चुकीचे वागत असलेल्या सुनांना वठणीवर आणायचे असेल तर नक्की वाचा? जशास तसे सगळ्यांनी ऐकावी अशा बोधकथा…!!

Uncategorized

मित्रांनो, काही व्यक्ती आपल्याशी चांगले वागत असतात. तर काही व्यक्ती आपल्याशी वाईट वागत असतात. आपल्याला प्रत्येकांसोबत जशास तसे वागणे खूप गरजेचे असते. म्हणूनच आज आपण या लेखातून एक बोधकथा जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्याला जशास तसे कसे वागावे? याबद्दलची शिकवण मिळते.

 

आशिष आज ऑफिस वरून घरी एक तास आधीच आला. तो कारमधून उतरला आणि घरात येऊन त्याने पाहिले तर त्याची बायको स्वाती तयार होऊन सोप्यावर बसली होती… तिला पाहून आशिष म्हणाला “अरे वा स्वाती आज खूप छान दिसत आहेस. तू कुठे बाहेर चालली आहेस का?” स्वाती म्हणाली “कुठे चालली आहेस म्हणजे? अरे आपण दोघे जाणार आहोत. माझ्या आईचा फोन आला होता… तिने आपल्याल आज रात्री जेवायला बोलवले आहे. “तिचे बोलणे ऐकून आशिष म्हणाला “अग पण आपण कसे जावू शकतो? आता लगेच मला आईला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे आहे… सकाळपासून तिची तब्येत खराब आहे.” आशिष चे बोलणे ऐकून स्वातीचा चेहेरा उतरला. ती रागात म्हणाली “तुझी आई तर सारखी आजारीच असते आणि मानसाचे वय झाले की अजारपण मागेच लागत… तरीही जेव्हा मला कुठे जायचे असते तेव्हा बरोबर आपला प्रोग्राम रद्द करण्यासाठी त्यांच्याकडे काही ना काही बहाना तयार असतो…

 

आजचेच बघ ना, मी सांगते आईंनी मला तयार होऊन बसलेले पाहिले असेल आणि मग लगेच तुला फोन करून आजारी असल्याचे सांगून बोलावून घेतले आहे.. असे बोलू नये पण एक नंबरची नाटकी आहे तुझी आई… यावर आशिष रागाने म्हणाला माझ्या आईला नाटकी म्हणायला लाज वाटते की नाही.. अग, आजपर्यंत आईने कधी आपल्याला बाहेर जाण्यापासून थांबवले आहे का? नाही ना? आणि तसेही तुझ्या आईचा फोन तुला आला होता मला नाही. मी तर आईला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी ऑफिसमधून लवकर आलो आहे त्यासाठी मी सकाळीच डॉक्टर जोशींची अपॉइंमेंट घेतली होती… तुम्ही मायलेकी मला न सांगता प्लॅन बनवता याचा अर्थ तुम्ही मला गृहीत धरता.. मलाही इतर कामे असतात त्यांनी बोलावले आणि लगेचच जायला मी काही रिकामा नाही आणि हे तर बरोबरही नाही?” असे बोलताच स्वाती आणखी नाराज झाली ती म्हणाली “मग माझ्या आईने तुला विचारून मला कधी माहेरी बोलवायचे कधी नाही हे ठरवायचे का? म्हणजे याचा अर्थ माझ्या आईने तुला विचारून प्लॅन बनवायचे का? अरे आशिष आपण जर आईकडे गेलो नाही तर किती वाईट वाटेल तिला?” यावर आशिष म्हणाला “तुला तुझ्या आईचा काळजी आहे..

 

पण आपण जर आईला ती आजारी असताना डॉक्टर कडे घेऊनन जाता बाहेर गेलो. तर तिला कसे वाटेल असा विचार तुझ्या मनात येत नाही का? आशिष स्वातीला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण ती काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. त्यांचे बोलने आतल्या खोलितून बाहेर येत असलेल्या सारिका ताईनी ऐकले… त्यांना खूप वाईट वाटले.. त्या बाहेर आल्या आणि स्वातीला समजावत म्हणाल्या स्वाती हे बघ मी कॅबने डॉक्टरांकडे जाईन आणि आशिष तुझ्याबरोबर येईल मग तर झाले? उगाच तुम्ही दोघे वाद घालत बसू नका.. तेव्हा स्वाती सासूला म्हणाली बस करा एवढे प्रेम दाखवण्याची काही गरज नाही. मला एक कळत नाही की तुमच्यासारख्या आई मुलांचे लग्नच का लावून देतात? मुलांचे लग्न झाले तरी आईला मुलाचा मोह काही सुटत नाहौ..

 

आशिष मोठ्या आवाजात स्वातीला म्हणाला अग काय बोलतेस हे तुझे तुला तरी कळते का? आणि तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आईशी अशा पद्धतीने बोलण्याची? तेव्हा सारिका ताईंनी आशिष ला गप्प राहण्याचा इशारा केला… पण तोपर्यंत स्वाती रागाने तिच्या खोलीत गेली आणि बॅग उचलून घरा बाहेर निघून गेली… सारिका ताई आशिष ला म्हणाल्या आशिष जा आणि स्वातीला थांबव… पण आशिष म्हणाला आई आपण तिला जा म्हणालेलो नाही ती स्वतःहुन गेली आहे.. तिचे ती कॅब ने जाईल. जावू देत तिला. आई हे बघ तू पटकन तयार हो आधी मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो… मग त्यानंतर तुला घर आणून सोडतो आणि मग मी स्वातीच्या माहेरी जाईन… सारिका ताई म्हणाल्या अरे पण… पण बिन काही नाही आणि तू तिची अजिबात काळजी करू नकोस तिला काही होणार नाही…

 

माझ्या लग्नाला पाच महिने झाले आणि ह्या पाच महिन्यात हा तमाशा मी अनेकदा पाहिला आहे… शेवटी आशिष ने समजावल्या नंतर सारिका ताई तयार झाल्या. आधी आशिष आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला, त्यानंतर आईला घरी सोडून तो स्वातीच्या माहेरी पोहोचला तिथं गेल्यानंतर त्याने पाहिले तर स्वाती रागात बसली होती.. आशिषला पाहून स्वातीची आई म्हणाली अरे हे काय जावई बापू आताच तर लग्नाला पाच महिने झाले आहेत आणि तुम्ही स्वातीला एकटीलाच माहेरी पाठवले?आशिष म्हणाला त्याचे असे झाले की मला आईला हॉस्पिटलमध्ये चेकअप साठी घेऊन जायचे होते. आशिष चे बोलणे ऐकून स्वातीची आई म्हणाली मान्य आहे की तुमच्यावर तुमच्या आईची जबाबदारी आहे पण आता म्हातारपणात तर आजारपण चालायचेच.. आता हेच पहा ना स्वातीचे बाबा देखील सतत आजारी असतात..

 

जावईबापू स्वाती तुमची बायको आहे आणि तिची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे तिला असे एकटीला माहेरी पाठवणे तर बरोबर नाही ना? तुम्ही तिची इच्छा काय आहे ह्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आशिष त्यावेळी काही बोलू शकला नाही पण स्वातीच्या आईचे हे बोलणे त्याला खूप लागले होते… काही वेळाने जेवण वगैरे आटोपून ते दोघे पुन्हा आपल्या घरी पर वाटेत स्वाती म्हणाली “आशिष मला आईस्क्रीम खायचे आहे, आशिष चा मूड खराब झाला होता पण परत त्याने विचार केला की आता नको म्हंटल्यावर ही काय ऐकणार आहे का? उगाच एका आईस्क्रीम साठी पुन्हा हीचे कशाला ऐकून घ्या असा विचार करून त्याने आईस्क्रीम पार्लर समोर गाडी थांबवली. दोघांनी तिथेच आईस्क्रीम खाल्ले आणि जाताना आशिषने आईस्क्रीमचा एक फॅमिली पॅक खरेदी केला.

 

ते पाहून स्वाती म्हणाली अरे आपण दोघांनी तर आईस्क्रीम खाल्ले आहे मग उगाचच फॅमिली पॅक का घेत आहेस? आशिष म्हणाला आपण दोघांनी आईस्क्रीम खाल्ले आहे पण घरी आई सुद्धा आहे म्हणून आईसाठी आईस्क्रीम घेतले आहे.. आईला सुद्धा आईस्क्रीम खूप आवडते त्याचे बोलणे ऐकून स्वाती रागाला गेली आणि म्हणाली तू का प्रत्येक वेळेस आईला मध्ये आणतोस? जेव्हा पहावे तेव्हा आई आई करत असतोस… त्यांच्यासाठी प्रत्येक वस्तू खरेदी करणे गरजेचे आहे का? अरे आशिष, बायको आणि आई मध्ये काही फरक असतो की नाही? आशिष म्हणाला हे काय मूर्खासारखे बडबड करत आहेस तू? माझे लग्न झाले म्हणून माझी आई माझ्यासाठी परकी झाली का? तू आलीस म्हणून मी आईला विसरून जावे असे तुला म्हणायचे आहे का ? तसे असेल तर सॉरी ते कधीच शक्य होणार नाही.

 

आशिष पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला, मला एक सांग लग्न झाल्यानंतर नवरा फक्त बायकोचा असतो आणि आईचा नसतो का? त्याचे बोलणे ऐकून सुद्धा मोठ्या आवाजात म्हणाली “मला आवडत नाही तुझे हे प्रत्येक वेळी साध्या साध्या गोष्टीत आपल्या दोघामध्ये आईला आणलेले. लग्नापूर्वी असेल तुझ्या आईचा तुझ्यावर अधिकार पण आता तू फक्त माझा आहेस. आणि तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे असे म्हणत स्वाती कारच्या मागच्या सीटवर जाऊन बसली. त्यावेळी आशिष ने तिला काहीही समजवण्याचा प्रयत्न केला नाही, तो गुपचूप ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला… काही वेळाने दोघे घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर स्वाती कार मधून उतरली आणि पाय आपटत सरळ तिच्या बेडरूम मध्ये गेली..

 

स्वातीच्या वागण्यावरून सारिका ताईंना ठाऊक झाले की ह्या दोघांमध्ये पुन्हा काहीतरी बिनसले आहे. आशिष सुद्धा घरामध्ये आला तेव्हा त्याचाही मूड खूप खराब झाला होता. पण सारिका ताई दोघांनाही काहीही न बोलता गप्प बसल्या. कारण एवढ्या दिवसात त्यांना हा सर्व गोष्टींची आता सवय झाली होती, सारिका ताई त्यांच्या खोलीमध्ये जावून झोपल्या.. काहीवेळाने आशिष ही त्याच्या बेडरूम मध्ये येऊन झोपला पण त्याला अजिबात झोप येत नव्हती. पाच महिन्यांपूर्वीच तर त्याचे स्वाती बरोबर लग्न झाले होते.. स्वाती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे • लाडात वाढलेली होती त्यामुळे तिचा स्वभाव थोडासा हट्टी होता.. तिला असे वाटत होते की नवऱ्यावर फक्त बायकोचा अधिकार असतो. त्यामुळे जर आशिष कधी ऑफिस वरून येऊन त्याच्या आईजवळ जाऊन बसला. किंवा आपल्या आईला घेऊन मंदिरात गेला किंवा मग आईला घेऊन इतर कोणत्या नातेवाईकांकडे गेला. तर ते स्वातीला अजिबात आवडायचे नाही. आणि ह्या गोष्टीमुळे तीचे अनेकदा आशिष आणि त्याच्या आई सोबत भांडण झाले होते..

 

आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वातीची आई तिला समज देण्या ऐवजी तिची साथ द्यायची आणि असे म्हणायची तुझ्या सासूला अक्कल नाही का? आता बायको आली आहे तर आपण त्या नवरा बायको मध्ये येऊ नये एवढी साधी गोष्ट कळत नाही तुझ्या सासूला…आणि मी म्हणते काय गरज असते रंग तुझ्या सासूची सतत जावई बापूंना माझे हे दुखते ते दुखते सांगण्याची? हे बघ स्वाती तुझी सासू एक नंबरची नाटकी आहे बर का… म्हणूनच तर तुझा नवरा सतत आईचा जप करत असतो अशा प्रकारे स्वातीच्या आईने तिच्या मनात सासू बद्दल खूप वाईट भरवले होते.. एके दिवशी आशिष ने स्वातीची तक्रार तिच्या आईकड केली तेव्हा तिची आई म्हणाली अहो जावई बापू सांभाळून घ्या आमच्या स्वातीला, अजून लहान आहे ती. तिला थोडेसे समजून घ्या..

 

हे पाहा तुम्ही तिच्याशी प्रेमाने वागा सर्व काही व्यवस्थित होईल..तसे तर स्वाती म्हणते ते ही खोटे नाही की नवऱ्यावर फक्त तिच्या बायकोचा अधिकार असतो… मला तर असे वाटते की तुम्ही माझ्या स्वातीच्या मनाविरुद्ध वागत असाल. त्यामुळेच तर तुमच्या दोघां मध्ये सतत काही ना काही वाद होत असतात म्हणूनच तर तिला तुमच्यात घरात आपलेपणा जाणवत नाही… स्वातीच्या आईने सुद्धा जावयालाच दोषी ठरवले त्यामुळे आशिष च्या मनामध्ये असे आले की आता आर या पार • काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. नाहीतर त्याचे आणि त्याच्या आईचे त्यांचे आयुष्य बरबाद होऊन जाईल त्यादिवशी रात्री आशिष ने बराच वेळ बसून विचार केला आणि मग तो झोपला. आशिष झोपेतून लवकर उठला कारण त्याला ठाऊक होते की त्याची आई सुद्धा खूप लवकर उठते.

 

त्याला आई बरोबर बोलायचे होते म्हणून तो बेडरूम मधून आपल्या आईच्या खोली गेला. त्यावेळेस सारिका ताई आंघोळ आटोपून पूजा करत बसल्या होत्या.. आशिष आईजवळ जाउ, न बसला काही वेळ तिथेच बसून तो आपल्या आईकडे पाहू लागला आणि म्हणाला आई तू किती लवकर उठतेस ग?निवांत झोपत जा ना उशिरा पर्यंत.. आई म्हणाली बाळा मला आता सवय झाली आहे पहाटे लवकर उठण्याची. बरं मला सांग तू का बरं आज इतक्या लवकर उठलास? आशिष म्हणाला मला तुझ्याशी एक महत्वाचे बोलायचे आहे.. आई म्हणाली कशाबद्दल? तो म्हणाला आई आज मी एक निर्णय घेतला आहे आणि त्यात मला तुझी मदत हवी आहे. आशिष चे बोलणे ऐकून सारिका ताईंनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले.

 

आणि म्हणाल्या मला समजले नाही अखेर तू कोणता निर्णय घेतला आहे? आणि माझी तुला कसली मदत लागणार आहे? आशिष म्हणाला आई आपल्याला स्वातीला धडा शिकवावा च लागेल. आपण तिचे सर्व काही सहन करतोय तू ही तिला काय बोलत नहीं आणि मी ही त्यामुळे शफारली आहे. ती तीच्या घरचे तिला समजावण्या ऐवजी मलाच दोष देतात आशिष चे बोलणे ऐकून सरिकाताई उसासा टाकत म्हणाल्या असू देत लहान आहे ती.. हळू हळू कळेल तिला मोठ्यांशी कसे वागायचे, बोलायचे ते. आशिष म्हणाला काही लहान वगैरे नाहीये ती. माझे दूध पित्या मुलीशी किंवा घरभर रांगणाऱ्या मुलीशी लग्न झालेले नाही. 26 वर्षांची मुलगी आहे ती जीला प्रत्येक गोष्टीची समज असते. जर आता वेळीच तिला समजावले नाही तर तिचे हे लहानपण आयुष्यभर संपणार नाही…

 

आपल्याला त्रास सहन करत राहावे लागेल.. ति आई-बाबांना तर काही लक्षात येत नाहीये पण तिला ताळ्यावर आणण्यासाठी तू माझी साथ द्यावीस असे मला वाटते… सारिका ताई म्हणाल्या ठीक आहे. आशिष म्हणाला मग आता देवा समोर मला प्रॉमिस कर. असे म्हणत आशिष त्याचा हात समोर करत म्हणाला तेव्हा सारिका ताईनी आशिष च्या हातावर हात ठेवला आणि म्हणाल्या चल ठीक आहे बाबा मी देवा समोर तुला वचन देते तू जे बोलशील मी तशीच वागेन… त्यानंतर आईला त्याने हळू आवाजात काहीतरी सांगितले आणि मग पुन्हा तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. काही वेळाने त्याने स्वातीला झोपेतून उठवले. तेव्हा स्वाती म्हणाली हे काय आशिष मला तू एवढ्या लवकर का उठवत आहेस? तेव्हा आशिष तिला म्हणाला हे बघ स्वाती मला ऑफिसला जायचे आहे.

 

पटकन माझ्यासाठी नाष्टा बनव आणि टिफिनचेही बघ.. स्वाती डोळे चोळत म्हणाली अरे नाश्ता बनव म्हणजे? पण मी का नाष्टा आणि टिफीन बनवू? हे काम तर आईचे आहे त्याच तर दररोज नाष्टा बनवतात ना? तेव्हा आशिष म्हणाला हो पण आईला आज काय झाले कोणास ठाऊक तिने आजपासून किचन मध्ये येणार नाही असे सांगितले आहे…. आशिष चे बोलणे ऐकून स्वातीचे डोके फिरले आणि म्हणाली, का? आई असे का म्हणाल्या? आणि त्या का बर नाष्टा बनवणार नाहीत? आज काय झाले आहे त्यांना?आशिष म्हणाला अग माझा नाष्टा आईने का बनवायचा? तू माझी बायको आहेस ना मग नाष्टा तर तुलाच बनवावा लागेल… स्वाती तिरकस नजरेने आशिष कडे पाहत होती तो पुढे म्हणाला जर तुझ्या म्हणण्या प्रमाणे लग्नानंतर बायकोचा नवऱ्यावर सर्वात जास्त अधिकार असतो तर मग त्याची सर्व जबाबदारी घेणे हे सुद्धा बायकोचेच काम असले पाहिजे..

 

आणि आई सुद्धा असेच म्हणाली त्यामुळेच तिने माझा नाष्टा आणि टिफीन बनवायला नकार दिला. आशिषचे बोलणे ऐकून अखेर स्वातीला उठावेच लागले आणि किचन मध्ये जावून ती नाष्टा बनवायला लागली.. पण आज स्वाती मनातून खूप खुश झाली होती. अखेर तिच्या मनातील इच्छा पूर्ण होत होती को आता तिच्या नवन्यावर फक्त तिचा अधिकार होता. आणि सासुने तर स्वतःहून मुलावर असलेला अधिकार सोडून दिला, असो, पण त्या दिवशी स्वातीने आशिष ची सर्व कामे आनंदाने केली…संध्याकाळी ऑफिस वरून आल्यानंतर आशिष ने स्वाती सोबत फिरायला जाण्याचा प्रोग्राम बनवला.आणि दोघे नवरा बायको फिरायला गेले.. स्वातीला भूक लागली होती त्यामुळे जेव्हा ते दोघे हॉटेलमध्ये जेवायला गेले. तेव्हा स्वाती वॉशरूम मध्ये गेली होती त्यावेळी तिच्या मोबाईलवर तिच्या आईचा फोन आला. पण आशिष ने फोन कट केला आणि तिचा फोन स्विच ऑफ करून ठेवला.

 

पण त्यानंतर जेव्हा तिच्या आईचा फोन आशिष च्या मोबाईलवर आला. तेव्हा आशिषने हा विचार करून फोन उचलला की काही इमर्जन्सी तर नसेल ना? पण जेव्हा त्याला असे काही वाटले नाही तेव्हा त्याने सांगितले की ते दोघे बाहेर जेवण करण्यासाठी आले आहेत. आणि स्वाती वॉशरूमला गेली आहे.. असे बोलून त्याने फोन कट केला पण स्वाती आल्यानंतर त्याने तिला आईचा फोन आल्याबद्दल काहीच सांगितले नाही…स्वाती ने जेवायला सुरुवात केली पण जेवताना तिने देखील तिचा फोन चेक केला नाही.. जेवण वगैरे आटोपल्यानंतर परत जाताना जेव्हा तिने तिचा मोबाईल हातात घेतला. तेव्हा आशिष म्हणाला हे काय स्वाती माझ्याशी बोल ना आणि तो फोन आधी बाजूला ठेव बर.. ती म्हण आशिष अलीकडे तू फार बदलला आहेस… म्हणजे माझ्यासाठी ते चांगले आहेच असे ती हसत म्हणाली. नेहमी असाच रहा असे म्हणत तिने आशिष ला मिठी मारली.. त्या दोघांनी खूप गप्पा वगैरे मारल्या आणि आजही दोघे आईस्क्रीम खावून घरी जायला निघाले, पण आज आशिष ने त्याच्या आईसाठी आईस्क्रीम घेतले नव्हते त्यामुळे स्वातीला खूप आनंद झाला.. ती मनात म्हणाली खरंच हळू हळू आशिष माझ्या मुठीत यायला लागला आहे… काही वेळाने ते दोघे घरी आले..

 

घरी आल्यानंतर जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तर मोबाईल स्विच ऑफ होता. तिने मोबाईल ऑन केला तेव्हा त्या मध्ये तिच्या आईचे चार-पाच मिस कॉल पडले होते. स्वाती म्हणाली अरेच्या आईचे एवढे मिस्ड कॉल्स ? तेव्हा आशिष म्हणाला अगं स्वाती मी तुला सांगायचे विसरलो. माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते त्यांनी फक्त तू कशी आहेस याची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता… ठीक आहे मी तिच्याशी बोलते असे स्वाती ने म्हणताच आशिष म्हणाला. राहू देत तू माझ्याशी बोल ना असे बोलत त्याने तिच्या हातातून मोबाईल घेऊन बाजूला ठेवला… काही दिवस हे असेच सुरू होते आता सारिका ताई सुद्धा तिच्याशी जेवढ्यास तेवढेच बोलायच्या. ह्या शिवाय त्या देवखोलित बसून पोथी वाचायच्या, किंवा मग शेजारी राहणाऱ्या त्यांच्या मैत्रिणी सोबत पाय मोकळे करायला बाहेर जायच्या.

 

एके दिवशी स्वाती आशिषला म्हणाली आशिष मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे तिला भेटावेसे वाटत आहे. आज संध्याकाळी आपण माझ्या माहेरी जाऊन येऊयात का?. आशिष पटकन म्हणाला अग आज नको पुन्हा कधीतरी जावू.. आज आपण मूवी पाहायला जावू.. तेव्हा स्वाती म्हणाली नको नको त्यापेक्षा मूवी पाहायला आपण पुन्हा कधी तरी जाऊया. पण आज तर मला माझ्या आई बाबांना भेटण्याचौ खूप इच्छा झाली आहे.. अरे माझ्या बाबांची तब्येत ठीक नसते… यावर आशिष म्हणाला काय तू पण? मी तुला मूवी पाहायला घेऊन जातोय आणि तू आहेस की माहेरी जाण्याचे बोल आहेस..

 

हे बग स्वाति ते काही नही माझे मन रखन्यासाठी आज तुला माझा सोबत मूवी पाहायला यावेच लागेल… मग काय ते दोघेही संध्याकाळी मूवी पाहायला निघून गेले… अशाप्रकारे जेव्हा केव्हा स्वाती आपल्या माहेरी जाण्याबद्दल बोलायची तेव्हा आशिष तिला कुठेतरी फिरायला घेऊन जायचा… जोपर्यंत तो घरी असायचा तोपर्यंत तो तिलातिच्या आईशी फोनवर बोलू देत नव्हता… अखेर रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी तिचे आई-बाबा तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी आले… त्यावेळी सारिका ताई मंदिरात गेल्या होत्या.. स्वातीने दरवाजा उघडला आणि आपल्या आई-बाबांना आलेले पाहून तिला खूप आनंद झाला. तिने आई बाबांना हॉलमध्ये बसायला सांगितले आणि आशिष ला बोलावण्यासाठी ती बेडरूम मध्ये गेली.

 

स्वातीच्या आई-बाबांना येऊन बराच वेळ झाला होता पण आई बाबा आले आहेत. हे सांगूनही आशिष खोली बाहेर आला नव्हता. त्यामुळे स्वाती पुन्हा एकदा आशिषला बोलवायला बेडरूम मध्ये गेली तेव्हा आशिष बाहेर आला… आणि दोघांना नमस्कार करून बाजूच्या सोप्यावर बासुन मोबाइल चलवत बसला. असीसचे हे वागने स्वातिला अजिबात आवडले नही. पण त्या वेळी ती त्याला काहीच बोलली नाही. तेव्हा आशिष स्वातीला म्हणाला स्वाती माझ्यासाठी गरम पाणी घेऊन ये प्लीज माझा घसा खूप खवखवतोय. तेव्हा स्वाती स्वयंपाक खोलीमध्ये गेली आणि गरम पाणी घेऊन आली.

 

त्यानंतर ती तिच्या आई बाबा जवळ बसणारच होती की तेवढ्यात आशिष म्हणाला स्वाती माझ्यासाठी आल्याचा चहा बनव… स्वाती चहा बनवण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेली.. तेव्हा आशिषला त्याचे सासू-सासरे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. तेव्हा तो फक्त हा हू याशिवाय काहीच बोलत नव्हता… शेवटी ते दोघेही गप्प बसले.. स्वातीने चहा बनवून आणला आणि टेबल वर ठेवला. तेवढ्यात आशिष पुन्हा म्हणाला स्वाती आता नाश्त्यासाठी पटकन पावभाजी बनव. आज माझी तुझ्या हातची पावभाजी खाण्याची इच

Leave a Reply

Your email address will not be published.