स्वामी सारामृत ग्रंथ घेण्याइतके ही पैसे नव्हते ; पण स्वामींनी एका झिरोला कसं बनवलं हिरो? अनिता ताईंचा हा स्वामी अनुभव न रडता वाचून दाखवाच ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे सेवेकरी आहेत. स्वामींची ते मनोभावे व श्रद्धेने पूजा अर्चना करीत असतात. स्वामींच्या मठामध्ये जाऊन अनेक सेवा ते करीत असतात. स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील अशी मनोमन खात्री प्रत्येक सेवेकऱ्याला असतेच. मित्रांनो अनेक सेवेकऱ्यांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत. त्यांची अनेक अडचणीतून सुटका देखील स्वामींनी केलेली आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य सतत सेवेकरांच्या कानावर पडत असते. त्यामुळे ते मनोभावे स्वामींच्या सेवेमध्ये मग्न राहतात.

तर आज मी तुम्हाला असाच एक अनुभव सांगणार आहे हा अनुभव मुंबईच्या अनिता साठे यांना आलेला आहे. हा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये आपण जाणून घेऊयात

नमस्कार मी अनिता साठे. मी माझे मिस्टर, माझी दोन मुले आणि सासू-सासे आम्ही सर्वच जण मुंबईला राहत होतो. तेथे आमचा बिजनेस होता. म्हणजेच कपडे तयार करण्याच्या मशिनरी होत्या. त्या मशनरीवर कपडे तयार करून आम्ही ते विकत होतो. आमचा खूपच जम बसलेला होता. आमच्या सासू-सासऱ्यांचा देखील दवाखाना सतत असायचा. परंतु आमचे सर्व काही व्यवस्थित चालले होते.

परंतु अचानकच आमच्या जीवनामध्ये वादळ आलं. म्हणजेच एकदा आमच्या त्या कंपनीत एकदम शॉर्टसर्किट झाल्यामुळे सर्व काही आमचं जळून खाक झालं. आम्ही अनेक लोकांबरोबर डील केल्या होत्या त्यांचे पैसे आमच्याकडे अडकले होते. सर्व काही जळून खाक झाल्याने आम्हाला काय करावे सुचत नव्हते. अनेकांचे पैसे द्यायचे होते.

त्यावेळेस मग आम्ही आमचे घरातील सोने तसेच अनेक वस्तू विकून आम्ही त्यांचे पैसे दिले. तरी देखील अजून काही जणांचे पैसे देणे बाकी होते. ते दररोज आमच्या घरी मागण्यासाठी येत होते. त्यातच सासू-सासऱ्यांचा दवाखाना देखील होता. मुलांचे शिक्षण होते. त्यावेळेस आम्ही दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा थोडा गॅप ठेवला.

आम्हाला काय करायचे काहीच सुचेनासे झालेले होते. सगळेजण टेन्शनमध्ये आलेले होते. त्यावेळेस माझ्या एका मैत्रिणीने मला स्वामीविषयी सांगितलं आणि स्वामींच्या मठामध्ये जा आणि सर्व काही अडचणी स्वामी दूर करतील असे तिने सांगितले.

परंतु स्वामींच्या मठांमध्ये जाण्याइतपत देखील पैसे माझ्याकडे नव्हते. मला स्वामींचे स्वामी सारामृत वाचण्याची, पारायण करण्याची मनोमन इच्छा होती. परंतु स्वामी सारामृत खरेदी करणे इतपत 20 रुपये देखील माझ्याकडे नव्हते. मग त्यावेळेस मी स्वामींचे नामस्मरण करण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी माझ्या शेजारच्या मैत्रिणीने गुरुवारचे स्वामींचे उद्यापन करणार होती आणि त्यासाठी मला आमंत्रित केले आणि तेथे तिने मला स्वामींचे सारामृत भेट म्हणून दिले.

त्यावेळेस मग मी खूपच खुश झाले आणि जी माझी इच्छा होती स्वामी सारांमृत पारायण करण्याची ती माझी इच्छा पूर्ण झाली. ते सारामृत मिळाल्यानंतर मी सारामृत वाचण्यास सुरुवात केली आणि हे सारामृताचे पारायण केल्यानंतर माझे जीवन खूपच बदलले. आम्ही छोटेसे आमचे कॅन्टीन चालू केले. जेवणाचे कॅन्टीन चालू केले आणि नंतर आम्हाला त्यामध्ये इतका फायदा झाला की त्या कॅन्टीनचे आमचे हॉटेलमध्ये रूपांतर झाले.

आता सध्या मुंबईमध्ये आमची १५ हॉटेल आहेत. तसेच दोन बंगले आम्ही खरेदी केले. तसेच आमचे सोने काही विकले होते त्याच्या दुप्पट सोने आम्ही खरेदी केले. आमचा चांगलाच जम बसला होता आणि हे सर्व स्वामींच्या कृपेमुळे झाले होते. स्वामींचा अनुभव मला खरंच अनुभवायला मिळाला.

स्वामी हे आपले जे काही संकट आहेत ते संकट आपल्यावर ओढवून घेतात आणि त्या संकटातून आपल्या सेवेकरांची सुटका नक्कीच करतात हे मला त्या अनुभवातून जाणवले. जर कोणत्याही भक्ताची मनापासून इच्छा असेल तर देव कोणत्याही रूपात येऊन त्या भक्ताची मदत नक्कीच करतो. याचा मला प्रत्यय आला. तेव्हापासून मी स्वामींची भक्ती कधीच सोडली नाही. अगदी मनापासून, विश्वासाने मी आज देखील स्वामींची मनोभावे सेवा करीत आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *