मित्रांनो, श्रावण महिना हा हिंदू धर्मातील एक पवित्र महिना मानला जातो, ज्यामध्ये भक्तगण विविध धार्मिक विधी, व्रत आणि उपवासांचे पालन करतात. या महिन्यातील प्रत्येक दिवस धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण समजला जातो. श्रावण महिन्यात भगवान शिवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे आणि याकाळात भक्तगण आपल्या आहारातील काही विशिष्ट पदार्थांचा त्याग करतात. हा त्याग केवळ धार्मिक कारणांमुळेच नव्हे तर आरोग्यविषयक कारणांनीही आवश्यक मानला जातो. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये कोणकोणते पदार्थ खाऊ नये याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
श्रावण महिन्यात मांसाहार खाण्यास मनाई आहे कारण हा महिना धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्यात शिव पूजनाचे विशेष महत्त्व आहे आणि या काळात पवित्रता राखण्यासाठी मांसाहार वर्जित आहे. याशिवाय, आरोग्यविषयक कारणे देखील आहेत. पावसाळ्यात मांसातील बॅक्टेरिया आणि विषाणूंच्या वाढीचा धोका वाढतो, त्यामुळे मांसाहार टाळणे श्रेयस्कर ठरते.
त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण सोमवारच्या व्रत करत असतात. या वृत्त करणाऱ्या लोकांनी सोमवारच्या दिवशी कधीही वरी यांचे सेवन करू नये. त्यात बरोबर आपण व्रत केला नंतर आहारामध्ये फळे खात असतो या फळांमध्ये फणसाचा वापर करून म्हणजेच फणस खाणे वज्र करावे. 5 ऑगस्टपासून श्रावण मास सुरु होत आहे. हा महिना व्रत वैकल्यांनी भरलेला असून अर्ध्याहून अधिक दिवस उपासाचे असतात. बाकी दिवस सणांमुळे गोडा-धोडाचं जेवण असतं, पण त्यातही काही पथ्यं आहेत.
श्रावणात आहाराबाबत काही पथ्यं सांगितली जातात, त्यांचं पालन केल्यास व्यक्ती सुखासुखी जीवन जगू शकतो. शास्त्रानुसार, श्रावणात आहाराचं पथ्य पाळल्यास माणसाला दीर्घायुष्य लाभतं. श्रावणात भरपूर पाऊस पडत असतो आणि यामुळे आपली भूक वाढते, परंतु पचनक्रिया मंदावलेली असते. अशा काळात तळलेले पदार्थ पचायला जड जातात. या काळात आपली झोपही पूर्ण होत नाही. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी सारखे आजार डोकं वर काढतात. म्हणून या काळात आहाराशी संबंधित काही पथ्यं पाळली पाहिजे.
आहाराबाबत पहिलं पथ्य म्हणजे, पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होत असल्याने या काळात तामसी आहाराचं सेवन करू नये, असं सांगितलं जातं. यात कांदा, लसूण, मांसाहार, मद्य या सगळ्याचाच समावेश होतो. आहाराबाबतच्या या सवयीचं काटेकोरपणे पालन व्हावं म्हणून या पथ्यांना धार्मिक वळण दिलं गेलं आहे. धर्मकार्याची जोड दिली असता लोक नियमांचं पालन करतात आणि श्रावण पाळतात.
आहाराबाबत दुसरं पथ्य म्हणजे, श्रावणात पालेभाज्या खाऊ नये. पावसाळ्यात पालेभाज्या पचायला जड असतात, या काळात पालेभाज्यांवर अनेक सूक्ष्मजीव आढळतात. ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. या भाज्या कितीही धुवून घेतल्या तरी ते जात नाहीत, म्हणून श्रावणात पालेभाज्या टाळाव्या. श्रावण मासात वांगी देखील खाऊ नये. तिसरं पथ्य म्हणजे, श्रावणात कडधान्यांचा वापरही टाळावा. कडधान्य पौष्टिक असली तरी पचायला जड असतात, म्हणून श्रावणाच कडधान्यांचं सेवनही करू नये.
मग आता श्रावणात खावं तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर श्रावणात मोसमी फळांचा फलाहार करावा. ही फळं शरीराला आवश्यक असेलल्या पोषक तत्त्वांची गरज भागवते.याशिवाय गहू, तांदूळ, ज्वारी, फळभाज्या, गोड पदार्थ, दही, दूध, तूप, ताक यांचाही आहारात समावेश केला असता जेवण रुचकर होतं आणि अंगी लागतं. या पदार्थांमुळे पोट बिघडत नाही आणि तब्येत चांगली राहते.
अशा प्रकारे या पथ्यांचं पालन केल्यास तुम्ही निरोगी आणि दीर्घायुष्यी जीवन जगाल.