फक्त १ रुपयात चमकवा अगदी नव्यासारखी घरातील चांदी, स्टील, आणि पितळेची सर्व भांडी…..!!

Uncategorized

मित्रांनो, भांडी घासणे हे आपल्यापैकी बहुतेकांना दररोज तोंड द्यावे लागणारे काम आहे. अनेकदा स्वयंपाकघरात काम करताना भांडी जळतात. यानंतर जळलेल्या भांड्यातून हट्टी आणि घाणेरडे डाग काढून टाकणे खूप कठीण काम होते. स्वयंपाकासाठी वापरण्यात आलेल्या भांड्यांवर स्निग्ध आणि तेलकट डाग हे भांडी घासणे कठीण बनवते, जे स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ लागतो.

 

स्वयंपाकघरामध्ये स्टीलच्या धातूच्या भांड्यांचा सर्वाधिक वापर केला जातो. कारण स्टीलच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्याने आरोग्यास हानी पोहोचत नाही, असे म्हटले जाते. वारंवार होत असलेल्या वापरामुळे स्टीलची भांडी काळी पडू लागतात, त्यावरील चमक नाहीशी होते. पण आपण काही सोपे घरगुती उपाय करून स्टीलची भांडी स्वच्छ करू शकता, ज्यामुळे भांड्यावरील चमक नाहीशी होणार नाही आणि स्वच्छही होतील.

 

त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे डबे देखील असतात. त्यामध्ये स्टील आणि जर्मन या दोन्ही धातूंचा समावेश आहे. जर्मनीची भांडी काळांतराने काळी करू लागतात आणि स्टीलची भांडी देखील आस्वच्छ दिसू लागतात. यासाठी आजच्या लेखांमध्ये आपण एक रुपयाच्या सहाय्याने करण्यात येणारा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. की जो केल्यामुळे आपली भांडी अगदी स्वच्छ व लखलखीत होतील.

 

या उपायासाठी आपल्याला प्रथम एक मोठे बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गरम पाणी घ्यायचा आहे. गरम पाणी हे इतके गरम असावे की त्यात आपण सहज रित्या हात घालू शकतो. म्हणजेच कोमट पेक्षा जरा जास्त करेल असे पाणी ते असावे. त्यानंतर त्यामध्ये एक रुपयाच्या शाम्पूच्या पॅकेट मध्ये शाम्पू घालायचा आहे आणि त्यानंतर थोडेसे त्यामध्ये मीठ घालावे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालावा.

 

अशा प्रकारे हे व्यवस्थित रित्या हलवून एकत्र करून घ्यावे. एकत्र झाल्यानंतर आपण आपल्या घासणेच्या साह्याने आपण आपली डबे घासू शकतो. अगदी तारेचा घासणीने देखील घासण्याच्या आपल्याला आवश्यकता नाही. साथ मऊ कापडी घासणे देखील ही भांडी घासू शकतो व अगदी स्वच्छ व लखलखीत होऊ शकतात.

 

अशाप्रकारे हा साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच तुमच्या घरातील सर्व भांडी स्वच्छ व लखलखीत होतील.

Leave a Reply

Your email address will not be published.