पावसामुळे फुगून घट्ट झालेले दरवाजे मोकळे करा फक्त काही मिनिटात करा ‘हे’ ५ सोपे घरगुती जुगाड…….!!

Uncategorized

मित्रांनो, पावसाळ्यात हातात वाफाळता चहा आणि भजीची प्लेट धरून छान बाल्कनीत बसून एन्जॉय करण्याची कितीही इच्छा असली तरी अनेकदा घरातील स्वच्छता, बिघडलेल्या वस्तू यामुळे आपली कामच जास्त वाढत राहतात. एक खास बाब म्हणजे पावसाळ्याचे त्रास हे गरीब श्रीमंत असा भेद करत नाहीत. म्हणजे एखाद्या चाळीतल्या घरात भिंतीला ओल धरण्याचा, जमीन चिकट होण्याचा, कपडे न सुकण्याचा, दरवाजे घट्ट होण्याचा त्रास जसा होतो तसाच बंगल्यात, बिल्डिंगमध्येही हा प्रश्न असतोच.

 

कदाचित तीव्रता कमी जास्त असू शकते पण हे त्रास कोणाचाच पिच्छा सोडत नाहीत. पण म्हणतात ना जितके प्रश्न तितके वेगळे उपाय शोधणं हे भारतीयांचं कसब आहे. आज आपण पावसाळ्यातील मुख्य समस्यांपैकी एक म्हणजे घराच्या दारं- खिडक्यांचे दरवाजे पावसात फुगल्याने घट्ट होणे हे फुगलेले आणि घट्ट झालेल्या दरवाजांची काळजी कशाप्रकारे आपल्याला घेता येईल जेणेकरून ते घट्ट होणार नाही त्याविषयीचे पाच उपाय आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

१) तेल: जसं पावसाळा-थंडीत तेल, बॉडी लोशन आपल्या त्वचेचं रक्षण करतं तसंच, तेल लाकडाच्या पृष्ठभागाचं रक्षण करतं. तुम्ही पावसाळ्याच्या आधीच हे उपाय करायला हवेत पण तेव्हा शक्य झालं नसेल आणि आता करणार असाल तरी हरकत नाही. कापसाच्या बोळ्याने दरवाजाला तेल लावल्याने पाण्याचे ओले थेंब दारावर टिकत नाहीत आणि दरवाजे फुगण्याचे प्रमाण कमी होते.

 

२) वॅक्स- बाजारात दारांसाठी विशेष पॉलिश सुद्धा उपलब्ध असते. तुम्ही अगदी कोणाचीही मदत न घेता सुद्धा हे पॉलिश दारावर लावू शकता. यामुळे लाकडी दरवाजे फुगण्याचे प्रमाण तर कमी होतेच पण त्याशिवाय दरवाजाला एक नवीन झळाळी सुद्धा मिळू शकते.

 

३) मेणबत्ती: अवघ्या २ रुपयांची मेणबत्ती खरोखरच पावसातील अनेक त्रास वाचवू शकते. तुम्हाला बाजारातुन वॅक्स आणायचे नसल्यास घरच्याघरी काही मेणबत्त्यांच्या चुरा करून त्यात तेल घालून नीट मिसळून घ्या आणि हेच मिश्रण दरवाजावर लावू शकता.

 

४) मोहरीचे तेल: अनेकदा लाकडी दरवाजा फुगल्यावर कड्या व स्क्रूवर खूप दबाव येतो त्यामुळे त्यांना सुद्धा वंगणाची गरज आहे हे लक्षात घ्या. तुम्ही कापडावर किंवा कापसाच्या बोलल्यावर मोहरीचे काही थेंब तेल घेऊन हे जॉइंट्स पुसू शकता त्यामुळे घर्षणाने येणारा कर्कश्श आवाज सुद्धा कमी होऊ शकतो.

 

५) पुसण्याची पद्धत: सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कितीही उपाय केले आणि पुन्हा पुन्हा दरवाजे स्वच्छ करताना ओला कपडा वापरला तर तुमचा कोणताच त्रास कमी होणार नाही. आपल्याला साधारणपणे कुठलीही गोष्ट स्वच्छ करताना ओला फडका फिरवल्याशिवाय स्वच्छ वाटतच नाही. पण अशा सवयींमुळे दारं- खिडक्यांचे नुकसान होऊ शकते. अगदी काच स्वच्छ करायला वापरले जाणारे लिक्विड सुद्धा दारांवर स्प्रे करू नका. कोरड्या कपड्याने लाकडी वस्तू पुसण्याची सवय लावा.

 

अशाप्रकारे या पाच घरगुती उपायांनी आपण आपला दारांची काळजी घेऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.