मित्रांनो, भेंडीची भाजी बऱ्याच लोकांना खायला आवडते आणि भेंडीमध्ये पौष्टीक तत्व आणि प्रोटीन असल्याकारणाने भेंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. भेंडीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फास्फोरस, आयर्न, मॅग्नेशिअण, पोटॅशिअम, सोडियम आणि कॉपर आढळतात. यात भरपूर प्रमाणात फायबर आढळतं,
मधुमेह आहे अशा लोकांनी दोन भेंड्या एक ग्लास पाण्यात भिजत ठेवाव्यात व हे पाणी सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी प्यावे यामुळे शुगर कंट्रोल मध्ये राहते. तसेच भेंडीच्या भाजीची सेवनही नियमित करावी.
मित्रांनो आपण जेवतांना बऱ्याचदा अनेक पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नसते की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे, त्याच नुसार आपण चुकूनही भेंडीसोबत ह्या दोन भाज्या खाऊ नयेत. आज आपण जाणून घेऊया की असे कोणते पदार्थ आहेत जे भेंडीसोबत खाणे आरोग्यासाठी घातक असून याचे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. चला तर जाणून घेऊया की ते दोन पदार्थ कोणते आहेत.
मुळा : पहिली भाजी आहे मुळा जेवणात आपण मुळ्याचा उपयोग कोशिंबीर, भाजी, पराठे, रायता आणि लोणचे करण्यासाठी करतो मुळ्यात प्रथिनं, कार्बोदके, लोह, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आहे. मुळा उष्ण गुणधर्मी आहे त्यामुळे पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात शरिराला उष्णता मिळावी म्हणून मुळा खायला हवा. भेंडी खाल्यानंतर मुळा खाल्यास त्वचे संबंधित रोग उद्धभवू शकतात आणि शरीरासाठी हे हानिकारक ठरू शकते. म्हणून भेंडीची भाजी खाल्यानंतर चुकूनही मुळा किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा सेवन करू नका.
कारले: बऱ्याच वेळा आपल्या जेवणात दोन भाज्या एकाचवेळी खाल्ल्या जातात यामध्ये बऱ्याच जणांना भेंडीची भाजी खूप आवडते लहान मुलांना तर भेंडी फ्राय दही भेंडी भेंडीची भाजी खूप आवडते. पण भेंडीची भाजी खाल्यानंतर किंवा भेंडी सोबत कारल्याची भाजी अजिबात खाऊ नये, कारण भेंडीची भाजी खाल्यानंतर कारले खाल्यास भेंडी आणि कार्ले यातील रसायनांचे एकत्रित संयोग होऊन पोटात घातक मिश्रण तयार होऊ शकते. यामुळे आपल्याला एखादा आजार किंवा इतर त्रासाचा सामना करावा लागू शकतो.
मित्रांनो दूध पिण्याआधी कधीही कारलं किंवा भेंडीची भाजी खाऊ नये. या भाज्या खाल्यानंतर जर तुम्ही दूध प्यायल्यात तर चेहऱ्यावर काळे डाग येतात. याशिवाय चेहरा काळाही पडू शकतो. चेहऱ्यावर फोड येऊ शकतात लाल काळे चट्टे येऊ शकतात चेहऱ्यावर अॅलर्जी होऊ शकते.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.