रोज टेंशन येतंय, लोकं टेंशन देतायत, काळजी करू नका,… हा उपाय करा ?

Uncategorized

मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला सतत टेन्शन हे असत. या टेन्शनची कारणे वेगवेगळी असू शकतात. काही लोकांना त्यांच्या परिस्थितीमुळे टेन्शन येत असतील. तर काही जणांना इतर लोकांमध्ये टेन्शन येत असते आणि यामुळे आपले जीवन हे या टेन्शनमध्ये जात असते. लक्षात ठेवा की जीवन हे आपल्याला एकदाच मिळत असते. टेन्शन मात्र सतत त्यांना मिळत असते. आपण सतत टेन्शन घेऊन राहू नये. या टेन्शन मधून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर आपल्या मनात चांगले विचार असणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या लेखातून आपण चांगला विचारांची शिदोरी जाणून घेणार आहे.

 

वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धुर्त आहे ते फक्त आश्वासन देते, खात्री नाही….

गुलमोहर फुलताना आईच्या कुशीतून पाहावं गुलमोहर सारखं फुलत आईच्या कुशीत जगावं. असेच तुमच्या सर्वांचे जीवन सुंदर असावे.

सत्य सांगण्यासाठी कोणाच्याही शक्तीची गरज नसते. नदीला वाहण्यासाठी कुठल्याही रस्त्याची गरज नसते. जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना देहाकडे पोहोचण्यासाठ कुठल्याही रथाची गरज नसते.

पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही; आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही.

सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल; हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःखं दूर होतील.

जेव्हा माणसाची योग्यता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.

तुम्ही कितीही चांगले राहा ! कितीही चांगले काम करा ! पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ! जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ! ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार ! कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते ! दृष्टिकोनाचे नाही !

“आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.. एखाद्या दिवशी जागे व्हाल. तेव्हा कळेल की. तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला…

संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो.

इतरांपेक्षा वेगळे बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही, तर विचार आणि संस्काराने बना कारण माणसाचं चेहरं कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात.

मात्र माणसाचे विचार आणि संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात, आपण सगळे माणूस आहोत, आधी माणूस बनू, माणुसकी जपू, कणाकणात आणि मनामनात.

लोकं खोटे बोलून सर्व माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून, सर्वापासून दूर राहतो.

धोका कधी मरत नसतो. आज तुम्ही देणार, उद्या तुम्हाला पण भेटणार.

अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही.

शत्रूनं केलेलं कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती असते.

ज्यानं आयुष्यात काही साध्य केलं नाही त्यानं तुम्ही काय करायला हवं हे तुम्हाला बिलकुल सांगू देऊ नका !

आपल्या आयुष्याचे नियंत्रण तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातात ठेवा, नाहीतर ते नियंत्रण दुसरे कोणीतरी घेईल !

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नेहमी दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे तुमच्या समस्या तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि तुमचा रस्ता तुम्हाला स्वतःलाच चालायचा आहे.

दुसऱ्याला मदत करताना जर आपल्या मनाला आनंद किंवा समाधान वाटत असेल तर ती खरी सेवा असते, बाकी सर्व दिखावा असतो.

संकटकाळी ज्यांचं दरवाजे आपल्याकरता खुलं असतात तेच आपले खरे नातेवाईक असतात.

आपली वाटणारी सगळीच माणसे आपली नसतात. कारण “वाटणं” आणि “असणं” यात खूप फरक असतो.

आयुष्याची पहिली अंघोळ आणि शेवटची आंघोळ मनुष्य स्वतःच्या हाताने करू शकत नाही. म्हणून आयुष्य जगत असताना, जास्त घमंड करायचा नसतो.

माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबरोबर भेदभाव करू नका. कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही.

जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा !

कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे मनोबल दुबळे करणारेच असतात.

एक शब्द आहे “नशीब” त्याच्याशी लढून बघा आणि जिंकला नाही तर सांगा आणि आजून एक शब्द आहे तो म्हणजे- “कर्तृत्व” आर्ततेने स्वीकारून बघा एक दिवस नशीब बदलून जाईल !

वेदनांच्या बोझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं, त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणीच नसतो.

 

अशा प्रकारे ही काहीच विचारांची शिदोरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.