मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामींचे सेवा ओके मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करत असतात आणि अशा पद्धतीने या स्वामी भक्तांकडून केलेल्या प्रत्येक सेवेचे आणि भक्तीची फळ हे स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला देतच असतात आणि त्याच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्याची सुटका करतात त्याच्यावर आलेल्या अडचणीतून त्याला बाहेर काढतात त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्याही स्वामी लवकरात लवकर दूर करत असतात आणि हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याचबरोबर स्वामींची लेला आहे किती आघात आहे हे आपल्याला माहित आहे आपण अनेक ठिकाणी स्वामींचे अनुभव आणि प्रचिती ऐकत व वाचत असतो अशीच एका ताईंची स्वामींची प्रचिती स्वामींचा एक अनुभव आज आपण पाहणार आहोत तर हा स्वामींचा अनुभव त्या ताईंच्या शब्दातच पुढील प्रमाणे.
नमस्कार मित्रांनो मी उषा, राहणार सातारा मी खूप दिवसापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. माझ्या घरातले म्हणजे सासरचे लोक देवाधर्माच्या बाबतीत थोडेसे नास्तिक आहेत. मला कुणी हे करू नको ते करू नको असे संगितले नाही पण मी कुणाला देवाची भक्ती करा किंवा असे असे पाळा म्हटले की माझ्या पतींना राग यायचा. त्यांनी त्यांचे मत माझ्यावर कधी थोपवले नाही तर मीही असे करू नये असे त्यांचे म्हणणे.
अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे असे खूप दिवसांचे मनात होते. पण नवर्याच्या या विचारामुळे मला तुम्ही अक्कलकोटला न्या असे म्हणता आले नाही, म्हणजे मी तसा कधी प्रयत्न देखील केला नाही. पण अक्कलकोटी जावे ही खूप इच्छा होती. एके दिवशी का कुणास ठाऊक पण अचानक माझ्या पतीच मला म्हटले खूप दिवस झाले कुठे गेलो नाही. यावेळी तू म्हणशील तिथे जाऊया. मी देखील मिळालेल्या संधीचे सोने करत विचारले,’अक्कलकोटला जाऊया का?’ अनिच्छेने का होईना माझे पाती तयार झाले.
मी, माझे पती आणि दोन मुले काही दिवसांनी अक्कलकोटला गेलो. आम्ही दर्शनाच्या लाइन मध्ये थांबलेलो होतो पण अचानक एक भटजी आले आणि त्यांनी आम्हाला आणि अनेक लोकांना लाइनमधून बाहेर काढले. ‘ज्यांनी अभिषेक बुक केलाय त्यांनाच फक्त दर्शन मिळणार आहे. बाकीच्या लोकांचे दर्शन या सर्वांचे अभिषेक पूर्ण झाले की होतील.’ मला खूप जास्त वाईट वाटले निदान माझ्या लहान मुलांना तरी दर्शन मिळायला हवे होते. मन खूप उदास झाले होते. माझे पती नास्तिक होते तरीही त्यांना कळत होते की मी आतून फुटून फुटून रडतेय.
आम्ही परत निघालो होतो, गाडीमध्ये कुणी कुणाशी बोलायला तयार नवते. माझ्या पतींनी एकदोनदा मला खुलवण्याच्या अयशस्वी प्रयोग केला पण व्यर्थ !!. आम्ही जवळपास पन्नास किलोमीटर दूर गेलो असू, मला नाही आठवत की कोणत्या ठिकाणी आलेलो होतो आम्ही, माझी मनस्थितीच नवती पण एक छानसे मंदिर लागले होते. एरवी माझे पती असे वागणार नाहीत पण पतींनी गाडी तिथे थांबवली, मंदिर खूप छान होते. एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती, प्रसन्न वाटत होते. काहीतरी होते तिथे, कुणीतरी माझ्यासाठी… माझे जीवन सार्थक करण्यासाठी आलेले होते.
दर्शन घेऊन थोडावेळ सभामंडपात बसलो होतो, अचानक तिथे एक साधू आले. अत्यंत प्रसन्न दिसणारे, काहीतरी अलौकिक असे काहीतरी होते त्यांच्यामध्ये. आम्ही सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले, तेही तिथेच बसले होते. त्यांनी मला संगितले की, ‘बेटा, अगर तुम्हारी श्रद्धा सच्ची हे तो तुम्ही कही जाणे की जरूरत नही हे. उसे खुद तुम्हारे पास आणा पडेगा.’ त्यांच्या त्या शब्दांनी मला खूप चांगले वाटले. ते तेथून निघाले तेव्हा ते म्हणाले ‘विश्वास ठेव, वो मरा नही जिंदा हे.. उसने तेरी जरूर सून ली हे’. हे साधू गेल्यावर सुगंधाचा दरवळ राहतो तसे काहीतरी राहिले होते.
मित्रांनो माझा विश्वास आहे की मला स्वामींनीच भेट दिली होती, जरी मंदिराचा पुजारी पैशाचा भुकेला असला तरी माझे स्वामी भक्तीचे भुकेले आहेत. माझ्या पतींना देखील ती सकारात्मक ऊर्जा इतकी जाणवली की आज माझे पती सकाळी आंघोळ झाली की पहिले स्वामींपुढे नतमस्तक होतात. श्री स्वामी समर्थ !!
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.