांगू शकतात. हेच कारण आहे की आपणशिंक येणे , मांजरीने मार्ग कापणे या सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतो.
ज्योतिषशास्त्रानुसार घरात नको असणाऱ्या गोष्टी घडत असेल तरी देखील शुभ अशुभ संकेत मिळतात. जसे कि हातातून भांडी निसटणे, काचेही भांडी फुटणे किंवा दूध उतू जाणे किंवा सांडणे. या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी संकेत असतात.
मित्रांनो रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आसपास कितीतरी सध्या गोष्टी घडतात. जसे हातातून एखादे भांडे खाली पडणे, काचेची वस्तू फुटणे, दूध तापत असताना ते उतू जाणे परंतु त्याचा आपल्या भविष्याशी किंवा येणाऱ्या काळाशी काही संबंध असेल असे आपल्या मनातही कधी येत नाही परंतु ज्योतिषशास्त्र मानल्यास दूध उतू जाणे यातही खूप मोठा अर्थ सामावलेला आहे.
मित्रांनो बर्याचदा आपण गॅसवर दूध उकळण्यासाठी ठेवतो आणि दुसऱ्या कामाला लागतो. परंतु कधी-कधी योग्य वेळात गॅस बंद न केल्यामुळे दूध उकळते आणि गॅस स्टोव्हवर किंवा ओट्यावर सांडते. बरेच लोक याकडे किरकोळ वस्तू म्हणून दुर्लक्ष करतात.
त्याचवेळी, काही लोक असे आहेत की या दुधाचे ह्या प्रमाणे सांडणे म्हणजे काय याबद्दल संभ्रमित होतात आणि जर तुम्ही कितीही लक्षपूर्वक काम केले तरी दूध तापवताना थोडे तरी दूध जात असेल, फरशीवर सांडत असेल किंवा गॅसवर पडत असेल तर हा एक शुभ संकेत आहे. याचाच अर्थ तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळणार आहे.
मित्रांनो दूध उतू जाणे याचाच अर्थ तुमचे घर दूध दुभत्याने भरलेलं आहे. श्री कृष्णाची नगरी वृंदावनात प्रत्येकाकडे गायी असत. म्हणून सर्वांच्या घरी दही,तूप,दूध याचे माठ भरलेले असत. गोकुळात जणू दही दूध उतू जात असे. त्यामुळेच दूध उतू जाणे म्हणजे आपले घरही भरल्या गोकुळाप्रमाणे असते.
आजकालची पिढी हे मानणार नाही. ते म्हणतील कि हि अंधश्रद्धा आहे असे कधी होते का? परंतु आपले ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद खूप प्राचीन आहे. आपल्या ऋषीमुनींनी अभ्यास करून व सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच आपली मते प्रगत केली आहे.
जे भविष्य मानतात ते हि गोष्ट नक्कीच मानतील. दूध उतू गेल्यास सुख समृद्धी मिळते मान सन्मान प्राप्त होतो. जर एखाद्या कामात जर अडचण निर्माण होऊन ते बंद पडले असेल तर ते कामही सुरळीत पार पडते. तसेच लाभदायक घटना घडत असतात.
परंतु जर दूध एखाद्या भांड्यात ठेवले असेल आणि ते आपल्या हातून खाली पडले किंवा धक्का लागून दूध सांडले तर ते एखाद्या दुर्घटनेचे प्रतीक असते. ही दुर्घटना कशीही असू शकते. ती लहान असेल किंवा मोठी असेलं किंवा ती शारीरिक न राहता मानसिक किंवा आर्थिकही असेल परंतु दुर्घटना नक्की घडते.
काही व्यक्ती दूध उतू जाणे शुभ आहे अस म्हणून मुद्दाम दूध गॅसवर ठेऊन उतू जाऊ देतात. परंतु हे चुकीचे आहे, यामुळे अपशकुन घडतो. घरात भांडण तंटे व कलहाच वातावरण निर्माण होत. दूध तापत असताना आपल्या लक्ष नसताना अचानक उतू जाणे खूप शुभ आहे. म्हणून मुद्दाम दूध उतू जाऊ देऊ नये.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.