मित्रांनो, प्रत्येक घरात असलेली पितळेची भांडी एकदा घाण झाली की त्यांना चमकवणे कठीण जाते. खूप प्रयत्न करूनही त्यांचे हट्टी डाग जात नाहीत. आजकाल प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात स्टीलची भांडी जास्त वापरली जातात. पितळ आणि तांब्यासारख्या धातूंचा वापर नगण्य आहे कारण त्यांची देखभाल करणे तितके सोपे नाही. अशा परिस्थितीत, ही धातूची भांडी स्वयंपाकघरातून बाहेर गेली आहेत, परंतु तरीही पूजा खोलीत वापरली जातात.
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे धातू पूर्णपणे शुद्ध आहेत. पूजेच्या खोलीत देवाच्या मूर्ती, दिवे, पूजा थाळी आणि इतर अनेक भांडी पितळ आणि तांब्याची असतात.स्टीलची भांडी साफ करणे सोपे आहे, पण पितळेची भांडी चमकणे फार कठीण आहे. यासाठी खूप कष्ट करावे लागतात. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये या सोप्या टिप्स वापरून तुम्ही पितळ आणि तांब्याची भांडी सहज चमकवू शकता. हा उपाय कसा करावा?, त्यासाठी लागणारे साधने कोणकोणते? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक भांडे घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जेवढी आपली पितळेची भांडी असतील त्या प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला आपल्या घरातील डिटर्जंट पावडर एक चमचा इतक्या प्रमाणात घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चमचा इतके खाण्याचा सोडा घालायचा आहे व त्यामध्ये आपल्याला अर्धा पॅकेट इनो घालायचे आहे. जर तुमच्याकडे इनो उपलब्ध नसेल तर तुम्ही लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा चा वापर करू शकता.
हे सर्व घातल्यानंतर ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे आणि त्यामध्ये आपल्या घरातील पितळेची भांडी घालावीत. ती भांडी व्यवस्थित रित्या बुडतील अशा प्रकारे घालावेत. त्यानंतर हे पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवावे. उकळल्यानंतर त्याला अर्धा तास ती भांडी तशीच ठेवावी. त्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्ही घासण्याची देखील तुम्हाला गरज लागणार नाही इतकी स्वच्छ आणि लखलखी ती भांडी झालेली दिसतील.
अशाप्रकारे घरच्या काही वस्तूंचा वापर करून आपण घासता पितळेची भांडी स्वच्छ करू शकतो.