मित्रांनो दात दुखी ही एक अशी समस्या आहे जी वेळेनुसार वाढत जाते आणि पुढे जाऊन दात दुखी व दात किडणे यामुळे दात दाढ काढण्याची वेळ येते. म्हणून सुरुवातीलाच दाताला कीड लागते तेव्हा केवळ एक काळा डाग असतो जर याकडे योग्यवेळी लक्ष नाही दिलं तर तो वाढत जाऊन शेवटी दाताला मधील भागाला कीड लागते. दाताला किंवा दाढेला मधील भागाला जेव्हा किड जाते तेव्हा इन्फेक्शन जास्त वाढलं तर दात काढणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो आणि आपल्याला ही वेळ येऊ नये म्हणून आपण लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी काही घरगुती उपाय करून आपण दाताला लागलेली कीड हळूहळू कमी करू शकतो आणि पूर्णपणे मुळापासून संपवू शकतो.
मित्रांनो दाताला कीड लागणं याच मुख्य कारण आहे तोंडात असणारे बॅक्टेरिया किंवा छोटे जीवजंतू किंवा किटाणू आपल्या तोंडात लहानपणापासून असतात. जेव्हा आपण दाताची किंवा तोंडाची व्यवस्थित काळजी घेत नाही तेव्हा त्यांची संख्या वाढते आणि ती कीड लागण्यास कारणीभूत होतात. आपण रोज ब्रश करतो आपल्या दाताला कीड लागते कशी या गोष्टीचा आपण विचार करतो.
मित्रांनो दात किडण्याचे पहिले कारण म्हणजे साखर आणि दुसरी म्हणजे कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ जसं मैदा. जेव्हा आपण साखरेपासून बनलेला किंवा मैद्यापासून बनलेला एखाद्या पदार्थाचे जास्त सेवन करतो किंवा जास्त प्रमाणात खातो तेव्हा तोंडातील किटाणूंना जास्त चांगलं अन्न मिळतं आणि हे खाऊन किटाणू लॅक्टिक ऍसिड सोडतात.
आणि हेच लॅक्टिक एसिड आपल्या दातावरील थर वितळवण्यासाठी कारणीभूत होतं. हे सुरक्षा कवच वितळतं आणि दातात कीड निर्माण करू लागतो. दातावर छोटे छोटे काळे डाग येतात. म्हणून म्हणतात की जास्त गोड खाल्ल्याने दात किडायला सुरुवात होते.
मित्रांनो दात किडू नयेत यासाठी गोड पदार्थ कमी प्रमाणात खावेत. त्याप्रमाणे दाताला चिकटणारे किंवा चिटकून बसणारे पदार्थ कमी खाणं गरजेचं असतं. मैदा साखर इत्यादीमुळे जास्त दाताला कीड लागते. त्याच प्रमाणात निसर्गात अशाही काही गोष्टी किंवा अशाही काही वस्तू आहेत ज्यांचा वापर करून आपण दाताला लागलेली कीड कमी करू शकतो. चला तर जाणून घेऊयात अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण दातातील कीड कमी करू शकतो.
मित्रांनो पहिला म्हणजे दातातील कीड दूर करण्यासाठी आपल्याला जो एक घटक लागणार आहे तो घटक आहे लवंग. आपल्या प्रत्येकाच्या घरी मसाल्याच्या डब्यात पदार्थांमध्ये आपल्याला लवंग सहज मिळते. दातातील कीड काढण्यासाठी लवंग अत्यंत उपयुक्त असते. यासाठी चार ते पाच लवंगा हलक्या गरम करून बारीक कुटून घ्या आणि गाळणीने किंवा एखाद्या कपड्याच्या सहाय्याने वस्त्रगाळ करून पावडर तयार करा. याप्रमाणेच तुरटी गरम करून बारीक करून वस्त्रगाळ करून पावडर तयार करून घ्या. तसेच या उपायासाठी आपल्याला मोहरीचे तेल लागणार आहे. मोहरीच्या तेलाचा उपयोग करून दाताला लागलेली कीड कमी होते दात दुखणे कमी होते व कॅविटी भरून निघण्यासाठी देखील मदत होते. तसेच दातातून रक्त येत असेल तर ते थांबते.
मित्रांनो एका वाटीत दोन चिमटी लवंगेची पूड दोन चिमटी सुंठ पावडर आणि दोन चिमटी तुरटीची पावडर एकत्र करा आणि यात मोहरीचे तेल अर्धा चमचा घाला. बोटाच्या साह्याने हलवून सर्व घटक एकजीव करून घ्या. त्यात एक कापसाचा बोळा भिजवा आणि हा कापसाचा बोळा दातावर धरायचा आहे. 15 ते 20 मिनिटे ठेवून तो काढून टाकायचा आहे. या उपायाने दातातील कीड मरते आणि परिणामी दात दुखणे कमी होते. हा उपाय तुम्हाला साधारणतः पाच ते सात दिवस करायचा आहे. ज्या व्यक्तींचे दात नेहमी दुखतात किंवा कीड लागत असेल तर अशा व्यक्तींनी आपण तयार केलेली मिश्रण रोज बोटाच्या साह्याने दाताला लावून मालिश करावे यामुळे तुमचे दात घट्ट मजबूत होतील आणि भविष्यात कधीही किडणार नाहीत.
मित्रांनो जर तुमच्या दात किडायला सुरुवात झाली असेल तर गोड पदार्थ आणि दाताला चिकटणारे पदार्थ खाणे टाळलं पाहिजे. जेवणानंतर दात स्वच्छ करणे गरजेचं असतं. अशा प्रकारे जर तुम्ही दाताची काळजी घेतली तर तुमच्या दात कधी किडणार नाहीत.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.