मित्रांनो जर रात्री एक वाजता बस एका हायवेवर पंचर झाली आणि त्यानंतर कंडक्टरने जर तुमची तुमची सोय करा असे सांगितले तर अशावेळी तुम्हाला काय वाटेल? तर मित्रांनो आज आपण असाच शैलेश दादांना आलेला स्वामी अनुभव पाहणार आहोत तर मित्रांनो शैलेश दादा आपला अनुभव आपल्याला असे सांगतात की, आम्ही आमच्या पाहुण्यांच्या लग्नासाठी सोलापूर मधून बाहेरगावी जाणार होतो आणि माझे काम असल्यामुळे आम्ही लग्नाच्या आदल्या दिवशी रात्रीच्या बसने गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि रात्रीच्या बाराच्या गाडीने आम्ही लग्नासाठी जाण्याचा निर्णय घेतला कारण दुसऱ्या दिवशी लग्न होते आणि रात्री जाऊन तिथे थोडीशी विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी लग्न करून गावी परत येण्याचा निर्णय घेतला.
अशाप्रमाणे नियोजन केल्यानंतर आम्ही लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजता बसस्थानकामध्ये पोहोचलो आणि आमच्या बसमध्ये चढलो त्यानंतर आम्हाला तिसऱ्या सीटवर जागा मिळाली आणि तिथे माझी बायको आणि दोन मुले असे सगळेजण तिथे बसलो रात्रीच्या वेळी बस मध्ये थोडी कमीच माणसे होते. सव्वा बाराच्या दरम्यान बस सुरू झाली आणि बस सोलापूर सोडून पुढे हायवेला लागली आणि त्यानंतर हिवाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे घर हवा सुरू झाली आणि मी खिडकीची काच बंद करून घेतली आणि त्यानंतर माझी दोन मुलांनी काही कारणामुळे भांडायला सुरुवात केली तेव्हा माझ्या बायकोने यांना शांत बसवले आणि पुढे दोन-तीन किलोमीटर गेल्यानंतर संपूर्ण शांत झाली आणि माझा मुलगा आणि बायको दोघेही झोपी गेले.
त्यानंतर थोडा वेळ गेल्यानंतर मी घड्याळाकडे बघितले तर तेव्हा पाहुणे एक वाजले होते आणि एवढ्यातच एक मोठा आवाज झाला आणि बस थांबली त्यानंतर कंडक्टर आणि दोन-तीन माणसे काय झाले हे पाहण्यासाठी खाली उतरली आणि त्यानंतर कंडक्टर ड्रायव्हरला म्हणाला ड्रायव्हर बाहेर या बघा काय झाले आहे ते! बसचे मागचे चाक पंक्चर झाले होते, पुढे कंडक्टर सर्वांना मनाला की मागचे चाक पंक्चर झालेले आहे त्यामुळे गाडी पुढेही जाऊ शकत नाही आणि रात्रीच्या वेळी हायवेवर कोणीही आपल्याला भेटणार नाही त्यामुळे गाडी लवकर सुरू होणार नाही. कंडक्टर हे शब्द ऐकल्यानंतर सर्वांनाच घाम फुटला आणि त्यानंतर त्यातील एक सुशिक्षित व्यक्ती म्हणाला की इतक्या रात्री आम्ही जायचे तरी कुठे यावर कंडक्टर झाला तिथून पुढे सरळ थोड्या अंतरावर हायवे आहे तिथून तुम्हाला एखाद्या तरी वाहन नक्कीच मिळेल.
त्यानंतर कंडक्टर इतके बोलुन बसच्या मागे गेला त्यानंतर मी आणि माझी बायको दोघेही मुलांना कडेवर घेऊन हायवेच्या दिशेने चालायला सुरुवात केली आम्ही हायवेच्या दिशेने अर्धा एक किलोमीटर पुढे चालत गेल्यानंतर मागून एक टेम्पो आला आणि त्यानंतर मी त्या टेम्पोला हात केला आणि त्यानंतर थांबला त्या टेम्पो मध्ये पंचवीस वर्षाचा तरुण होता आणि त्याला मी म्हणालो की पुढे एखादी वस्ती असेल तर तिथे पर्यंत आम्हाला सोड त्यावर तू म्हणाला सोडतो आम्ही त्या टेम्पोमध्ये बसलो आणि टेम्पो हायवेच्या दिशेने पुढे जायला लागला, इतक्यात माझी बायको मला म्हणाली की आपल्या मुलाला म्हणजेच माझ्या लहान मुलगा झाला आहे. त्यावर मी तिला म्हणालो असू दे पुढच्या वस्तीमध्ये गेल्यावर आपण बघू डॉक्टर मिळतो का.
त्यावर तो तरुण ड्रायव्हर मला म्हणाला की साहेब पुढे एक वस्ती आहे तिथे माझ्या ओळखीचा एक डॉक्टर राहतो तुम्ही म्हणत असाल तर तिथे टेम्पो थांबवून मी त्याला घेऊन येतो त्यावर मी त्याला म्हणालो उपकार होतील दादा तुझे. कुठे गेल्यानंतर एका बाजूला त्याने टेम्पो उभा केली आणि त्याच्या बाजूला एक पायवाट होती त्या दिशेने तो निघून गेला आणि खूप वेळ झाला परंतु तो परत आलाच नाही आम्हाला खूपच भीती वाटायला लागली त्यानंतर माझी बायको मला म्हणाली की अजून कसा काय आला नाही हा त्यावर मी म्हणालो सर आपणच बघू पुढे भेटतो का तू असे म्हणून आम्ही त्या पायवाटेच्या दिशेने चालायला सुरुवात केली पुढे जाईल तसे जंगल सुरू झाले म्हणजेच दोन्ही बाजूने घनदाट अशी झाडी होती, त्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही रस्ता चुकलो आणि आम्हाला आता कळाले होते की आम्ही फसलो आहोत.
आणि आम्ही त्या जंगलामध्ये खूपच आत सुरू होतो आणि आमचा रस्ता चुकला होता मला आणि माझी बायकोला आता खूपच भीती वाटत होते आणि त्यानंतर आम्हा दोघांनाही खूपच घाम फुटला होता त्यानंतर थोड्यावेळाने तिथेच विचार करत उभा राहिलो इतक्यात समोरून एक विचित्र असा दिसणारा म्हातारा आमच्याकडे आला आणि माझ्याजवळ येऊन तुम्हाला म्हणाला की इतक्या रात्री मुलाबाळांना घेऊन काय करत आहे जिथे हे ऐकल्यावर मला थोडेसे बरे वाटले त्यानंतर मी त्याला म्हणालो की एक मुलगा मला इथे आणलेला आहे आणि तो डॉक्टरांसाठी म्हणून गेला आहे अजून आलेला नाही त्यावर तो म्हातारा म्हणाला की त्याने तुम्हालाही असंच केलं होय त्याचा अपघात झाल्यापासून तो असेच लोकांना फसवत असतो आणि ह्या जंगलात आणून सोडतो.
त्यानंतर मला संशयाला त्यानंतर मी त्याला विचारले की तुम्ही इतक्या रात्री इथे कसे काय? त्यावर तो म्हातारा म्हणाला की इथे जवळच माझी झोपडी आहे आणि मी तिथेच राहतो चला तुम्हाला माझ्या झोपडी मध्ये घेऊन जातो त्यानंतर त्यावर शैलेशला जरा धीर वाटला त्यामुळे तो त्या म्हाताऱ्याच्या मागे चालू लागला शैलेश त्याची बायको आणि पोरांसोबत त्या म्हाताऱ्याची मागे चलायला लागले, पुढे थोडावेळ गेल्यानंतर त्याची झोपडी दिसू लागली त्यानंतर तेव्हा तो म्हातारा आम्हाला म्हणाला की चला तुम्ही झोपडीकडे मी आलोच असे म्हणून तो म्हातारा पुढे निघून गेला आणि आम्ही झोपडी मध्ये आज रात्र घालवायचे आणि उद्या सकाळी हायवेवर जाऊन पुढची गाडी पकडायची असा निर्णय घेतला आणि त्या झोपडीच्या दिशेने चालू लागलो.
त्यानंतर त्या झोपडीच्या दारात गेल्यानंतर आम्ही आवाज दिला कोणीही बाहेर आले नाहीत त्यानंतर मी हातानेच दार उघडण्याचा प्रयत्न केला तर दार उघडच होते दार जरासे पुढे सरकवले आणि एक विचित्र अवस्थेत स्त्री बसलेली होती तिचे केस सोडलेले होते आणि त्यांनी मोठा कुंकू लावलेला होता आणि पुढे होमहवन सुरू होते आणि आजूबाजूला हळद कुंकू सांडलेले होते हे विचित्र पाहिल्यानंतर माझ्या बायकोचे हात पाय कापायला सुरुवात झाली तेव्हा ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यात मी तिचे तोंड धरले आणि म्हणाले की काही बोलू नको आपल्याला इथे धोका असू शकतो इतक्यात आमची जी मुलगी होती राणी ती अचानकपणे त्या बाईच्या बाजूला जाऊन बसली त्यानंतर मला खूपच भीती वाटायला सुरुवात झाली मी लगेचच आत गेलो आणि त्या बाईला म्हणालो ए बाई सोडून माझ्या मुलीला.
त्यावर ती बाई मोठ्याने बळी.. म्हणून ओरडली तेव्हा मी किती असणाऱ्या काठीने त्या बाईला एक जोरात फटका मारला आणि माझ्या मुलीला घेऊन पळत बाहेर आलो आणि माझ्या बायकोला म्हणालो की आता आपल्याला पळायचा आहे जर आपण थांबलो तर आपण संपलो असे म्हणालो आणि आम्ही सगळे पळायला सुरुवात केली माझा मुलगा माझ्या काखेत होता आणि बायको आणि मुलगी यांचा घट्ट हात धरला आणि पुढे धावायला सुरुवात केली हे सगळे झाले त्यानंतर पुढे थोडे अंतर पडत गेल्यानंतर आम्ही एका झाडाखाली थांबलो आणि मी घड्याळाकडे बघितले तर आता पहाट झाली होती म्हणजेच साधारणता चार वाजले होते आणि आम्ही पुढे एक रोड दिसत होता म्हणून त्या दिशेने हळुवारपणे चालत निघालो.
इतक्यात समोरून एक सायकल वरून वृद्ध आमच्याकडे आता मला पुन्हा भीती वाटू लागली कारण आमच्या बरोबर जे या जंगलामध्ये काही घडले होते त्यामुळे आम्हाला प्रत्येकाचीच भीती वाटत होती तो माणूस आमच्या जवळ आला आणि माझ्याकडे त्याचबरोबर माझ्या बायकोकडे एकटंक बघायला सुरुवात केली इतक्यात माझ्या मनामध्ये पुन्हा वाईट साईट विचार यायला सुरुवात झाली आणि मी माझ्या बायकोचा हात धरला आणि पुढे चालत निघालो तर तो वृद्ध माझ्याकडे बघत मोठ्याने म्हणाला श्री स्वामी समर्थ! हे शब्द माझ्या कानावर पडल्यानंतर मला थोडासा धीर वाटला आणि मी त्या वृद्धाकडे वळलो आणि त्याला म्हणालो श्री स्वामी समर्थ, त्यावर वृद्ध मला चार स्वामींचे लॉकेट देत म्हणाला पटकन हे गळ्यामध्ये घाला.
कारण या जंगलामध्ये कधीही काहीही घडू शकतो आणि मी पटकन ते लॉकेट घेतले आणि आम्ही सर्वजण ते लॉकेट परिधान केले त्यावर तो म्हणाला इतक्या रात्री तुम्ही इथे कसे आहात आणि तुमच्या बरोबर काय झाले हे मी तुम्हाला विचारणार नाही कारण की मला सर्व काही माहित आहे कारण ही एक विचित्र ठिकाण आहे, चला पुढे थोड्या अंतरावरच हायवे आहे तिथे जाऊन बोलूया तर त्या वृद्धाने आम्हाला त्या ठिकाणाहून बाहेर काढले आणि हायवे जवळ एका धाब्यावर आणले तिथे त्या वृद्धाने चहाची ऑर्डर दिली आणि चहा पीत असताना आम्ही सर्व घडलेली घटना त्या वृद्धाला सांगितले त्यावर तो आम्हाला म्हणाला इथे जे काही घडले आहे ते तुम्ही विसरून जा आणि घरी गेल्यानंतर स्वामींची एक छोटीशी पूजा नक्की झाला त्यानंतर सगळं काही ठीक होईल.
हे सर्व ऐकल्यानंतर मीही त्या वृद्धाला होकार दिला आणि त्याचबरोबर तो शेवटी आम्हाला असे म्हणाला की तिचे काही झाले आहे ते कसे झाले आणि का झाले याचा विचार करत बसू नका जे झाले ते इथेच सोडा विसरून जा आणि पुढे नव्याने कामाला सुरुवात करा इतके तू बोलला तेवढ्यात एक बस तिथे आली आणि तेवढ्यात तो आम्हाला म्हणाला की आधी बस जाव आता तुम्ही तुमच्या कामाला आम्हाला त्याने बस मध्ये बसवले आणि शेवटी तो वृद्धा मला म्हणाला श्री स्वामी समर्थ तुमचा प्रवास सुखाचा होवो आम्हालाही त्याचा आधार वाटला त्याच्यामुळे आम्ही वाचलो होतो आम्ही त्याचा निरोप घेतला माझे दोन्ही मुली त्याला टाटा करत होती आणि साक्षात त्याच्या रूपाने स्वामिनीच आम्हाला मदत केलेली होती.
तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा शैलेश भाऊंचा स्वामी अनुभव हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.