मित्रांनो, आकर्षणाशिवाय नातं निर्माण होऊ शकत नाही हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आकर्षण निर्माण झाल्यामुळेच माणूस प्रेमात पडत असतो. साहजिकच नातेसंबंधामध्ये आकर्षणाचा विशेष म्हत्वे आहे. तुमच्या चालल्या, बोलण्या, वागण्याकडेही समोरचा व्यक्ती आकर्षित हित असतो. एकूणच काय तर देहबोली समोरच्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्वाचा रोल पार पाडते. आज आपण पुरुषांच्या कोणत्या देहबोलीवर महिला आकर्षित होतात? हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
महिला आपल्याकडे देखील आकर्षित व्हाव्यात असं प्रत्येक पुरुषांना वाटत असतं. जर तुम्हाला देखील असं वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महिलांच्या मनात कधी काय चाललं असतं हे ओळखणं जवळजवळ शक्य असतं. त्याच्यामुळे महिलांना नक्की काय आवडतं महिलांना कसा आकर्षित करायचं याविषयी पुरुषांना फारशी माहिती नसते. महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरुषांना अनेक पापड बेलावे लागतात. मात्र पुरुषांनी जर त्यांच्या देहबोलीकडे लक्ष दिलं तर तुम्ही महिलांना तुमच्यावर जीव ओवाळून टाकण्यास भाग भाग पाडू शकता.
प्रत्यक्ष संवादापूर्वी व्यक्तीची सर्वप्रथम देहबोली बोलत असते. याचाच अर्थ मूलभूत संवाद हा देहबोलीवर अवलंबून असतो. पुरुषांच्या काही गोष्टी महिलांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. परंतु काही गोष्टी अशा असतात, ज्यामुळे त्या एकमेकांपासून दूर घेऊन जातात. आज आपण पुरूषांच्या देहबोलीवर भाष्य करणार आहोत. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या महिलांना आपल्याकडे आकर्षित करतील? जाणून घेऊया स्त्रियांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरुषांकडे कोणत्या प्रकारची देहबोली असायला हवी.
पुरुषांच्या सहवासामध्ये स्त्रियांना सुरक्षिततेची भावना निर्माण होणे फार गरजेचे असते. आणि अगदी लहान हावभाव देखील मोठा प्रभाव पाडू शकतात. गर्दीच्या ठिकाणी मुलीला एक प्रकारे संरक्षण देणे पुरुषांचे प्राधान्य असायला हवं. जर तीला दुखापत झाली, तर तिची काळजी घेणे, किंवा तिला दुखापत होण्यापासून वाचवणे. या छोट्या-छोट्या गोष्टी स्त्रियांना खूप आवडतात. पुरुषांनी केलेल्या या गोष्टी त्यांना पुरुषांकडे आकर्षित करतात.
आत्मविश्वासाने परिपूर्ण पुरूष स्त्रियांना खूप आवडतात. पुरुषांच्या सहवासात स्त्रिला सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायला हवी. अशा स्थितीत जर पुरुषाने प्रेमळपणाने तिच्याशी संवाद साधला, तर तो अधिक आकर्षक ठरतो. मान झुकवून, खांदे वाकवून नजर चोरून बोलणारे पुरूष स्त्रियांना फारसे आवडत नाहीत. डोळ्यात डोळे घालून थेट संवाद साधणारे पुरुष खोटे बोलत नाहीत असा महिलांचा समज असतो. चे पुरुष महिलांच्या डोळ्यात डोळे घालून थेट संवाद करतात अशा पुरुषांमध्ये महिलांना आत्मविश्वास जाणवतो.
नजरेला नजर भिडवून बोलणे म्हणजे डोळे काढून किंवा टक लावून पाहणे नव्हे. काहीवेळा नजरानजर होताना डोळ्यातील प्रेमाचे भाव स्त्रियांना पुरुषांकडे आकर्षित करतात. होय जर कोणी तुमच्याकडे सतत टक लावून पाहत असेल, तर तुम्हाला नक्कीच अस्वस्थ वाटेल. पण प्रेमाने नजरा नजर झालेली कोणाही स्त्रिला आवडेल. म्हणूनच आकर्षणाच्या नियमात डोळ्यात डोळे घालून बोलण्याला फार महत्व आहे.
फक्त डोळ्यांनी बोलणे आवश्यक नाही. महिलांसोबत संवाद साधत असताना नेहमी आपला चेहरा हसरा ठेवणे फार आवश्यक आहे. खांदे उंचावून बोलणे, ही देखील एक कला आहे. ज्या पुरुषांचे खांदे रुंद आहेत, त्यांनी त्यांचा वापर करून त्या शैलीत बोलण्याचा प्रयत्न करावा. आपल्या बोलण्यात नेहमी समोरच्याला आत्मविश्वास दिसला पाहिजे. तरच तो तुमच्याकडे आकर्षित हित असतो.
आकर्षणाचे नियम बघायचे झाले तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील पहिला शारीरिक संपर्क हा ओठातून होतो. जसे पुरुषांना स्त्रिया बोलत असताना ओठांना हात लावणे किंवा बोलताना दातांच्या मध्ये घेणे आवडते. तशीच परिस्थिती महिलांच्या बाबतीत घडते. हे कनेक्शन खूप उच्च आहे. जेव्हा तुमचे आणि तुमच्या क्रशमधील कनेक्शन खूप वाढले असेल, तेव्हा हे केले पाहिजे.
अशाप्रकारे स्त्रिया कोणत्या प्रकारची देहबोली असलेल्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेतलेली आहे.