तुम्हाला दुःख दिलेल्या लोकांचा बदला घ्यायचा असेल तर ………. हे एक काम जरूर करा?

Uncategorized

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक असे प्रवास येतात की ज्यामध्ये पण काही वेळेला सुखी असतो तर काही वेळेला दुःख असतो. या प्रवासामध्ये काही आपल्या सोबत राहतात तर काही आपल्याला धोका देऊन जातात. यालाच तर जीवनाचा प्रवास म्हणत असतात. या जीवनात प्रवासामध्ये आपल्याला जर काही साध्य करायचे असेल तर आपल्याला काही गोष्टी माहित असणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या या लेखातून आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

जेवढी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करायची कमी कराल, तेवढे जास्त तुम्ही आनंदी राहाल.

जर तुम्हाला मनाने Strong व्हायचे असेल, तर एकटे असताना आनंदी राहायला शिका.

स्वतःला वचन द्या, ह्या जगातल्या कुठल्याही बाह्य गोष्टीमुळे तुम्ही तुमची मनःशांती बिघडू देणार नाही.

शांत राहणे आणि Smile हि दोन शक्तिशाली शस्त्र आहेत. शांत राहिल्याने अनेक समस्या टाळल्या जातात. आणि Smile केल्याने अनेक समस्या सोडवल्या जातात.

भूतकाळातील गोष्टी उगाळत बसू नका. भविष्यकाळाची चिंता करू नका. वर्तमानकाळात जगायला शिका.

तुमचे तोंड तेव्हाच उघडा, जेव्हा तुमचे शब्द, तुमच्या शांततेपेक्षा मौल्यवान असतील.

तुमचा आनंद कधीही दुसऱ्यांमध्ये शोधू नका, अश्याने तुम्ही एकटे पडाल तो आनंद स्वत:मध्ये शोधा, कारण जेव्हा लोक तुम्हाला एकटे पाडतील, तेव्हा सुद्धा तुम्ही आनंदी असाल.

स्वत:वर विश्वास ठेवा, आत्तापर्यंत तुम्ही अनेक संकटे, समस्यांना तोंड दिले आहे. आणि इथून पुढे सुद्धा कितीही संक्रटे, समस्या आल्या, तरी त्याला सुद्धा समर्थपणे सामोरे जाल.

अपेक्षा करणे सोडून द्या, स्वीकार करायला शिका. आयुष्य खूप सुंदर आहे.

नेहमी चुकीसाठी माफी मागा. प्रामाणिकपणासाठी नाही.

आनंदामध्ये कोणतेही वचन देऊ नका. रागामध्ये कोणतेही उत्तर देऊ नका. आणि दुःखी असताना कोणताही निर्णय घेऊ नका.

जेव्हा चुकीची माणसं तुमच्या आयुष्यातून निघून जातात, तेव्हा योग्य गोष्टी. घडायला लागतात.

ज्या लोकांनी तुमचे मन दुखावले आहे, त्यांचा बदला घ्यायचा असेल तर त्यांना दाखवून द्या, त्यांच्याशिवाय सुद्धा तुम्ही आयुष्यात आनंदी आणि सुखी राहू शकता.

 

अशाप्रकारे आपल्याला जीवनामध्ये जर सुखी राहायचे असेल तर या काही गोष्टी आपल्याला माहीतच असणे खूप गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.