मित्रांनो, अनेकदा बाहेरचे खाऊन किंवा इतर कारणांमुळे घशाचे इन्फेक्शन होण्याची समस्या अनेकांना निर्माण होते. हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा तेल हे कुठल्या प्रकारचे वापरतात, हे आपल्याला समजत नाही. आपण घरी ज्याप्रकारे चांगल्या दर्जाचे तेल खात असतो. त्या प्रकारचे तेल हॉटेलमध्ये वापरण्यात येत नाही. त्यामुळे अनेकांना घशाचे इन्फेक्शन होण्याची समस्या निर्माण झालेली असते. तसेच आपण बाहेर जे पदार्थ जर खात असेल तर यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल वापरण्यात येते आणि ते तेल तसेच राहते.
मित्रांनो त्यामुळे आपल्याला अतिरिक्त चरबी देखील शरीरात जमा होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्याला इतर इन्फेक्शन देखील होऊ शकतात. आपला घसा देखील दुखू शकतो. सर्दी, खोकला इतर आजार होऊ शकतात. त्यामुळे सहजासहजी बाहेरचे आपण खाणे हे टाळावे आणि मित्रांनो जर आपल्याला बाहेरचे खायची इच्छा असल्यास तरी आठवड्याभरात किमान एकदा बाहेरचे खावे. मात्र, आपण दररोज बाहेरचे खात असाल तर आपल्याला या मुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे शक्यतो पर्यंत बाहेरचे आपण खाणे टाळावे.
त्याचबरोबर मित्रांनो जर बाहेरचे खायचे असेल तर आपण जास्त तेल असलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे आपल्याला सर्दी, खोकला यासोबतच घशाला इन्फेक्शन सारखा आजार होऊ शकतो. तर मित्रांनो अशा वेळी महागडी औषधे घेण्या अगोदर आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय करून पाहू शकतो. आज आपण असाच एक छोटासा घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या घशामधील कफ, सर्दी, खोकला यांसारख्या सर्व समस्या दूर होतील. चला तर मित्रांनो जाणून घ्या कोणता आहे तो उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला तो उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती.
तर मित्रांनो यासंबंधीचा उपाय करत असताना आपल्याला एका तव्यामध्ये तीन चमचा जिरे तीन चमचा ओवा आणि त्याचबरोबर पाच ते सहा चमचे बडीशेप घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन दालचिनी सुद्धा घ्यायचे आहेत त्याचबरोबर आठ ते दहा लवंगा घ्यायचे आहेत आणि असेही सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर भाजून झाल्यानंतर आपल्या त्यामध्ये एक चमचा सुंठ पावडर आणि दोन चमचे हळद मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थितपणे या सर्व घटकांची पावडर तयार करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो ही जी पावडर तयार झालेली आहे याचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे.
तर मित्रांनो ही जी पावडर तयार झाली आहे याचा वापर सर्दी किंवा कफ साठी करत असताना अर्धा चमचा हि पावडर आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे मध टाकून याचे व्यवस्थितपणे पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि ही मित्रांनो पेस्ट आपल्याला सकाळच्या वेळी आणि संध्याकाळचे दोन वेळा करून घ्यायचे आहे यामुळे खोकला आणि त्यातील कर लवकरात लवकर निघून जाण्यास मदत होते आणि त्यानंतर सर्दी किंवा खोकल्यासाठी याचा वापर करत असताना कोमट पाण्यामध्ये एक चमचा हे पावडर टाकून त्यामध्ये एक चमचा मध टाकायचे आहे आणि त्यानंतर याची सेवन करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने या पावडरचा वापर जर आपण केला तर यामुळे आपल्या सर्दी खोकला या सर्व समस्या लवकरात लवकर दूर होतील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.