हे २१ नियम जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलु शकतात….!!

Uncategorized

मित्रांनो, बोलण्याची कला हे एखाद्या जादू पेक्षा कमी नाही. बोलल्याने जग जिंकू शकता. शब्दांचा जादुगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो. असे लोक फक्त आपल्या बोलल्याने काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात. आजच्या या लेखांमध्ये आपण चलाखीचे 21 नियम जाणून घेणार आहोत.

 

1. कमजोरी. मरून जा पण आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका. आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू, आपले सिक्रेट सगळं सांगून बसतो. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. कारण तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमची शत्रू झाली तुमच्या आणि त्या व्यक्तीमध्ये मतभेद झाली तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींसाठी व्यक्ती फायदा उचलू शकते. आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा. त्या उघडपणे कोणाला सांगणं म्हणजे आपल्या मूर्खपणाची हद्द असते.

 

2. आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट. जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचं करत आहात. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असेल. म्हणून खड्ड्यात गेली जग दुनिया आणि लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकणं तुम्हाला गुलाम बनवू शकतो.

 

3. योग्य शब्द राईट वर्ड्स. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द. ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील. योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते जिला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. शब्दांप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत. हे शब्द समोरच्याला समजायला हवीत. बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजतच नाही. बोला राजासारखं काम करा गुलाम सारखं. मेहनत करा मजुरा सारखी आणि आपला एटीट्यूड ठेवा बादशहासारखा.

 

4. स्वार्थी सेल्फिश. तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ असेल. एक चलाख व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपले कामही लोक काढून घेतात. जेव्हा तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेतात आणि काहीही मोबदला देत नाहीत तेव्हा समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही. पण जर तुम्ही समोरच्याला त्याच्या कामाच्या बदल्यात काही देण्याचा आम्हीच दाखवलं तर तुमचं काम लवकर होईल. या जगात तुमच्या कुटुंबीयांशिवाय कोणीही तुमच्या जवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.

 

5. नकारात्मक प्रश्न. कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल, नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिऍक्ट करू नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात. असा त्याचा अर्थ होतो. थंड डोक्याने विचार करून चलाखिने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल. कारण लोकांनी तुमचा मजा उडवण्या अगोदर शंभर वेळेस विचार करायला हवा.

 

6. पेशन्स संयम. ज्या माणसाकडे पेशन्स नाही, संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं. म्हणून कुठलंही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा यांचा विचार करून उत्तर द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा आणि तुम्ही प्रेशर मध्ये येऊन चुकीचा निर्णय घेऊन बसतात आणि तुमचं नुकसान करून घेता. म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या.

 

7. टॉपिक झोन. कुठल्याही मुद्द्यावर, कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा. कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा. काहीही बोलण्या अगोदर त्या मुद्द्याचा तुम्हाला विचार करायला हवा. तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल.

 

8. आत्मविश्वास. जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर लोकांना ते खरं वाटतं आणि जर तुम्ही खरं बोलत असाल पण तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटं वाटेल. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा. तरच लोक तुमचं बोलणं ऐकतील.

 

9. कमी बोला. प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणे. आपली किंमत कमी करून घेणे.

 

10. आय कॉन्टॅक्ट. नजरेला नजर देऊन बोलणे बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात. तुम्ही तसं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून कोणाशी बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा.

 

11 तोंडाने कडू पण मनाने साप. तोंडाने गोड असणारे तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका.

 

12. जलद आणि स्थिर विचार. एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना 1000 सोन्याची नाणी दिली आणि त्यांना अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायची आणि दुसरी अट पुढचे सात दिवस मी तुम्हाला भेटणार नाही. सात दिवसानंतर ज्यांची नाणी खर्च झालेली असेल त्याला मी आपल्या मंत्रिमंडळात चांगला आणि पाच हजार सोन्याची नाणी देइन. सात दिवसानंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले. सगळ्यांनी हेच सांगितलं की राजा नाणी खर्च झाली नाहीत. कारण तुम्ही दिसलेच नाही. तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही. त्यातला एक सल्लागार म्हणाला राजा मी माझी सगळी नाणी खर्च करून आलो आणि तुमच्या अटीनुसार राजाने आश्चर्याने विचारले कसे? सल्लागार म्हणाला प्रत्येक नाणं खर्च करताना मी त्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते देत होतो. कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावर तुमचं चित्र आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता. प्रश्न हा आहे की तुम्ही कितीही कठीण परिस्थितीमध्ये किती जलद आणि स्थिर विचार करता. कधी कधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीमधून निघणं कठीण आहे असं आपल्याला वाटतं आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो. तेव्हा त्याचं अडचणी आपल्याला सोप्या वाटतात.

 

13. पायाला लागलेली ठेच सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच समजदारीने जगायला शिकवते. पण काही लोक ठेच लागूनही सुधरत नाहीत. एकदा लागलेली ठेच त्यातूनच तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चला घेणे वागायला हवं.

 

14. मतलबी. या जगात मतलब हा शब्द वजनदार आहे. एकदा मतलब निघाला की चांगल्यातला चांगलं नातं तुटायला सुरुवात होते. माणसं दूर व्हायला सुरुवात होते. मतलब आहे तोपर्यंत सगळेजवळ राहतात आपल्या चलाकीने लोकांना बांधून ठेवातो पर्यंत सगळे जवळ राहतात. म्हणून आपल्या चलाखीनी लोकांना बांधून ठेवा. लोकांना त्यांचा मतलब दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा. त्यामुळे लोक तुमच्या पासून दूर जाणार नाही. एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितलं की दहा दिवसानंतर राणी मरणार आहे आणि झाले ही तसेच दहा दिवसानंतर आणि मरण पावली. राजाला संशयाला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावी. ज्योतिषी आपल्यासाठी अडचण होऊ नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. त्याला मारण्या अगोदर राजाने ज्योतिषाला विचारले तू ज्योतिष आहे ना चल सांग तुझा मृत्यू कधी आहे. ज्योतिषाने चलाकिने उत्तर दिले की तुमच्या मृत्यूच्या ठीक दोन दिवस अगोदर माझा मृत्यू आहे. राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर माझाही मृत्यू होईल. राजांनी त्याला सोडून दिले. लोकांना आपल्यावर असं निर्भर ठेवायला शिका की लोक आपल्या सोबत वाईट करणारच नाहीत.

 

15. ज्यांना काही ध्येय नाही. ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाही अशा लोकांसोबत कधीही बसू नका. ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते पण हे खरं आहे जसे एखाद्या चोरा सोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार. त्याच प्रकारे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात काही ध्येय नाही बोल नाही त्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाही. अशा व्यक्तींसोबत रहा ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार.

 

16. मनाने नाही डोक्याने विचार करायला शिका. जी व्यक्ती डोक्याने नाही मनाने इमोशनल भावनिक होऊन विचार करते त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात. आणि आपला स्वार्थ साधून घेतात म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करूनच घ्या.

 

17.विश्वास. खोटे बोलून काही काळासाठी लोकांचे लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता आणि मानही मिळू शकतात. पण ते खोटं जेव्हा उघड होईल तेव्हा तुमचा मान हा कचऱ्यातला डब्यामध्ये असणाऱ्या कचऱ्यासारखा होतो. तुमची खोटी शान ही काचेसारखी असणार आहे. खऱ्याचा दगड त्यावर पडला की ती फुटणार. म्हणून जे काही बोलायचं ते खरं बोला आणि खरं बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा. जो कायमस्वरूपी सोबत राहणार आहे.

 

18. स्वतःला जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींना लक्ष देऊ नका. कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात. इंटेलिजंट आहात. स्वतःला इतकंही हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मुर्खात काढून जाईल.

 

19. वेळ आणि मान तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्या दृष्टीने तुम्ही रिकामटेकडे आणि बेकार आहात. त्याच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल होते. म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी आहे.

 

20. स्वतःला कायम मजबूत दाखवा. एखादा साप विषारी नसला तरी तो फणा काढणं सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही. लक्षात ठेवा कधीही इतके सरळ राहू नका की कोणी येईल आणि तोडून जाईल. जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापले जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असेच दाखवा.

 

21. लोकांना त्यांच्याच जाळ्यात अडकवा. एका चित्रपटांमधील गोष्ट आहे जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जातो तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की आत मध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे. त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे. तो व्यक्ती आत मध्ये जातो आणि राजाला म्हणतो मला बांबूस हे शंभर फटके मारा त्याचीही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो. पण का तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एकाच अटी वरती आत मध्ये सोडलं की आत मध्ये मला जे काही बक्षीस मिळेल. त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल. हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने शंभर फटके ही शिपायाला दिले. लक्षात ठेवा लोकांना चला की नाही त्यांच्याच जाळ्यात अडकवायला शिका. कधीही दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतः सोबत कधी वाईट होऊ देऊ नका.

 

अशा प्रकारे हे 21 नियम जे तुमचं आयुष्य बदलु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.