मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की प्रत्येक मनुष्याचे वय 40 वर्ष झाल्यानंतर त्याचे उत्तर वय चालू होते. आणि या उतार वयामध्ये त्याला स्वस्त व तंदुरुस्त राहायचं असेल तर त्याला योग्य ते आरोग्याचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. कारण या चाळीस वयानंतर आपल्या हाडांमधील कॅल्शियम हे कमी होण्यास चालू होते. जर आपल्या हाडांमध्ये हे कॅल्शियम योग्य प्रमाणात असेल तर आपण स्वस्थ व तंदुरुस्त राहू. म्हणूनच आज आपण काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्या गोष्टी पाळल्यामुळे आपल्याला आपल्या उतारवयामध्ये आपण स्वस्थ खुश व उत्साही राहू शकू.
प्रत्येकाला माहित आहे की वय वर्षे चाळीस झाल्यानंतर आपल्या हाडातील कॅल्शियम कमी होण्यास सुरू होते आणि जर हे कॅल्शियम आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला योग्य ते आरोग्याचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. जर आपण चाळीशी नंतर कॅल्शियमच्या गोळ्यात खाण्यात चालू केल्या तर त्या तशाच्या तशा बाहेर पडण्याची शक्यता असते. म्हणून जर आपल्याला आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम टिकवायचे असेल तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये विटामिन डी योग्य प्रमाणात असणे खूप गरजेचे आहे.
जर हे योग्य प्रमाणात असेल तरच आपण कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या तर त्यापासून आपल्याला योग्य ते कॅल्शियम मिळू शकते. त्याचबरोबर आपल्या शरीरात योग्य ते विटामिन डी असेल तरच कॅल्शियमच्या गोळ्या खाल्लेला पचनास मदत होते. जर आपल्याला ह्या गोळ्या पचवायच्या असतील व व्हिटॅमिन डी3 आपल्या शरीरामध्ये येण्यासाठी आपल्याला रोज सकाळी सूर्यप्रकाशामध्ये दहा ते पंधरा मिनिटे थांबणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर दररोज थोडे थोडे तीळ खाल्ल्यामुळे देखील शरीरामध्ये कॅल्शियम वाढते.
पेरू व टोमॅटोच्या बी मध्ये देखील कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. मखाना पावडर व खारीक पावडर दररोज दुधामध्ये उकळून एक ग्लास दूध रोज सेवन करावे. शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा सूप प्यावे. ही भाजी किंवा सूप महिन्यातून कमीत कमी दहा वेळा खावे. यामुळे आपल्या शरीरामध्ये सहा महिन्याच्या आत कॅल्शियम जास्त प्रमाणात वाढेल. शेवग्याच्या शेंगा या उष्ण असतात. त्यामुळे त्या गर्भवती महिलांनी खाऊ नयेत. शेवग्याच्या शेंगांच्या पानांमध्ये देखील प्रचंड प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असते.
दररोज काबुली चणे, गुळ, शेंगदाणे खावेत. आपला खाण्यामध्ये दररोज नाचणे व राजगिरा यांचे प्रमाण वाढवावे. देशी गायीचे दूध आणि तूप खावे. दररोज रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथी दाणे भिजत घालावे आणि हे पाणी सकाळी उठल्यावर प्यावे. हे पाणी पिल्यानंतर एक तास काहीही खाऊ नये. मेथी दाणे जितके कडवट असतील तितके आपल्या शरीरासाठी चांगले असते. मांसाहारी लोकांनी मटन हे खावेच. दररोज दोन उकडून अंडी खावेत. जेवणामध्ये शेंगदाणा तेल वापरावे. यामुळे हाडे मजबूत होते.
राजगिरा व खारीक बारीक करून याचे डिंकाबरोबर लाडू तयार करावे आणि ते दररोज आपण सेवन करावे. यामुळे देखील शरीरामध्ये कॅल्शियम वाढण्यास मदत होते. दररोज दुधामध्ये बदाम पावडर मिसळून प्यावे. दुधामध्ये नाचणी सत्व किंवा शतावरी कल्प मिसळून प्यावे. मोड आलेले पदार्थाचे सेवन दररोज करावे. बाबळी पासून जे डिंक तयार होते त्या डिंकामध्ये कॅल्शियम ची मात्रा वाढवण्याचे खूप प्रमाणात गुणधर्म असतात. त्यामुळे या डिंकापासून तयार झालेले लाडू चे सेवन दररोज केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात ताकाचे सेवन करावे. ताकामुळे देखील शरीरातील उष्णता कमी होऊन कॅल्शियमचे प्रमाण वाढते. दररोजच्या जेवणामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालावेत. 40 वयानंतर शरीरात मध्ये रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण देखील वाढते. त्यासाठी तुम्ही आहारामध्ये दररोज बीट चे सेवन करावे. यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून देखील रोखते. लसणाच्या पाकळ्या मुळे देखील शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. त्याचबरोबर जांभूळ ज्यावेळी मिळेल त्यावेळी खावे.
हे देखील तुमच्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कारण जांभळामध्ये असे काही गुणधर्म असतात की ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या अजिबात होत नाही. त्याचबरोबर एलोवेरा व तुळस यामुळे देखील शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत आणि जर गुठळ्या झाल्या असतील तर त्या गुठळ्या कमी होतात किंवा निघून जातात. आपला शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी शक्यतो करून सप्लीमेंट न घेता जे काही आपले घरगुती उपाय आहेत ते केल्याने आपल्याला त्याचा योग्य तो फायदा होतो. म्हणून तुम्ही घरगुती पदार्थातून आपल्याला कशाप्रकारे कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे.
अशाप्रकारे हे काही नियम आहेत. जर तुम्ही हे नियम पाळला तर नक्कीच तुम्ही उतार वेळात देखील तंदुरुस्त राहाल.