डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ ? डोळा फडफडणे काय असतात संकेत ..!!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, अनेकदा आपला डोळा फडफडतो, आणि आपण बेचैन होऊन जातो. डोळा फडफडणे या बाबतीत अनेक समाज गैरसमज देखील समाजात आहेत, तसेच बर्‍याच गमती जमती या डोळा फडफडण्यावर तुमच्या आयुष्यात घडल्या देखील असतील. हल्लीच्या मुलांना कदाचित या बाबतीतले फारसे काही माहीत नसेल. डोळा फडफडणे मग त्यात परत डावा का उजवा त्यावर काही गोष्टी पूर्वीपासून आपल्या समाजात दृढ झाल्या आहेत.

 

आज आपण या लेखामध्ये डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ आणि त्याच बरोबर खरोखर डावा डोळा फडफडण्याची कारणे आणि उपाय आपण बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात डावा डोळा फडफडणे विषयी ची सर्व माहिती विस्तृत स्वरुपात.

 

डाव्या बाजूचा डोळा फडफडणे यावर अनेक जणांचे वेगवेगळे समज आहेत. कुणाला वाटते डावा डोळा फडफडला तर कसला तरी शकुन होणार आहे. म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट होणार आहे. तर काही जणांचा असा समज आहे की डाव्या बाजूचा डोळा फडफडला तर काहीतरी वाईट गोष्ट घडणार आहे. असे विविध लोकांचे काही ना काही समज असतात. त्यामुळे काहींच्या नजरेत हा डोळा फडफडायला लागल्यास शुभ तर काहींना हे अशुभ वाटते.

 

काही लोकांचा असा समज आहे की, पुरुषांचा डावा डोळा जर फडफडत असेल, तर पुरूषांना भविष्य काळात खुप मोठया संकटाना तोंड ध्यावे लागते किंवा विनाकारण एखादया व्यक्तीशी दुश्मनी चालु होते म्हणजेच पुरुषांच्या चालू घडामोडींना ग्रहण लागते. आणि याच्या उलट स्त्रियांचा डावा डोळा जर फडफडत असेल, तर त्याचा स्त्रियांना खुप फायदा होतो, कोणता ना कोणता लाभ नक्की मिळतो.म्हणजेच डावा डोळा फडफडणे हे पुरुषांसाठी अशुभ तर स्रियांसाठी शुभ मानले जाते.

 

काही लोकांचा असा सुध्दा समज आहे की, जर कुणी आपली आठवण काढत असेल तरी देखील डावा डोळा फडफडतो. आता प्रत्येकाच्या स्वतःच्या विचारांवर हे मानणे की न मानणे अवलंबुन आहे. या सर्व गोष्टींवर तुम्ही किती आणि केव्हढा विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.

 

जुन्या काळातील लोक सांगायचे की डावा डोळा फडफडत असेल तर, त्या डोळ्यावरून सोन्याची अंगठी फिरवावी. आणि काही जण असेही सांगतात की, विवाहित स्त्रिया आपल्या गळयातील मंगळसुत्राच्या सोन्याच्या वाटया सुध्दा फडफडत्या डोळयावर फिरवु शकतात. आता तुम्हाला जर अशा गोष्टींवर विश्वास असेल तर, असे करून बघण्यास काहीच हरकत नाही.

 

अशाप्रकारे डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ याची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.