जर कोणी सारखा सारखा तुमचा अपमान करत असेल तर काय करायचे ?…. फक्त ह्या ३ गोष्टी शिका मरेपर्यंत कोणीच अपमान करणार नाही ..!!

Uncategorized

मित्रांनो, अनेक वेळा असे वाटत असते की जी लोक चांगले असतात. त्यांना अनेक लोक त्रास देतात. जे लोक दुसऱ्यांच्या कोणत्याही गोष्टींमध्ये मध्ये पडत नाही. त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत नाही. अशाच लोकांना जास्त प्रमाणात अपमान सहन करावे लागतात. परंतु या लोकांनी जर वेळस उत्तर दिले नाही तो ते त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट गमावू शकतात. म्हणूनच अशा लोकांना आपण वेळेत उत्तर देणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण अशा काही तीन गोष्टी जाणून घेणार आहोत जर कोणी आपला सतत अपमान करत असेल तर अशावेळी काय करायचे? हे आपल्याला समजत नसते. म्हणूनच या तीन गोष्टी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

पहिली गोष्ट म्हणजे मी नेहमी स्वतःची प्रगती करत रहा. स्वतःचे ज्ञान वाढवत रहा. स्वतःचा विकास करत रहा. ज्ञान वाढवणे म्हणजे फक्त पुस्तके वाचणे नव्हे. पुस्तके तर वाचलीच पाहिजे. त्याच्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात ज्ञान मिळते. ज्याचा उपयोग आपण आपल्या भविष्यासाठी खूप प्रमाणात करू शकतो. परंतु आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नवीन काय शिकायला मिळते याच्याकडे लक्ष दिले पाहिजे.

 

आणि आपला जास्तीत जास्त विकास कशा प्रकारे होईल. त्याच्याकडे लक्ष द्यावे. जेणेकरून जर आपण आपला विकास करत गेले जास्तीचे ज्ञान प्राप्त करत गेलो. तर त्यातून आपला आत्मविश्वास वाढेल आणि जर आपल्याला कोण सारखे सारखे अपमान करत असेल तर त्यांना उलट उत्तर देण्यामध्ये आपला आत्मविश्वास आपल्या कामी येईल.

 

दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना जर कोणी अपमान केला तर ते निमुठपणे सहन करत असतात आणि त्यांना कळत नाही की त्यांना प्रतिउत्तर आपण कसे द्यावे. त्यामुळे त्यांना प्रश्न पडत असतो की या लोकांना आपण प्रत्युत्तर कशाप्रकारे दिले पाहिजे? प्रत्युत्तर देने एक कला आहे आणि ती कला आपल्याला येणे खूप गरजेचे आहे. जर एखाद्याने अपमान केला व त्याला आपन उत्तर दिले नाही तर तो पुन्हा आपले अपमान करण्याचा प्रयत्न करेल.

 

आणि ते आपण निमुट पणे सहन करत राहिलो तर आपण आपला आत्मविश्वास गमावू शकतो. त्याच्या सहनशीलतेचा अंत होतो. त्यामुळे त्याचा परिणाम अत्यंत भयंकर होऊ शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या नात्यावर होऊ शकतो. आपले नातेसंबंध उध्वस्त होऊ शकतात. पण हे करणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीला जर प्रत्युत्तर देणे जमत नसते तर त्या व्यक्तींना समोरच्या व्यक्तीला एकदम चिडून न बोलता प्रेमाने व समंजसपणाने प्रतिउत्तर देणे खूप गरजेचे असते.

 

जर आपण सतत असे म्हणू लागलो मी बोलले तर भांडणे होतात आणि त्याचा परिणाम वाईट होतो आणि जर आपण हेच बोलत राहिलो व काहीच त्या व्यक्तीला प्रत्युत्तर दिले नाही तर आपण आपला आत्मविश्वास गमाऊ शकतो. म्हणून कधीही गप्प न बसता ज्या त्या वेळेस ज्या त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देणे खूप गरजेचे असते. असे जर आपण केले तर ती व्यक्ती पुन्हा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही.

 

तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वाईट संगती पासून व मूर्ख लोकांपासून दूर राहा. कारण अशी लोक इतरांना त्रास देण्यात खूप पारंगत असतात. त्यांना इतरांची सुख व प्रगती बघवत नसते. त्यामुळे ते सतत त्यांचे खिल्ली उडवण्यात मग्न असतात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या चुका आहेत हे ते शोधून काढत असतात आणि त्यांना सतत अपमानित करण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. याच गोष्टींमध्ये ते आपला वेळ वाया घालवत असतात. त्यामुळे ते स्वतःची प्रगती कधीही करू शकत नाही. म्हणून आपण अशा गोष्टींपासून दूरच राहिले पाहिजे.

 

अशाप्रकारे या तीन गोष्टीचा आपण आत्मसात केल्या तर नक्कीच आपल्याला जर कोणी सतत त्रास देत असेल तर त्यांना प्रत्युत्तर आपल्याला सहजपणे देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.