स्वतःची किंमत वाढवण्याचे 15 नियम….. लोक तुमच्या समोर गुडघे टेकतील?

Uncategorized

मित्रांनो, तुम्हाला समाजात स्वतःची ओळख निर्माण करायची असेल किंवा तुम्हाला लोकांना प्रभावित करायचं असेल तर यासाठी समाजामध्ये काहीतरी किंमत असली पाहिजे. समाजात तुमची किंमत नसेल तर लोक तुम्हाला थोडा सुद्धा भाव देणार नाही. ज्या लोकांची किंमत नसते, लोक त्यांना साधे विचारात सुद्धा नाही. तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल यासाठी आजच्या लेखांमध्ये आपण पंधरा नियम जाणून घेणार आहोत.

 

पहिला नियम म्हणजे स्वतःला रिस्पेक्ट द्यायला शिका. अनेक लोकं स्वतःच स्वतःला मान देत नाही. अशावेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीची आहे. स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वत्वावर प्रेम करणे. स्वतःला मान सन्मान देणे. अनेकदा आपण स्वतःला गृहित धरतो. म्हणजेच आपण आपला आदर करत नाही. आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटतं असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतः बद्दल सकारात्मक विचार करा.

 

दुसरा नियम म्हणजे कमी बोला. जे लोक गरजे पेक्षा जास्त बोलत असतात. त्यांची समजामध्ये खूप चांगली अस्तित्व निर्माण होते. त्याचबरोबर त्यांचे नाते संबंध सुद्धा खूप चांगले असतात. त्यांना समाजामध्ये मान असतो. कमी बोलण्याची सवय सगळ्यात जास्त फायदा करून देणारे सवय आहे. एवढे कमी बोला तेवढे तुमच्या फायद्याचे ठरत असते. मोजकेच आणि तेवढ्यात बोलणे यामुळे देखील आपण आपली समाजामध्ये किंमत वाढवू शकतो. जर गरज नसताना पण जास्त बोलत राहिले तर समाजामध्ये लोक आपल्याला कोणत्याही प्रकारची किंमत देणार नाही. त्यामुळे आपणच आपली किंमत हलवून घेऊ शकतो.

 

तिसरा नियम म्हणजे कोणाबद्दलही वाईट बोलू नका. जर तुम्ही इतरांबद्दल वाईट बोलत असाल तर त्यामुळे समाजामध्ये तुमची इमेज ही खालावते. कारण तुमच्या या वाईट बोलण्याच्या पद्धतीमुळे लोकांना तुमची विचारसरणी करते आणि त्यामुळे तुम्ही स्वतःचीच समाजामध्ये किंमत कमी करून घेत असताना. म्हणून कोणांबद्दलही वाईट बोलू नका.

 

चौथा नियम म्हणजे नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी कोणत्याही कामाला प्रत्येक लोकांना हा म्हणू नका. कारण आपण त्या लोकांना जेवढी किंमत देत असतो तेवढी किंमत ती लोक आपल्याला देत नसतात. कारण आपण त्यांच्यासाठी प्रत्येक वेळी अवेलेबल राहत असतो त्यामुळे लोक आपल्याला पाहिजे तितकी किंमत देत नसतात. त्यामुळे आपला स्वाभिमान जपायला शिका आणि प्रत्येक वेळी कोणत्याही कामाला होकार देण्याऐवजी ज्या त्यावेळी जर आपल्याला ते काम जमत नसेल तर त्या वेळेला सरळ नाही म्हणायला शिका.

 

पाचवा नियम म्हणजे लवकर रिप्लाय देऊ नका. तुम्हाला कोणी काही विचारत असेल किंवा तुमच्याकडून काही सल्ला घेऊ इच्छित असेल किंवा कोणाला तुमच्याकडून काही जाणून घ्यायची असेल तर लगेच काही बोलू नका. कारण शक्यता आहे घाई मध्ये तुम्ही काहीही बोलून जाल. त्यामुळे त्या विचारलेल्या सल्ला वर आपण जर उत्तर देणार असेल तर काही वेळ आपण विचार करा आणि मगच त्या व्यक्तींना रिप्लाय द्या आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्याला अपेक्षित असलेले उत्तर मिळेल आणि यामुळे तुम्हाला समाजामध्ये रिस्पेक्ट देखील मिळेल.

 

सहावा नियम म्हणजे आपल्या कामावर फोकस करा. सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कामावर लक्ष द्या तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये चांगले काम करू शकाल आणि लोक तुम्हाला आदर्श मानायला लागतील आणि त्यामुळे समाजामध्ये तुमची किंमत वाढायला सुरुवात होईल.

 

सातवा नियम म्हणजे स्वच्छ कपडे घाला. जर तुम्हाला समाजामध्ये लोकांच्या नजरेमध्ये स्वतःचे इम्प्रेशन पाडायचे असेल तर आपला पेहराव देखील चांगला असणे खूप गरजेचे आहे. कारण लोक तो माणूस किती शिकला आहे किंवा किती हुशार आहे याच्याकडे लक्ष देण्याऐवजी तो कसा राहतो व तो कसा दिसतो याच्याकडे खूप लक्ष देत असतात. त्यामुळे आपले कपडे स्वच्छ व आपला पेहराव अगदी टॉप टीप असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

 

आठवण नियम म्हणजे कोणतेही निर्णय घेत असताना ते अगदी विचार करून घ्यावे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही निर्णय घ्यायची वेळ आली असेल तर तो कोणताही निर्णय घाईघाईत अजिबात घेऊ नये. कारण त्यामुळे आपल्यालाच त्याचा फटका सोसावा लागतो. त्यामुळे कोणतेही निर्णय घेत असताना अगदी विचारपूर्वक आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच निर्णय घ्यायला शिका. जर तुम्ही प्रत्येक वेळी चुकीच्या निर्णय घेऊ लागला तर लोकांच्या नजरेत तुमची किंमत ही खाली जाईल. या उलट जर तुमचे निर्णय कायम बरोबर होत राहिले तर नक्कीच तुम्ही एक आदर्श देखील बनू शकाल.

 

नववा नियम म्हणजे वादविवाद कमी करा. कोणत्याही गोष्टींवर सतत वाद विवाद करणे सोडून द्या. कारण जर तुम्ही सतत कोणता ना कोणत्या गोष्टींवर वादविवाद करू लागला तर ज्यावेळी तुम्ही वाद-विवाद घालत असता त्यावेळी तुम्ही रागात असतात आणि प्रत्येक वेळी रागाच्या भरात तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला देखील भान राहत नाही. त्यामुळे समाजामध्ये तुमची किंमत कमी होण्याची शक्यता असते आणि यामुळे लोक तुमच्याकडे शिल्लक नजरेने पाहू देखील शकतात. त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टींवर वाद-विवाद घालत बसू नका.

 

दहावा नियम म्हणजे आपले ज्ञान वाढवत रहा. जर तुम्हाला लोकांमध्ये आपली किंमत वाढवायचे असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या ज्ञानांमध्ये भर घालावी लागेल. कारण लोकांमध्ये बसत असताना लोकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावी लागत असतात. त्या प्रश्नातील काही जरी थोडे तरी आपल्याला माहीत असले तर त्या बद्दल आपली एक वेगळीच इमेज निर्माण होते. यामुळे लोक आपल्याला हुशार समजत असतात. त्यामुळे आपण आपले ज्ञान सतत वाढवत राहिले पाहिजे.

 

अकरावा नियम म्हणजे ऐकण्याची सवय लावा. समाजामध्ये वावरत असताना फक्त लोकांनी आपलेच ऐकावे आपणच बोलत रहावे असे म्हणणे सोडून द्या. कारण प्रत्येकांची इच्छा असते की आपले म्हणणे देखील कोणी ना कोणीतरी ऐकावे. त्यामुळे त्या ऐकणाऱ्या व्यक्तींबद्दल एक वेगळाच प्रकारची इमेज लोकांमध्ये निर्माण होते. कारण ज्याप्रमाणे ते आपले बोलणे ऐकत असतात त्याप्रमाणे त्यांना देखील इच्छा असते. की आपले देखील बोलणे कोणी ना कोणीतरी ऐकावे जर तुम्ही देखील त्यांचे बोलणे ऐकला तर त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलची एक प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे ऐकण्याची सवय हे आपला मध्ये असणे खूप गरजेचे आहे.

 

बारावा नियम म्हणजे तुम्ही स्वतःची स्तुती करू नका. जर तुम्ही कोणतेही काम केले आणि त्याबद्दलची स्तुती तुम्हीच करत राहिला तर लोकांच्या नजरेमध्ये तुमची एक वेगळ्याच प्रकारची इमेज तयार होते. त्यामुळे लोक तुम्हाला जास्त किंमत देत नाही. कारण त्यांना असे वाटते की हा आपलीच बढाई मारत आहे. त्यामुळे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. म्हणून कधीही स्तुतीही इतरांच्या तोंडून ऐकल्याने आपली किंमत ही वाढत असते.

 

तेरावा नियम म्हणजे कोणासाठी जास्त उपलब्ध राहू नका. प्रत्येकवेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका. कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात. मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी. कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलंत तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा. स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

 

चौदावा नियम म्हणजे दिलेले वचन पूर्ण करा. अनेक वेळा अनेक लोक असे करत असतात की आपल्याला कुठेतरी वचन देतात आणि ते ते वचन पूर्ण करत नाहीत. यामुळे त्यांची किंमत ही समाजामध्ये घालावत असते. त्यामुळे लोक त्यांना जास्त महत्त्व देत नाही. म्हणून जर आपण कोणाला एखाद्या वचन दिले असेल तर ते आपल्याकडून पूर्ण होईल की नाही याची दक्षता घेऊनच मगच ते वचन त्यांना द्यावे. जर आपण कोणाला वचन दिले असेल तर ते आपल्याकडून पूर्ण करावेच. त्यामुळे आपली समाधान मध्ये किंमत वाढण्यास मदत होते.

 

पंधरावा नियम म्हणजे श्रीमंत बना. तुम्ही एक म्हन ऐकलीच असाल, जेव्हा आपल्या खिशात पैसे असतात तेव्हा शत्रू देखील आपले मित्र बनतात. म्हणून आपली कमाई ही वाढवण्याचा प्रयत्न करा आणि श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करा. कारण असे देखील म्हटले जाते की गुळ असले की मुंग्या आपोआप तिथे लागतात. त्यामुळे आपण आपल्याकडे पैसे टिकवून ठेवण्याची एक वेगळ्या प्रकारचे सवय लावावी व आपण कशाप्रकारे श्रीमंत बनवू याच्याकडे लक्ष द्यायला हवे. 

अशाप्रकारे हे काही पंधरा नियम आहेत जे तुमच्या स्वतःची किंमत वाढवण्यास मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published.