मित्रांनो, आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. सुंदर दिसण्यासाठी अनेक गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपले दात. सुंदर दिसण्यासाठी दात हे देखील खूप महत्त्वाचे आहेत. आपले दात स्वच्छ, पांढरे शुभ्र, चमकदार असावे असे प्रत्येकाला वाटतच असते. दात रोजच्यारोज स्वच्छ न घासणे, कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर खळखळून चुळा न भरणे तसेच कॅडबरी, चॉकलेट सारखे किंवा अति गोड पदार्थ खाण्याने सुद्धा दात किडतात. यामुळे दाढेमध्ये किंवा दातात खूप वेदना होऊ लागतात. काय करावे सुचत नाही यासाठी आज मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे.
मित्रांनो या उपायासाठी आपल्याला तुळशीचे पान, लवंग आणि हळद या गोष्टी लागणार आहेत. या गोष्टी सर्वांच्याच घरी अगदी सहजपणे उपलब्ध असतात. त्यामुळे कोणत्याही वेळी आपल्याला दात दुखी किंवा दात दुखीचा त्रास झाला तर ताबडतोब आपण उपाय करू शकतो. या सर्व पदार्थांचे मिळून आपण एक गोळी तयार करणार आहोत. ही गोळी दुखर्या ददाढेमध्य-दातामध्ये ठेवली तर पाच मिनिटांमध्ये कितीही भयंकर दात दुखी बंद होणार आहे. दाताकडे आपण दुर्लक्ष करत असतो. दात व्यवस्थित न घासणे किंवा जेवल्यानंतर खळखळून चूळ न भरल्याने, दातामध्ये अन्नकण अडकून बसतात. या दातात किंवा दाढेत अडकलेले किंवा चिकटलेले अन्नकण तिथेच सडतात. परिणामी दात-दाढ किडतात. जेव्हा वेदना होतात तेव्हा आपण जागे होतो आणि मग अशावेळी आपण डॉक्टरकडे न जाता जर घरगुती हा उपाय केला तर तुमची दाढ किंवा दात दुखी पाच मिनिटांमध्ये थांबेल.
या उपायासाठी घरातील तीन पदार्थ वापरायचे आहेत. हे पदार्थ वापरून आणि लगेच दात दुखीवर आराम मिळू शकतो.
मित्रांनो पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तुळशीची पान. तुळशीची पानं आपल्याला सगळीकडे सहज उपलब्ध होतात. तुळस अँटी बॅक्टेरियल अँटिसेप्टिक आहे. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुळस अतिशय उपयोगी आहे. तुळशीची पानं मिठाच्या पाण्यामध्येही धुवून घ्या. त्यावरील धूळ, किटाणू निघून जातात.
मित्रांनो दुसरा अजून एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लवंग. लवंग देखील कुठल्याही प्रकारच्या बॅक्टेरिया मारण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. रोज एक लवंग खाल्ली तर घशाचा कुठलाही आजार होणार नाही. तुमची प्रतिकारशक्ती देखील या लवंगेने वाढते. लवंग बारीक कुटून घ्या.
मित्रांनो पुढचा पदार्थ लागणार आहे ती आहे हळद. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. हळद अंटीबॅक्टरियल आहे अँटीसेप्टिक आहे. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद टाकून प्या. कुठल्याही प्रकारचा विषाणू किंवा तुम्हाला संसर्ग होणार
मित्रांनो तुळशीच एक पान घ्या. त्यावर चिमूटभर लवंग टाका आणि चिमूटभरच हळद टाका. नंतर त्या पानाची गोळी तयार करा. दात दुखतो त्या दातामध्ये ही छोटीशी गोळी दाबून पाच ते दहा मिनिटं ठेवायची आहे. त्यानंतर चावून चावून खाल्ली तरी काही हरकत नाही कारण यातील ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण आयुर्वेदिक आहेत. हे तिन पदार्थ एकत्र आल्याने कुठल्याही प्रकारचा कीटन तुमच्या दातामध्ये असेल कुठलेही प्रकारची कीड असेल तर ती नष्ट होणार होते.
मित्रांनो दिवसातून तीन वेळा तुम्ही ही गोळी दातात ठेवा. दोन दिवसात दातातील कीड नष्ट होईल. हा उपाय केल्यावर तुमचा दात-दाढ पुन्हा कधीच दुखणार नाही.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.