नवरा बायकोचे प्रेम जिव्हाळा त्याचबरोबर विश्वास देखील तितकाच महत्त्वाचा असतो नात्यांमध्ये प्रामाणिकपणा असला तर कोणतेही नाते तुटत नाही आणि तर असते शेवटपर्यंत टिकत असतं आजकाल लोकांना असं वाटत असते की लव मॅरेज केलं तरच नातं चांगलं राहतं आणि अरेंज मॅरेज केलं तर ते नातं जास्त काळ टिकत नाही आणि आज काल जर आपण बघायला गेलो तर लव मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे या व्यतिरिक्त देखील विवाहबाह्य संबंध आहे तेवढेच बनवले जातात.
विवाहबाह्य संबंध म्हणजे काय हे आज आपण जाणून घेणार आहोत विवाह झालेला असून देखील इतर व्यक्तीशी संबंध ठेवणे म्हणजे विवाहबाह्य संबंध असे म्हटले जाते पुरुष किंवा स्त्री ही आपल्या नवरा बायकोला सोडून इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येत असतात आणि त्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवत असतात.
विवाहबाह्य संबंध म्हणजे फक्त शारीरिक संबंध असे नव्हे कधी कधी काही लोक भावनिक दृष्टीने समोरच्या व्यक्तीसोबत कनेक्टेड झालेले असतात असं हे विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण का वाढत आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे पसंती किंवा संमतीशिवाय लावलेली मुला मुलींची लग्न म्हणजेच की एकमेकांना पसंत नसताना केलेले लग्न मुलगा किंवा मुलगी हे लग्नासाठी तयार झालेले नसतात पण कुटुंबांच्या दबावामुळे हे लग्न करू इच्छिता आणि त्यानंतर ते लोक लग्न करतात किंवा त्या महिला आणि पुरुषाचा विवाहबाह्य संबंध ठेवण्याकडे जास्त कल असतो कोणती तरी व्यक्ती एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होते .
जेव्हा तिचं लग्न संमतीशिवाय होतं नाही आणि म्हणूनच कोणतीही स्त्री किंवा पुरुष हे आपले पहिले प्रेम विसरू शकत नाही आणि त्यामुळे भूतकाळाकडे झुकायला लागतं आणि तोच भावनिक निर्णय त्यांच्या नात्यांमध्ये किंवा आयुष्यामध्ये दुरावा निर्माण करायला तयार करत असतो.
मित्रांनो दुसरं कारण आहे ते म्हणजे कमी वयात झालेले लग्न कमी वयामध्ये झालेले लग्न याच्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये लवकर स्थिरता येते आणि ती स्थिरता अनेकांना थोडे काळ गेल्यानंतर बोरिंग असे वाटू लागते. कामाच्या दबावामुळे जोडीदाराला आणि घरच्यांना वेळ देखील देता येत नाही म्हणूनच अशावेळी ती व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीच्या शोधात असते आणि त्यामुळे ती व्यक्ती त्यांना शारीरिक आणि मानसिक सुखाची स्फूर्ती करून देईल आणि यामधूनच विवाहबाह्य संबंधांना सुरुवात होते.
मित्रांनो तिसरं कारण आहे ते म्हणजे बिघडलेले शारीरिक संबंध अनेक वेळा स्त्री पुरुष हे अफेअरला सुरुवात करतात आणि त्यामध्ये भावनिक अटॅचमेंट सोबत फिजिकल रिलेशन सुद्धा खराब होतं तज्ञांच्या मते असे म्हटले आहे की वैवाहिक नाते मजबूत ठेवण्यासाठी चांगले शारीरिक संबंध असणे फारच गरजेचे आहे. ज्या जोडप्यांमध्ये असे होत नाही. ते आपली लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी अफेअरच्या नादी लागत असतात.
मित्रांनो चौथे कारण आहे ते म्हणजे कुटुंब नियोजनात होणारी घाई नवीन नाते जुळवून घेण्यासाठी आपल्याला थोडा वेळ हा घ्यावा लागतो आपल्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी आपल्याला थोडा वेळ काढून घ्यावा लागतो आणि त्या काळामध्ये कुटुंब नियोजन बाबत त्या दोघांनी खूप विचार करून हा निर्णय घ्यावा पण ज्यावेळी मुलाची जबाबदारी घेण्याची मानसिक तयारी झालेली असते .
काही जोडपे मुलांना जन्म देतात त्यामागे घरगुती आणि सामाजिक अशी दोन्हीही कारणे असतात आणि त्याचबरोबर नवीन नात्यासोबत मुलाची ही जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते आणि त्यामुळे त्यांची प्रसनल पूर्णपणे वेगळी होऊन जाते आणि म्हणून ते नवीन नातं शोधू लागतात.
पाचवं कारण आहे ते म्हणजे पैशाची कमतरता आणि ते फार महत्त्वाचं कारण आहे. वैवाहिक जोडप्यांमध्ये भांडण होण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे पैसा म्हणजेच की आर्थिक दृष्ट्या स्थिर नसलेलं कुटुंब त्यामुळे घरामध्ये सारखी चिडचिड होते आणि म्हणूनच ती व्यक्ती आर्थिक स्थिती चांगली असलेले जोडीदार शोधू लागते त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकेल सततच्या भांडणामुळे देखील आपल्या पाटनरला कंटाळलेले असतात तर मित्रांनो ही आहेत विवाहबाह्य संबंध ठेवलेली ची कारणे.