श्रावण संपण्याअगोदर घरच्या घरी भरा कुलदेवीची ओटी…. ओटी कशी भरावी? … या वस्तूशिवाय ओटी अपूर्ण…..!!

Uncategorized

मित्रांनो, श्रावण महिना संपण्या अगोदर प्रत्येकाने कुलदेवीची ओटी भरायला हवी. मात्र असा प्रश्न पडतो. की देवाची ओटी केव्हा व सुरक्षित आणि कोणत्या ठिकाणी भरावी देवाची ओटी आपल्या देवाची जे स्थान आहे. त्या स्थानावर भरणे खूप असते. मात्र पे नी ज्यांना स्थानावर ओटी भरणे शक्य नाही, ते देखील देवाची ओटी भरू शकतात. याबाबतचे सविस्तर संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

ज्याही आपण देवाला दर्शनाला स्थानावर जातो. त्या ठिकाणी ओटी भरायचीच आहे पन स्वत: स्थानावर जाणे शक्य नसेल तर जर तुम्ही निश्चित देवाची ओटी भरू शकता. जर तुमची कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर तुम्ही कुलदेवीचा फोटो घेऊ शकता. जर तुमच्या कुलदेवीतेचा फोटो नसेल तर त्या दिवशी टाक असेल तर टाका समोर देखील तुम्ही ओठी भरू शकता. जर कुलदेवतेचा फोटो किंवा टाक नसेल तर लक्ष्मीमातेची ओटी भरली तरी चालते.

 

आता या देवीच्या ओटी कशाप्रकारे भरावी कोणकोणत्या वस्तूचा समावेश करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. कारण देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

 

‘देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवीतत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे.ओटी भरतांना हातांची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे रहावे. देवीची ओटी भरतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्त्व आकृष्ट होते. हे तत्त्व नारळाद्वारे खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास साहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे जिवाच्या शरिराभोवती संरक्षक-कवच निर्माण होते.

 

वस्त्रातून पृथ्वीतत्त्वाच्या साहाय्याने सात्त्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे गतीमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणार्‍याच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षक-कवच निर्माण होण्यास साहाय्य होते. तसेच साडी आणि खण यांमध्ये आलेल्या देवीतत्त्वाच्या सात्त्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमयकोश यांची शुद्धी होण्यास साहाय्य होते.

 

हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणार्‍या मुद्रेमुळे शरिरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास साहाय्य होते, तसेच मनोमयकोशातील सत्त्वकणांचे प्रमाण वाढण्यास साहाय्य झाल्याने मन शांत होते. या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीतजास्त नम्र होतो. देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी हाताच्या बोटांतून पूजा करणार्‍याच्या शरिरात संक्रमित होण्यास साहाय्य झाल्याने शरिरातील अनाहतचक्र कार्यरत होऊन पूजा करणार्‍याचा देवीप्रती भाव जागृत होतो. यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास साहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त, तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्त्विकता जास्त काळ टिकते.

 

 

तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो.’ विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो ? ‘त्या त्या देवीला तिचे तत्त्व जास्तीतजास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणार्‍या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीचे तत्त्व जिवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते. पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्त्व जास्तीतजास्त अन् लवकर आकृष्ट करणारे रंग (त्या त्या देवीच्या तत्त्वाशी संबंधित रंग) दिले आहेत.

 

 

५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते; कारण जिवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प-अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपांनी जिवाकरता कार्य करणे अवलंबून असते.

 

अशा प्रकारे आपण कोणत्याही मंगळवार किंवा शुक्रवारी श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी त्यामुळे नक्कीच आपल्याला सर्व अडचणी सर्व संकटे दूर होते.

Leave a Reply

Your email address will not be published.