मित्रांनो आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असेल. आपल्याला चहा प्यायल्याशिवाय चैनच नाही पडणार. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, की ज्या व्यक्ति जास्त चहा पितात, त्या जास्त आजारी पडतात. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.
आणि मित्रांनो युरोप आणि अमेरिकेसारख्या थंड प्रदेशात राहणार्या लोकांसाठी चहा योग्य आहे, परंतु उष्ण कटिबंधात राहणा-या लोकांसाठी चहा हा विषासारखा आहे. उष्ण कटिबंधात राहणार्या लोकांच्या पोटात आधीच आम्लपित्त म्हणजेच अॅसिडिटी जास्त असते. जेव्हा तुम्ही चहा पिता तेव्हा ती अधिक प्रमाणात होते आणि यामुळे, पोटात जळजळ होणे आणि छातीत जळजळ होणे, यासारखे आजार सुरू होतात. याबरोबरच चहामध्ये वापरण्यात येणारी साखर आपल्याला आजारी बनवत आहे. मधुमेह, हृदयरोग आणि रक्तदाब हे रोग होण्याचा धोका वाढतो.
आपण असा प्रयोग देखील करून पाहा, चहा प्यायल्यावर आपल्या ब्लड प्रेशरचे मोजमाप करा आणि रक्तातील साखर मोजा. चहा पिण्याचे तोटे इतके गंभीर आहेत की तुम्ही कदाचित चहा पिणे स्वत:हून सोडून द्याल आणि मित्रांनो युरोपमध्ये लोक चहामध्ये पांढरी साखर आणि दूध घालत नाहीत. पण तिथे चहा फक्त चहाच्या हिरव्या पानांची असते. भारतात, काळा चहा हा एक कचर्याचाच एक प्रकार आहे, जी गोरगरीबांमध्ये पाठविला जात आहे. तर आता आम्ही तुम्हाला चहा पिण्याचे तोटे सांगत आहोत. ते समजून घेऊन कदाचित तुम्ही चहा पिणे थांबवाल-
पोट खराब होणे: चहा पिण्यामुळे तुमचे पोट पूर्णपणे अस्वस्थ होते. तुमची पचनशक्ती बिघडते आणि त्याच वेळी तुमच्या पोटात पित्त तयार व्हायला सुरुवात होते. गॅसची समस्या: उष्ण कटिबंधात साखर घातलेला चहा पिण्यामुळे गॅसची समस्या उद्भवते. तसेच पित्तवर्धक असल्याने आपल्या शरीरात अॅसिडिटीचे प्रमाण वाढते. जे पोटात गॅस व जळजळ उत्पन्न करते.
हातात व पायामध्ये वेदना होण्याचे कारण चहा: जर आपल्या हातात आणि पायात खूप वेदना होत असतील, तर त्याचे कारण आहे चहा. चहामुळे आपल्या हाडांवर परिणाम होतो. हाडे ठिसुळ होण्यास सुरुवात होते. लहान वयात हातापायात वेदना, झोपेच्या वेळी वेदना. हे सर्व चहामुळे होते.
रक्तदाब जास्त होतो: शीत कटिबंधात राहणा-या लोकांमध्ये रक्तदाब कमी असतो. परंतु आपल्या देशात असे काही दिवसच होते, जेव्हा खूप थंडी असते. उरलेल्या दिवसात किंवा वेळेत चहा प्यायल्याने आपला रक्तदाब त्वरित उच्च होतो. जर तुमचा रक्तदाब कमी असेल, तर मग तुम्ही चहा प्या, परंतु इतर लोकांसाठी चहा हे विष आहे. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते: चहा पिण्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. म्हणजेच रक्तामध्ये घाण किंवा कचरा वाढतो आणि हृदयापर्यंत रक्त पोहोचणे कठीण होत जाते. नंतर हृदयाच्या समस्या उद्भवतात.
आता तर आपल्याला समजलेच असेल कि चहा हा आपल्यासाठी किती घातक आहे आता जर आपल्याला चहाच्या होणार्या या नुकसानापासून वाचायचे असेल तर चहा मध्ये साखरेच्या जागी गुळाचा वापर करा आणि चहा मध्ये दुध टाकू नका तसेच चहासाठी चहाची हिरव्या पानाचा वापर करा कारण काळे पाने हि शरीराला अपायकारक आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.