पगार कितीही कमी असुद्या, हे पाच नियम तुम्हांला बनवतील करोडपती पहा कोणते आहे हे नियम?

Uncategorized

मित्रांनो, अनेक वेळा आपल्या सोबत असे घडत असते की आपण नोकरी तर करतच असतो. परंतु आपल्याकडे एक रुपया देखील टिकून राहत नाही. नोकरीच्या पगारातून आलेले पैसे हे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सतत खर्च होत असतो. आपल्याकडे एक रुपये देखील शिल्लक राहत नाही. आणि त्यामुळेच आपण कोणत्याही प्रकारचे बचत करू शकत नाही.

 

आपण कमवत असतो तर भरपूर परंतु त्यातले बचत आपल्याकडे एक रुपये देखील नसतात आणि त्यामुळे आपण आपले राहणीमान सुधारू शकत नाही. यासाठीच या लेखामध्ये आपण काही पाच नियम जाणून घेणार आहोत. की नोकरी करता करता जर हे नियम आपण पाळले तर आपण करोडपती होऊ शकतो.

 

पहिला नियम म्हणजे असेटस आणि लायबिलिटी मधला फरक समजून घेणे. श्रीमंत लोक हे असेट खरेदी करत असतात आणि गरीब लोक त्यांचे पैसे लाइब्रेटीवर खर्च करतात. आपण जेव्हा एखादा मोबाईल फोन खरेदी करतो त्यावेळी दुसऱ्या दिवशी त्याची किंमत 25% कमी होते. म्हणजेच ही एक लायबिलिटी आहे. जे सातत्याने कमी होत असते. आपण आपले पैसे खर्च करत असताना असेट वरती करावे. ज्यातून आपल्याला उत्पन्न मिळेल. जसे की म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, गोल्ड व इतर. अशा वस्तूंवर आपण आपली गुंतवणूक करावी. ज्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये फायदा होईल. अशा ठिकाणी आपण आपले पैसे खर्च करावे. भविष्यात करोडपती होण्यास आपल्याला सहाय्यता होईल.

 

दुसरा नियम म्हणजे पगार झाला स्वतःला पगार द्यायला शिका. म्हणजेच आपला पगार झाला की प्रथम दहा टक्के एवढी रक्कम स्वतःसाठी काढून ठेवावे. उरलेल्या रकमेतून आपण घर खर्च चालवायला. जेणेकरून हे जे 10% रक्कम आपण बाजूला काढत आहोत त्यातून थोडाफार प्रमाणामध्ये आपली बचत होईल व भविष्यामध्ये आपल्याला विविध मार्गातून बचत करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि आपण करोडपती होण्याच्या मार्गावर जाऊ.

 

तिसरा नियम म्हणजे महागाईला मागे टाकेल अशा ठिकाणी गुंतवणूक करावी. तुम्हाला तर माहीतच आहे की आजकाल महागाई खूप झपाट्याने वाढत आहे. म्हणून च आता पैशाला तितकी किंमत राहिली की नाही. 2000 मध्ये शंभर रुपयाला जितकी किंमत होती तेवढी किंमत 2024 मध्ये नाही. आपल्याला गुंतवणूक करत असताना अशा ठिकाणी करायचे आहे की ज्यातून आपल्याला महागाई वाढली तरी त्यातून त्या महागाई प्रमाणे मोबदला दिला जाईल. जसे की शेअर मार्केट म्युच्युअल फंड, बॉण्ड्स व इतर.. मध्ये गुंतवणूक केल्याने आपल्याकडे पैसे चांगल्या प्रकारे येतील व ज्या प्रकारे महागाई वाढत जाईल त्या प्रकारे आपला गुंतवणुकीत देखील वाढ होईल.

 

चौथा नियम म्हणजे मित्रांची संगत करताना चांगला मित्रांची करावी. कारण संगतीप्रमाणे आपल्यामध्ये गुन उतरत असतात. जर आपल्याला चांगले मित्र मिळाले पॉझिटिव्ह विचार करणारी मित्र म्हणून तर त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगली संगत राहावं लागेल. आपण आपल्या जीवनात सुधारू शकतो. परंतु जर वाईट सांगतीचे, उधळपट्टीचे मित्र मिळाले तर आपण आपले जीवन उध्वस्त करून जाऊ. म्हणून आपली संगती नेहमी चांगलेच असलं पाहिजे.

 

पाचवा नियम म्हणजे जास्त लक्झरी या वस्तूंवर पैसे खर्च करू नये. कारण या वस्तू खूप महाग असतात. आणि त्यामुळे आपल्या कमाईतील भरपूर पैसे खर्च होतात. त्याचबरोबर घरी व्यक्ती लक्झरी असते स्वतःसाठी नाही तर इतरांना आपला मोठेपणा दाखवण्यासाठी खरेदी करत असतात आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पैसे जास्त खर्च करत असता. आणि त्यामुळे तुमची बचत होत नसते. म्हणून नेहमी साधेपणाने राहावे.

 

प्रकारे हे काही पाच नियम आहेत. ज्यामुळे आपण नोकरी करता करता करोडपती होऊ शकतो. हे पाच नियमांचे पालन आपण नेहमी करायला हवेत. तरच आपल्याकडे चार पैसे टिकून राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.