अंधारमय जीवन जगणाऱ्या लोकांना प्रकाशमय जीवन दाखवणारे 2024 चे अनमोल सुंदर सुविचार…..!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अशी एक वेळ येते की आपले जीवन अंधारमय होऊन जाते. हे अंधारमय जीवन जगणारा लोकांना प्रकाशमय जीवन दाखवण्यासाठी आजच्या या लेखांमध्ये आपण सुंदर सुविचार जाणून घेणार आहे. कारण विचारांचा प्रभाव आपल्या मनावर पडत असतो.

 

ज्या माणसाच्या तोंडावर संयमाचा लगाम असतो. त्याच माणसांना समाजात मान सहजासहजी मिळत असतो. परंतु ज्या माणसांना कुठे काय बोलावं याची आक्कल नसते. अशा माणसांची किंमत समाजात बिलकुल नसते. म्हणून खूपच गरजेचे असेल तरच प्रतिक्रिया द्यायला तोंड उघडायचे असते नाहीतर गरज नसताना तोंड उघडले की, आपल्याच प्रतिक्रियेतून किंवा संभाषणातून आपलीच किंमत आपल्याकडूनच चार-चौघात कमी केली जात असते.

आयुष्यात त्या लोकांना कधीच विसरू नका जे एकट्यात गोड वागतात आणि चारचौघात विरोधात.

परिस्थिती कशीही असो दोन गोष्टी जवळ असल्यावर आपल्याला कोणीच हरवू शकत नाही एक म्हणजे सत्य आणि दुसरी म्हणजे सातत्य.

खोटारडी माणसं त्यांचा खरेपणा दाखवण्यासाठी धडपडत असतात प्रामाणिक माणसं योग्य वेळेची वाट पाहत असतात.

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.

तुटलेली फुले सुगंध देऊन जातात गेलेले क्षण, आठवण देऊन जातात प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात म्हणून काही माणसे क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात.

नुसतंच आपलं म्हणून नाही चालत आपल्यानी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं.

चुकलेल्या वाटेच नवीन वाटा शोधण्याची प्रेरणा देतात.

स्वतःमध्ये खुश राहायचं, कारण दुसरं कोण खुश ठेवत नसतं.

जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधी सोडायचे नाही थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्यांचाच होतो.

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती उचलतात, काहीजण त्यातून मासे घेतात. तर काहीजण त्यात आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे महत्त्वाचे आहे.

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते ऊन्हात चालताना सावलीची गरज असते जीवन जगत असताना खरंच चांगल्या माणसांची गरज असते.

मेलेल्या माणसांना खांदा देणे, याला लोक पुण्य समजतात पण नियतीसमोर हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना, दहा वेळा विचार करतात.

स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका, कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही.

जर तुम्ही काट्यांवर लक्ष केंद्रित केले तर फुलांची प्रशंसा करू शकणार नाही. पण जर तुम्ही फुलाकडे प्रथम लक्ष केंद्रित केले तर काटे जास्त टोचणार नाहीत. त्याचप्रमाणे लोकांच्या सद्‌गुणावर लक्ष केंद्रित करा, दुर्गुणांवर नको.

वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल…!

देव कधीच कुणाचे नशीब लिहीत नाही… आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात.

यशस्वी व्हायचे रस्ते खूप आहेत फक्त त्या रस्त्यावर चालण्याचे कष्ट आपल्या पावलांनी घेतले पाहिजेत..!

ओळख होण्याआधी, सगळेच अनोळखी असतात. मनं एकदा जुळली की, सहज आपले होतात यालाच आपले जिवलग म्हणतात….! कमवलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला संभाळता येते, तो आयुष्यात कधीच हारत नाही.

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो.

कोणी कसाही असो त्यांच्याशी इतकं चांगले वागा की, वाईटातल्या वाईट माणसाला देखील आपली कॉपी करण्याची इच्छा झाली पाहिजे.

साथ देणारी माणसे कधीही कारणे सांगत नाहीत आणि कारणे सांगणारी माणसे कधीही साथ देत नाहीत.

जर नशीब काही “चांगले” देणार असेल, तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल, तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते…!

 

अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.