समोरच्याच खोटं ओळखायचं असेल तर….. या पाच गोष्टी तुम्हाला माहित हव्यात …!!

Uncategorized

मित्रांनो, कोणीतरी म्हटलं आहे सत्याला आणि सूर्याच्या प्रकाशाला कधीही कोणीही लपवू शकत नाही. आपल्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग असतात ज्यावेळी आपल्याला माहित असतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे. आपल्याला मूर्खात काढत आहे पण मनात असूनही आपण काहीही करू शकत नाही. कारण समोरचा कधीही सांगणार नाही की खरं काय आहे. खरं, काय ते एकत त्याला माहीत असतं किंवा वरच्याला माहित असतं. आणि समोरचा याच गोष्टीचा फायदा उचलून आपल्याला गोल गोल फिरवत असतो.

 

समोरचा खोटं बोलू शकतो, खोट्या शपता घेऊ शकतो, कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून सर्रास खोटं बोलू शकतो. मग आपण स्वतः मध्य असं काही कौशल्य आणूया जेणेकरून समोरचा खोटं बोलतो आहे की खरं बोलतो आहे हे त्याच्या बोलण्यातून आपण अगदी काही मिनिटांमध्ये ओळखू शकतो. समोरच्याच खोटं बोलणं आपल्याला पकडता यायला हवं. आजच्या काळात हे गरजेचं झालं आहे. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एखाद्याचा interview घेत आहात तर समोरच्याच खोटं तुम्ही ओळखू शकता.

 

तुमचा जोडीदार तुमच्या सोबत खोटं वागत असेल तर ते तुम्ही ओळखू शकता. तुमच्यासाठी इतरांचं खोटं वागणं ओळखणं फार महत्त्वाचा आहे.तुमच्याकडे पैसा असेल नसेल प्रॉपर्टी असेल नसेल काही फरक पडत नाही पण समोरचा तुमच्याशी खोटं वागतो आहे का हे तुम्हाला ओळखता यायला हवं. आयुष्यात खूप सारे धोके मिळण्यापासून तुम्ही वाचू शकता. कारण माणसाला आयुष्यात एक टाईम खायला कमी मिळालं तरी चालेल पैसा कमी असेल तरी चालेल पण एखाद्याने दिलेला धोका विश्वासघात माणूस पचवू शकत नाही.

 

त्यावेळेस त्याला असं वाटतं की समोरच्याच खोटं मी अगोदर ओळखू शकलो असतो तर किती बर झालं असतं. आणि हेच वाक्य तुम्हाला बोलायला लागू नये म्हणून आजच्या लेखातून आपण समोरच्याचं खोटं कशाप्रकारे ओळखावे याबद्दलची पाच गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

1) खोट्या असलेल्या गोष्टी मोठ्या करून विचारा, चढवून विचारा. आता हे कसं करायचं उदाहरण घेऊन समजू या. तुमच्याकडे पाच हजार रुपये होते आणि तुम्ही तुमची रूम तुमच्या एका मित्रासोबत शेअर करत आहात आणि एक दिवस सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमचं पॉकेट चेक केल्यावर तुम्हाला त्यामध्ये फक्त तीन हजार रुपये मिळाले दोन हजार रुपये गायब होते. बाकीचे एटीएम कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर होत्या. फक्त पैसे चोरी झाले आहेत. आता तुम्हाला शंका आहे तुमच्या सोबत जो मित्र म्हणून तुमची रूम शेअर करतो त्याने तुमचे पैसे घेतले आहेत तुम्ही त्याला विचार तू माझी पाच हजार रुपये का घेतले माझे एटीएम कार्ड का घेतले आता समोरचा ही गोष्ट स्वीकार करणार नाही एक तर तो म्हणेल मी काहीही चोरी केलेली नाही आणि तुझ्या पॉकेट मधून पैसेही नाही आणि एटीएम कार्डही चोरले नाही.

 

आपलं खोटं पकडल्या जाऊ नये म्हणून समोरचा व्यक्ती गोंधळून जातो.समोरचा नेहमी हेच वाक्य बोलतो की मी तुझे पाच हजार रुपये काढले नाही मग तुम्ही त्याला विचारा 5000 नाही काढले तर किती काढले आणि कदाचित बोलण्यात वाहत जाऊन तो ते बोलून जातो जे तुम्हाला त्याच्याकडून काढून घ्यायचं असतं. मोठ्या चोरी पासून वाचायचं म्हणून समोरचा व्यक्ती तुम्हाला पाहिजे ते कबूल करू शकतो.

 

2) घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचार ज्याचं खोटं तुम्हाला पकडायचं आहे ज्याच्य तुम्ही बोलत आहात त्या व्यक्तीने आपल्या डोक्यामध्ये घटनांचा एक विशिष्ट क्रम लावलेला असतो. की त्याला काय सांगायचं आहे आणि काय नाही त्यांनी दिवसभरात काय काय केलं याचा क्रम तो नियोजनबद्ध पद्धतीने लावतो. मी कुठे गेलो मी काय काय केलं या सगळ्या गोष्टी सांगण्याचा त्याने रट्टा मारलेला असत. आता तुम्हाला काय करायचं एकदा त्याचं खोट ऐकल्यानंतर त्याला घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा. तुम्ही त्याला उलट सुलट प्रश्न विचारा आणि त्याच्या उत्तर सांगण्याकडे लक्ष द्या त्याचा क्रम चुकत असेल किंवा तो बोलताना अडखळत असेल घाबरत असेल गडबडत असेल तर समजून जा की समोरचा व्यक्ती खोटं बोलत आहे.

 

तो विचार करून उत्तर देत असेल विचार करण्याचा अभिनय करत असेल तर समजून जा तो त्याच्या जाळ्यात अडकला आहे. सत्य कितीही कडवट असलं तरी त्याची एक खासियत आहे सत्य बोलण्यासाठी खरं बोलण्यासाठी विचार करण्याची गरज पडत नाही.जर तुम्ही खरे असाल तर तुम्हाला तुमच्या डोक्यावर बुद्धीवर जोर टाकण्याची गरज काहीही आठवण्यासाठी. कारण सत्य घटनांचा क्रम आठवावा लागत नाही तो तुमचा अनुभव असतो तुम्ही तो जसाच्या तसा कितीही वेळेस विचारला तरी सांगू शकता पण खोट्याच्या बाबतीत तसं नाही खोट्या गोष्टी बनवलेल्या गोष्टी रचून सांगितलेल्या गोष्टी आठवाव्या लागतात त्यांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो.

 

3) समोरच्याचा खोटं पकडायचं असेल त्याला हा विश्वास द्या की त्याने जे केला आह. बरोबर केला आहे त्याच्या जागी आपण असतो तर आपणही तेच केलं असतं हा त्याला विश्वास द्या. माणूस खोटं का बोलतो हे अगोदर लक्षात घ्या माणूस तेव्हा खोटं बोलतो जेव्हा त्याचा काहीतरी फायदा असतो स्वार्थ असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याला लोक अपराधी समजतात आपण सत्य सांगितल्यावर लोक आपल्याला अपराधी समजतील आपली बदनामी होईल या भीतीने तो खरं बोलत नाही मग अशा व्यक्तीकडून खरं काढून घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही त्याच्यासारखेच आहात असं दाखवावं लागेल. तसा अभिनय करावा लागेल.

 

माझ्यासोबतही हेच घडलं होतं आणि मला त्या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप ना असे जेव्हा तुम्ही त्याला सांगता तेव्हा तो हा विचार करतो की अरे हा तर माझ्या सारखाच आहे मी केलेली चूक तर खूप छोटीशी आहे मी तर उगाच घाबरत होतो. जर तुम्ही त्याच्या मनाला त्याने केलेली गोष्ट खूप मोठी नाही हे जर पटवून देऊ शकलात तर तू कधी ना कधी त्याचा तुम्हाला सांगणार. चोर चोराचा भाऊ असतो एखाद्याचा खोटं वदवून घ्यायच असेल तर आपल्याला त्याच्यासारखं असण्याचं खोटं नाटक करावं लागतं.

 

4) समोरच्याला बोलण्याची जास्तीत जास्त संधी द्या आणि त्याची वाक्य त्याला पूर्ण करू द्या. आता तुम्ही म्हणाल जास्त बोलू दिलं म्हणजे तो खरं सांगेल हे कशावरून. जेव्हा तुम्ही समोरच्याला जास्त बोलायला देता तेव्हा या गोष्टीची शक्यता जास्त असते की तो आपलं बोलणं सतत बदलत असेल वाक्य बदलत असेल किंवा बोलता बोलता तो एखादी अशी गोष्ट बोलून जातो ज्याने ती अगोदर बोललेली नसेल. प्रत्येक वेळेस बोलताना तुम्हाला काहीतरी नवीन माहिती होत असेल तेव्हा समजून जा कुठेतरी काहीतरी गडबड आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याशी प्रश्न उत्तरे करता बोलतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बोलू द्या.त्याची वाक्य सगळे त्याला पूर्ण करू द्या तुम्ही मध्येच काह बोलू नका. त्याच्या प्रत्येक वेळेस बोलण्यात झालेला बदल तुम्हाला सांगून जाईल की तो खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे.

 

5) समोरच्याचा पटापट बोलणं घाई गडब बोलणं आणि नंतर मूळ मुद्द्याला बाजू. सारून दुसरच काहीतरी बोलणं. अशा वेळेस शक्यता असते की समोरचा खोटं बोलत आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याला घाई गडबडीत एखादा प्रश्न विचारतात तू तर असं केलं नाहीस ना तेव्हा तो गोंधळून जातो पटपट उत्तर देतो आणि जेव्हा तुम्ही मूळ मुद्द्यावर येतात त्याला विचारतात तेव्हा तो दुसऱ्याच गोष्ट बोलायला सुरुवात करतो किंवा मग जास्तीचे एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात करतो खोटं बोलणारे बडबड खूप करतात.

 

पण मुद्द्याच बोलत नाही जे खरं आहे ते बोलत नाहीत इतर गोष्टी बोलण्यात तुम्हाला अडकून ठेवतात तुमचा वेळ वाया घालवतात.आलतू फालतू च्या गोष्टी मध्ये खूप जास्त बोलतील तुम्हाला सहकार्य करत आहेत असे दाखवतील. पण मूळ मुद्द्याला हात घातला की त्यांची हावभाव बदलतील त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतील त्यांच्या आवाजाचा टोन बदलेल. किंवा मग तुम्हाला म्हणेल आता तू यापुढे एकही प्रश्न विचारला तर मी हे करेल मी ते करेल. म्हणजे तुम्ही त्याला सगळं विचारा पण खरं काय आहे ती गोष्ट विचारू नका. त्याचे चेहऱ्याचे भाव असतील. इथे जास्तीत जास्त शक्यता असते की समोरच्याने ते काम केलेल आहे पण तो सांगू शकत नाही किंवा त्याला ते सांगायचं नाही.

 

आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या प्रत्येक माणसाकडून चुका होतात यात शंका नाही पण प्रत्येकाला आपली चूक सुधारण्याची एक संधी द्यायला हवी. कारण एकच चुकीमुळे तुम्ही समोरच्याबद्दल आपलं ठाम मत बनवू शकत नाही कारण समोरच्याकडून ती चूक अनाहूतपणे झालेली असेल. काहीतरी मजबुरी असेल किंवा आणखी काही कारणं असतील त्यांनी ती चूक जाए -बुजून केलेली ही नसेल. की मग कधी कधी एखादा चूक करत असेल पण त्याच्या परिणाम पासून तो अनभिज्ञ असेल तो करत असलेल्या चुकीचे किती वाईट परिणाम होतील हे त्याला माहीत नसेल.

 

तुम्ही बेशक समोरचा चुकीचा असेल तर त्याला चूक म्हणा पण सुधार बदल हा प्रकृतीचा नियम आहे आणि प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी द्यायलाच हवी. हे आयुष्य आहे तिथे आपल्याकडून चूक झाली तरी ती मान्य करून पुढे चालण्याची हिंमत असायला हवी. एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटं बोलण्याची गरज नाही झालेली एक चूक मान्य केली तर पुढे खोटं बोलण्याची गरज पडत नाही. आयुष्य सुंदर आहे त्यामुळे झालेल्या चुका मान्य करा आणि पुढे जायला शिका.

 

अशाप्रकारे या पाच गोष्टींवरून आपल्याला आधीच करू शकतो की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.